म्हणजे काय

पॉर्न म्हणजे काय? पॉर्न बद्दल माहिती, निबंध मराठी मध्ये

meaning, essay on porn in marathi.

आजकाल प्रौढांसोबत टिनेजर्स सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पॉर्न पाहतात, त्यामुळे पॉर्न म्हणजे काय? त्याचे पाणिनां काय? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला पॉर्न बद्दल माहिती देणार आहोत, या माहितीचा वापर आपणास निबंध किंवा भाषणासाठी होऊ शकतो.

पॉर्न म्हणजे काय? पॉर्न बद्दल माहिती, निबंध मराठी मध्ये

पॉर्न म्हणजे लैंगिक उत्तेजनाच्या विशेष हेतूने बनवलेले अश्लील लैंगिक चित्रण होय. अश्लीलता किंवा पॉर्न हे पुस्तके, मासिके, पोस्टकार्ड, छायाचित्रे, शिल्पकला, रेखाचित्र, चित्रकला, अ‍ॅनिमेशन, ध्वनी रेकॉर्डिंग, फोन कॉल, लेखन, चित्रपट, व्हिडिओ आणि व्हिडिओ गेम्स यासह विविध माध्यमांमध्ये सादर केली जाऊ शकते. पॉर्न म्हणजे लैंगिक संबंधांचे चित्रण, यामुळे सेक्स शो आणि स्ट्रिपटीज सारख्या थेट प्रदर्शनांचा पॉर्न मध्ये समावेश होत नाही. पॉर्न मध्ये दोन पद्धतीचे लोक कॅमेरा समोर असतात, छायाचित्रांसाठी पोझ देणारे मॉडेल्स आणि पॉर्न चित्रपटांमध्ये काम करणारे “पॉर्न स्टार्स “. तसेच पॉर्न चित्रणामागे पूर्ण टीम असते, ज्यात डायरेक्टर, प्रोड्युसर, मेक-अप-आर्टिस्ट, प्रोडक्शन टीम, फोटोग्राफेर्स, कॅमेरामन इत्यादी असतात.

असे मानले जाते कि इंटरनेटवरचा ७०% डेटा पोर्नोग्राफिक कन्टेन्ट आहे. सर्च इंजिन वर सर्वात जास्त पॉर्न संबंधित कीवर्ड वापरले जातात. इंटरनेटच्या प्रगतीमुळे पॉर्न आता जगाच्या काना-कोपऱ्यात पोहचले आहे. इंटरनेट अगोदर पॉर्न विडिओ कॅसेट च्या रूपात वितरित होत असत, ज्या साठी व्ही.सी.आर. प्लेअर लागत असे.

इंटरनेटच्या अनियंत्रित वापरामुळे किशोर वयीन आणि अगदी लहान मुलांच्या हाती पॉर्न लागते, आणि ही मोठ्या चिंतेची बाब आहे. २०१६ मध्ये भारतामध्ये पॉर्न साईट्स वर प्रतिबंध घालण्यात आला होता, पण जनतेच्या व्यापक विरोधामुळे हा प्रतिबंध सरकारला मागे घ्यावा लागला. भारतात काही इंटरनेट प्रोव्हायडर्स आपल्या खाजगी कुवतेत पॉर्न वर प्रतिबंध घालतात, जसे कि रिलायन्स जिओ वर बऱ्याच प्रसिद्ध पॉर्न साईट्स ऍक्सेसिबल नाहीत. सरकार किंवा इंटरनेट प्रोव्हायडर्स ने कितीही प्रतिबंध टाकले तरी पॉर्न पाहणारे काहीना काही ब्लॅक हॅट पद्धती वापरून पॉर्न पाहतातच.

पॉर्न चे परिणाम / लत

पॉर्न हे प्रौढ लोकांच्या करमणूकी साठी बनवले जाते, पण इंटरनेट मुळे टिनेजर्स (१३ ते १९ वर्षे) आणि प्री-टीन्स (१० ते १३ वर्षे) सुद्धा ते पाहतात. भारतासारख्या देशात शाळांमध्ये, घरामध्ये बेसिक सेक्स एडुकेशन मिळत नाही आणि यामुळे टिनेजर्स आणि प्री-टीन्स पॉर्न कडे वळतात. त्यांच्या साठी पॉर्न हेच सेक्स एडुकेशन बनते. पॉर्नच्या बाबतीत हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे.

आजकल कपल्स आपल्या शरीर संबंधाचे विडिओ बनवतात. नात्यामध्ये समस्या निर्माण झाल्यास असे व्हिडिओस किंवा MMS पॉर्न साईट्स वर अपलोड केले जातात. ह्या विडिओ च्या जोरावर ब्लॅकमेल केले जाते. तसेच काही नीच प्रवृत्तीचे लोक कपड्यांच्या दुकानात किंवा मॉल च्या चेंजिंग रूम मध्ये हिडन कॅमेरे वापरून स्त्रियांचे, मुलींचे MMS बनवतात आणि हे विडिओ पॉर्न साईट्स वर विकले जातात.

व्यक्तींवर किंवा त्यांच्या लैंगिक संबंधांवर पॉर्न चे दुष्परिणाम वापरल्या जाणार्‍या पोर्नोग्राफीच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये ते भिन्न असू शकतात. काही रिसर्च असे सूचित करतात की पॉर्न फोटोस आणि पॉर्न व्हिडिओस व्यसन बनू शकतात, विशेषत: जेव्हा ते हस्तमैथुन करताना पाहिले जातात. पण काहीजण असे मानतात की हा रिसर्च डेटा अपूर्ण आहे. इतर संशोधनात अशी अश्लील सामग्री लैंगिक हिंसाचाराशी हि जोडली गेली आहे. पॉर्न व्हिडिओतील चित्र विचित्र पोसिशन्स, क्रियांमुळे पॉर्न पाहणारांच्या आपल्या पार्टनर कडून सुद्धा तश्याच अपेक्षा असतात, त्या पूर्ण न झाल्यास त्यांच्या लैंगिक संबंधात तसेच नात्यावर परिणाम होऊ शकतो. याविषयीची रिसर्च करणे कठीण आहे कारण पॉर्न पाहणे ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे, काही देशांत या वर बोलणे सुद्धा निषिद्ध आहे. तसेच काही बी ग्रेड चित्रपट सुद्धा सॉफ्ट पॉर्न दाखवतात, अश्या सर्व मुद्द्यांमुळे पॉर्न च्या परिणामांवर निर्णायक निकाल काढणे खूप कठीण आहे.

References: Internet Pornography

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange