निबंध भाषण मराठी

स्वच्छ भारत अभियान मराठी माहिती निबंध Swachh Bharat Abhiyan in Marathi

speech essay paragraph Swachh Bharat Abhiyan clean india campaign

स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहिम भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक  प्रकल्प आहे. प्रधान मंत्रींनीं २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा एक मुख्य ध्येय आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे “ओपन डेफकेशन फ्री” म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. म्हणूनच आम्ही स्वच्छ भारत अभियान बद्दल मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख दिला आहे.

यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. या स्वच्छ भारत अभियान भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे हे सुद्धा आहे.

विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचे फायदे असे विषय भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये पाहू शकता. काळजी करू नका! स्वच्छ भारत अभियान या विषयावर आम्ही येथे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत . या लेखातील, आम्ही स्वच्छ भारत अभियान बद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे ती तीन भागात विभागली आहे.

प्रथम, आम्ही आपल्याला स्वच्छ भारत मोहिमेबद्दल महत्वाची माहिती आणि डेटा देऊ. मग आपण याची अंमलबजावणी कशी झाली आणि काय परिणाम झाले हे सुद्धा पाहू. आणि शेवटी, आपण या विषयावर निष्कर्ष काढू. येथे, आम्ही आपल्याला मुख्य माहिती देत आहोत जी आपण नंतर भाषण, निबंध किंवा परिच्छेद स्वरूपात अनुरूप करण्यासाठी सुधारू शकता आणि आम्हाला माहित आहे की आपण असे बदल करण्यासाठी पुरक आहात. स्वच्छ भारत अभियान बद्दलची हि मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर, चला जाणून घेऊयात स्वच्छ भारत अभियान चे महत्व, फायदे…

स्वच्छ भारत अभियान मराठी माहिती निबंध(Swachh Bharat Abhiyan Essay, Speech in Marathi)

भारत आणि पाश्चात्य देशांमधील एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता, त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत कशी?, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो, नाही का? आपण खूप मागे आहोत, लवकरच आपल्याला काहीतरी पावले उचलावी लागतील. आजच्या भाषणाचा विषयही तोच आहे. शुभ प्रभात, आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमेबद्दल बोलणार आहे, आणि ती म्हणजे “स्वच्छ भारत अभियान”.

भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहिम सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये, भारत सरकारने “संपूर्ण स्वच्छता अभियान” सुरू केले जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे “निर्मल भारत अभियान” असे नामकरण केले. परंतु, स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. यातून त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो. पं

तप्रधान मोदींनी राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबविली आणि नागरिकांना भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, काहींना हा राजकीय स्टंट वाटू शकतो, पण यासर्वातून एक फायदा झाला की आपण भारतीय लोक स्वच्छतेबद्दल बोलू लागलो. वादविवाद, चर्चा होऊ लागली. ( मी स्वच्छते साठी काय करू शकते / शकतो? मराठी निबंध २५० शब्द )

[emaillocker id=10751] स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्याच्या निगडित कामांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे आणि दिवसेंदिवस मोहिमेची प्रगती होत आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेची स्वतःची अधिकृत वेबसाइट व अॅप आहे जेथे आपण या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. आतापर्यंत १ ,४०८ ,२८० घरांत शौचालये बांधली गेली, १४३,४९१ गावे/ ७९ जिल्हे / ३ राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. विविध राजकारणी, सेलिब्रिटिज, अभिनेते आणि क्रीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता आणि पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन, अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि असेच अनेक जणांनी झाडू हातात घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या या अभियानाचा एक चांगला प्रचार केला. या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये, तसेच शहरांत स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. (Swachh Bharat Abhiyan, Clean India Campaign 2019- Information, Essay, Speech in English )

२०१९ पर्यंत भारताला ओपन डेफकेशन फ्री (ओडीएफ) बनवणे हे स्वछ भारत अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. स्वच्छ भारत अभियान हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि ३० लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे, या मोहिमे अंतर्गत भारताच्या ४०४१ शहरे आणि गावांना १.९६ लाख कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

