मराठी निबंध भाषण

वृक्षारोपण,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडे लावा झाडे जगवा – मराठी निबंध, भाषण, लेख

वृक्षारोपण,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडे लावा झाडे जगवा – मराठी निबंध, भाषण, लेख

Vruksharopan, Vrukshavalli Amha Soyari/Soyare Vanachare, Zade Lava Zade Jagava are very common but important essay, speech topics in Marathi schools and sometimes in college too. You can find the typical essays in different essay books and over the internet too, but here we tried to make it little different. We are presenting this essay cum speech with little different perspective. We hope you will like it. With little modification, information given here can be used for different essays in the same theme like the essay on Zade Lava Zade Jagava etc. We will suggest you not to just copy paste this sample essay, rather you should take an overall idea and write your own piece. So, let’s get started, shall we?

वृक्षारोपण – निबंध, भाषण (Speech, Essay on Vruksharopan in Marathi)

वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होते. विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्य, फळे, भाज्या देतात. औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो. घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वृक्षांपासून आपणास मिळते. ही झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात, दळणवळण होते, व्यवहार वाढतो, हीच झाडे आपणास घर, दुकाने बांधायला लाकूड देतात. वृक्ष मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे.

हे सर्वकाही आणि अश्या बऱ्याच गोष्टी ही वृक्ष आपल्याला देतात, अगदी निस्वार्थपणे. आपण मात्र या उपकारांची परतफेड कशी करतो? वृक्षतोड करून, प्रदूषण करून, पिकांवर विषारी फवारे मारून, रानामध्ये वनवे लावून, आपल्या पालनकर्त्या निसर्गाचाच संहार करून. किती क्रूर आणि बद्ध झालाय माणूस, आपण आपल्या हातानेच आपल्या भावी अस्तित्वाचा विनाश लिहत आहोत.

आता ही वृक्षतोड एवढी सामान्य सामान्य झाली आहे कि आपणास याबद्दल काहीच वाटत नाही. आपण असे वागत आहोत की काही घडतच नाहीये. आपली ही वागणूक एके दिवशी आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. आपण पाहतो आजकाल दुष्काळ खूप पडतो, पाण्याची टंचाई जाणवते, पृथ्वीचे तापमान वाढत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. निसर्ग देत असलेल्या या सर्व चेतांवण्याकडे आपण आपण दुर्लक्ष करत आहोत. जर निसर्गाचा, जंगलांचा असाच ऱ्हास होत राहिला तर तो दिवस दूर नाही जिथे मानवाचे, पशुपक्ष्यांची जगणे अशक्य होईल.

पशु, पक्षी, वृक्ष, जंगले आणि अगदी कीटकसुद्धा मानवी जीवन चक्राचा भाग आहेत, आपण हे अगदी सहावी, सातवीच्या पुस्तकात शिकलो आहोत. हे सत्य समजून घेणे अवकाश विज्ञानासारखे कठीण ही नाही. वृक्षतोड केली, जंगले जाळली हे तर हे जीवन चक्र तुटू शकते आणि याचा परिणाम सर्व सजीवांना आणि मानवालाही भोगावा लागेल. जर आपण असाच निसर्गाचाच विनाश केला तर आपल्याला अन्नधान्य कुठून मिळेल. मनुष्य प्लास्टिक आणि काँक्रीट खाऊन तर जगू शकत नाही. हे सगळे समजायला तसे सोपं आहे, आणि आपणास ते कळते सुद्धा, तरीही आपण वृक्षतोड, वणवे थांबवत नाही.

यावरती उपाय म्हणून सरकार, विविध सामाजिक संघटना अनेक प्रकारच्या योजना, परियोजना आमलात आणतात. पण त्या फक्त घोषणा आणि निधीच्या चक्रातच अडकून राहतात. विविध नियम, कायदे मानवाला अवैध वृक्षतोडी पासुन परावृत्त करण्‍यात सफल होऊ शकले नाहीत.

नवीन बनलेल्या तेलंगणा राज्यात काही वर्षांपासून “हरित हरम” नावाचा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत दर वर्षी लाखो झाडे लावली जातात, हि मोहीम तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री के.चंद्रशेखर राव यांच्या मनाजवळची आहे. या मोहिमेत सिनेमा आणि व्यापार जगातील प्रसिद्ध व्यक्तींनीही भाग घेतला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मोहिमेत सर्व सामान्य लोकांनी मनापासून भाग घेतला. देशात नाही तर जगभरात अश्या वृक्षारोपण मोहिमांची गरज आहे.

एक झाड पूर्ण वाढायला वर्षे जातात आणि आज काळाच्या प्रगत हत्यारांनी ते काही मिनिटात तोडता येते. आपण अगोदरच निर्सगाचा खूप दुरुपयोग केला आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, आज ही आपण आपल्या निसर्गाचे सौदर्य परत आणू शकतो.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी / सोयरे निबंध, भाषण – (Vrukshavalli Amha Soyari/Soyare Vanachare Essay, Speech)

एका छोट्याश्या अनुभवाने माझा निसर्गाबद्दलच्या, वृक्षांबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. मी आमच्या घराच्या बाल्कनीमध्ये एका कुंडीमध्ये टोमॅटोच्या काही बिया टाकल्या. काही दिवस पाणी टाकले, थोड्या दिवसांनी त्याचे एक छोटेसे रोपटे निर्माण झाले. मी त्या रोपट्याची काळजी घ्यायला लागलो, खत टाकले, रोज पाणी दिले, त्याला कीटकांपासून, रोगांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