या मोहिमेने केलेल्या जागृतीने अनपेक्षित बदल घडत आहेत, भारतातील हिंदी चित्रपट जगतातील (बॉलीवूड) सुपरस्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “शौचालय” नावाच्या चित्रपटाद्वारे भारतातील खुल्या शौचाच्या समस्येच्या निर्मूलनास समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट ग्रामीण भारतातील स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकतो, ग्रामीण भागात शौचालये बांधण्याची आवश्यकता आहे. असा विषय एका दिग्गज कलाकाराने करणे मोठी गोष्ट आहे, याचा अर्थ असा आहे की स्वछता विषयावर लोकं आता विचार करू लागली आहेत. [/emaillocker]

स्वच्छ भारत अभियान २०१९ अपडेट्स

खालील माहीतच वापर देखील तुम्ही निबंध किंवा भाषण मध्ये करू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नव वर्ष भाषणात एक खूप मोठी घोषणा केली आहे. त्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण असणार आहे जे ४ जानेवारी ते १० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. शहरी क्षेत्राच्या स्वच्छतेच्या यशाचे मूल्यांकन करण्यासाठी हे स्वच्छता सर्वेक्षण आयोजित केले जाणार आहे. हे सर्वेक्षण चार हजारांहून अधिक शहरातील ४० करोड पेक्षा अधिक लोकसंख्येला समाविष्ट करेल.

या सर्वेक्षणात कचरा संकलन, कचरा उचलण्याची वाहतूक सुविधा, वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून कचऱ्यावर प्रक्रिया करणे, वागणूकीत बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा समावेश करणे, क्षमता बांधणीसाठी घेतलेली नवीन पावले, जनतेचा सहभाग आदी मापदंडांचा वापर होणार आहे. या अभियाना अंतर्गत रहिवाश्याची प्रतिक्रिया सुद्धा घेतली जाईल. सर्वेक्षण अधिकारी स्वच्छता अॅपच्या वापराचे विश्लेषण करतील आणि विविध प्रकारच्या सेवा केंद्रामध्ये सुधारणांबद्दल देखील विचार करतील.

पी.एम. मोदी पुढे आपल्या भाषणात म्हणाले,”स्वच्छतेचे पालन करणे ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिक आणि संघटनांची जबाबदारी आहे,आणि प्रत्येक नागरिकाला येत्या दिवसांमध्ये स्वच्छतेच्या सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घेण्यास मी आवाहन करतो. मला खात्री आहे की आतापर्यंत कोरडा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी निळा आणि हिरव्या कचरापेटी चा वापर करण्याची सवय तुम्हाला झाली असेलच”.

पुढे ते म्हणाले “कचरा गोळा करणे, कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्चक्रण करण्याचे तत्व अतिशय प्रभावी आहे. आता या सर्वेक्षणाच्या आधारावर शहरांची श्रेणी निश्चित करण्यात येईल. जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त असेल तर रँकिंग राष्ट्रीय स्तरावर केली जाईल आणि जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा कमी असेल तर एक प्रादेशिक स्तरावर स्थान दिले जाईल.

या स्वच्छता सर्वेक्षणात सर्वोच्च दर्जा प्राप्त करणे हे आपले स्वप्न असणे आवश्यक आहे आणि आपण या दिशेने सर्व प्रयत्न केले पाहिजे. ४ जानेवारी ते १० मार्च २०१८ पर्यंत आपण स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मागे पडत नाही याची खात्री बाळगा. हे प्रत्येक शहरातील संभाषण बिंदू बनले पाहिजे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे एक स्वप्न असावे – ‘आमचे शहर – आमचे प्रयत्न’, ‘आमची प्रगती – देशाची प्रगती’. आपण पुन्हा एकदा बापूंचे स्मरण करून स्वच्छ भारत निर्माण करण्याचा संकल्प घेऊयात.”

जर तुम्हाला स्वच्छ भारत अभियान वरील हि माहिती, निबंध, भाषण आवडले असेल तर कृपया खाली चांगली रेटिंग द्या आणि कंमेंट करून तुमचं मत कळवायला विसरू नका. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 982 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

98 Comments

Secured By miniOrange