त्या छोट्याशा रोपाला रोगांपासून वाचवण्यासाठी मी वेगवेगळे ब्लॉग, लेख वाचायला सुरुवात केली आणि नैसर्गिक कीटकनाशकांच्या साहाय्याने त्याला रोगांपासून वाचवले सुद्धा. काही महिन्यांमध्ये ते रोपटे वाढले. त्याला खूप सारे टोमॅटोसुद्धा आले. एकेदिवशी आई ती टोमॅटो काढण्यासाठी आली आणि मला अचानक वाटले की तिने ते टोमॅटो झाडावरून काढू नये. थोडेसे विचित्र आहे पण मला जणू वाटले की मी त्या झाडाला इजा पोहचवतोय.

शेवटी आईने त्यातले काही टोमॅटो काढले, पण एक विचार मला वेडावून गेला. ते एक टोमॅटो वाढवण्यासाठी या छोट्याश्या झाडाला किती प्रयत्न करावे लागले, किती रोगांशी लढावे लागले असेल. कळत नकळत माझे त्या रोपट्याशी एक बंध जुडला; काहीस मैत्रीचं, काळजीच नातं जोडलं गेलं. आणि तेव्ह कधीतरी वाचलेला संत तुकारामांचा अभंग आठवला,

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

संत तुकाराम महाराज एकांतवासासाठी देहू च्या डोंगरावर जात असत, त्या डोंगावरील पशु, पक्षी, वृक्ष, वेलींशी त्यांचे नाते जोडले गेले. त्यांत त्यांना आई, वडील, सखा, भाऊ, बहीण दिसत असत. ते त्यांच्याशी आपले मन व्यक्त करत असत. संत तुकाराम महाराज म्हणाले की ते या निसर्गात एवढे रममाण झाले की पक्षीही त्यांच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागत असत. हा निसर्गाचा सहवास त्यांना संसारी दुःखातून दार नेऊन, मोक्षाचा आनंद द्यायचा.

वृक्षवल्ली ला आपला सखा, कुटुंबी मानणाऱ्या संत तुकाराम महाराजांसारखेच संत सावता माळी आपल्या शेतातील फळभाज्यांना दैवत मानत असत. ते म्हणत पांडुरंगाचे दर्शन मला या मळ्यातच घडते.

कांदा मुळा भाजी
अवघीं विठाबाई माझी

लसुण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरीं….

आपल्या संत ऋषींकडून हा निसर्ग प्रेमाचा संदेश घेणं काळाची गरज आहे. कदाचित आपण या थोर व्यंक्तींपरी निसर्गाशी मनाचे, प्रेमाचे नाते नाही जोडू शकणार. कदाचित आपण यात देव नाही पाहू शकणार, पण कमीत कमी या निसर्गाचा, वृक्षवल्लीचा, पशु-पक्षांचा आदर तरी आपण कराया शिकले पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे, पशु-पक्षांचे संरक्षण केले पाहिजे.

झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध भाषण – (Zade Lava Zade Jagva Essay, Speech in Marathi)

सूचना: या निबंध किंवा भाषणात आपण वरील दिलेल्या २ निबंधातील माहिती सुद्धा वापरू शकता.

झाडे फक्त लावून उपयोग नाही तर ती जगवली सुद्धा पाहिजेत. सरकार किंवा विविध सामाजिक, निसर्गप्रेमी संस्था अनेक कार्यक्रम, मोहिमे अंतर्गत लोकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करतात. पण झाडे लावल्या नंतर त्यांच्याकडे पहिले सुद्धा जात नाही. त्यातली खूप सारी रोपटी काही दिवसातच मरून जातात. काही सरकारी मोहिमे अंतर्गत झाडे लावण्याचे आणि त्यांना जगवण्याचे पैसे दिले जातात. अश्यावेळी लोक पैश्यानंसाठी त्या झाडांची काळजी घेतात, त्यांचे रक्षण करतात, पण सार्वजनिक किंवा जंगलातील झाडांकडे कोणीही लक्ष देत नाही.

नुसती झाडे लावून काहीच फायदा नाही, ती जगवता सुद्धा आली पाहिजेत. या साठी कुठली झाडे कुठल्या मातीत, वातावरणात वाढतात, त्यांची काळजी कशी घ्यावी लागते हे जाणणे सुद्धा महत्वाचे आहे. झाडे वाढवणे हे अगदी लहान मुलाच्या संगोपणासारखे सारखे आहे. त्यांना पहिले काही वर्ष जपावे लागते, एकदा ती मोठी झाले की ती झाडे आपले पोषण स्वतः करू शकतात.

परमाकल्चर सारख्या पद्धतीने जगवलेली, वाढवलेली झाडे ही आत्मनिर्भर बनतात. अश्या विविध पद्धती जाणणे ही खूप महत्वाचे आहे. आपण “झाडे लावा, झाडे जगवा” संदेश पसरवणे खूप महत्वाचे आहे.

सूचना: जर तुमहाला हा निबंध आवडला असेल तर या आर्टिकल ला रेटिंग द्या. तुमचे मत तुम्ही कंमेंट द्वारे नोंदवू शकता. धन्यवाद!!

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 291 Average: 3.5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

20 Comments

Secured By miniOrange