निबंध भाषण मराठी

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेख Importance of Hygiene in Marathi

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेख Importance of Hygiene in Marathi

स्वच्छता हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. स्वच्छतेशिवाय आपण अनेक घातक आजारांना बळी पडू शकतो. स्वच्छता राखल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. तसेच स्वच्छतेमुळे आपले मन ही प्रसन्न राहते. म्हणूनच आम्ही या लेखामध्ये स्वच्छतेचे महत्व या विषयावर मराठी निबंध, भाषण, लेख दिला आहे.

ह्या जीवनातील स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेखामध्ये आम्ही वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व, परिसर स्वच्छतेचे महत्व, फायदे, स्वछ भारत अभियान, याबद्दल मराठी माहिती, मजकूर दिला आहे. ह्या निबंधामधील माहिती तुम्हाला “आरोग्याचे महत्व”, “आरोग्य हेच धन”, “परिसर स्वच्छता” या विषयांवर देखील मराठी निबंध लिहिण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेख Importance of Hygiene in Marathi

आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवन शैलीही बदलून जाते. स्वच्छ परिसरातील लोकं मॉर्निंग वॉल्क किंवा जॉगिंग ला जास्त जाताना दिसतात, अश्या चांगल्या सवयीचा आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम होतो. स्वच्छ पटांगणात मुले खेळतात. आपले विडिओ गेम, मोबाईल दूर करून मैदानात येतात, ऍक्टिव्ह होतात. याचा फायदा असा होतो कि मुलांचा अभ्यासाचा ताण कमी होतो, ती खूष राहू लागतात.

आपल्याया हे सगळे माहीत आहे, पण तरीही आपण या साठी काहीच करत नाही. आपण आपले घर स्वछ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले परिसर दुसर्यांचा या विचाराने आपल्या भारताचा ऱ्हास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकार चे काम नाही, हां त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्यातच पाहिजेत. पण जो पर्यंत आपण स्वच्छता-प्रिय होत नाही, स्वच्छतेचे महत्व, फायदे जाणून घेत नाही तो पर्यंत काहीही बदल होणार नाही.

जर आपल्याला स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, सरकार आणि आपल्याला एकत्र काम करावेच लागेल. सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान” मध्ये सहभाग घ्यावा लागेल. अश्या मोहिमेला साथ दिली पाहिजे.

आपण येथे मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधांशी व्यवहार करीत आहोत, त्यामुळे अचानक दैदिप्यमान फरक जाणवेल असे स्वप्न पाहणे थोडे अवास्तवच ठरेल. इथे लोकांना बदलायची गरज आहे, हे फक्त एकट्या सरकारचे काम नाही. आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे या शिवाय कुठलाच मार्ग नाही. स्वच्छ भारत मोहिमेची सुरूवात सरकार आणि नागरिक भागीदारीपासून झाली परंतु आता दिसते की फक्त सरकारच काम करत आहे, आम जनता त्यांची साथ सोडत आहे.

अशी प्रचंड कार्ये साध्य करण्यासाठी सरकार आणि जनतेची भागीदारी आवश्यक आहे नाही तर ते यशस्वी होणार नाही. सरकार त्यांचे काम करत आहे पण जनतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. लोकशाहीत आपल्याला अधिकार मिळतात, परंतु आपण हे विसरतो की अधिकारांसोबत कर्तव्ये ही येतात. आपण आपली कर्तव्य विसरतो आणि केवळ अधिकारांसाठी आंदोलन करतो. भारत स्वच्छ करण्यासाठी आपण लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे, केवळ सरकारच हे करू शकत नाही.

आज मी तुम्हा सर्वांना स्वच्छतेची शपथ घेण्याची विनंती करतो. अशा चांगल्या कारणासाठी सरकारला समर्थन देऊयात. या देशाचे भविष्य आपल्या, युवांच्या आहेत आहे. लक्षात ठेवा,”कुठलाही देश परफेक्ट नसतो तो बनवावा लागतो“. माझ्या बरोबर म्हणा, “आज मी ग्रीन आणि क्लीन इंडिया बनविण्यासाठी प्रतिज्ञा घेतो, मी रस्त्यावर कचरा फेकणार नाही आणि कुणाला फेकू ही देणार नाही. मी माझ्या घरच्यांना आणि मित्रांना स्वच्छतेचे महत्व पटवून देईन. मी माझ्या भारताला स्वच्छ आणि सुंदर बनवेन कोणी साथ दिली किंवा नाही दिली तरी”. स्वच्छ भारत समृद्ध भारत. जय हिंद, जय भारत… स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा मराठी निबंध, भाषण

वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व

“आरोग्य हेच धन” अशी म्हण प्रचलित आहे पण आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आरोग्य हे पैशापेक्षा मौल्यवान आहे, गमावलेले पैसे कमावता येऊ शकतात पण आरोग्य परत मिळवणे कठीण असते. म्हणून आरोग्यदायी सवयी लावणे खूप महत्त्वाचे आहे.

मानवी शरीर आणि मन जोडलेले आहेत, त्यामुळे जर आपले शरीर स्वच्छ असेल तर मनही उल्हासित राहते. निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी असलेली व्यक्ती दीर्घ आणि सुखी जीवन जगते.

धुळी मध्ये जंतू असतात, ते हवेवाटे रोग पसरवतात. आपण क्रीडांगणातून किंवा शाळेतून घरी परत आल्यावर हात पाय धुतले पाहिजे किंवा स्नान केले पाहिजे . नियमित स्नान चांगली सवय आहे; त्याने आपले शरीर स्वच्छ आणि ताजे राहते. जेवणानंतर हात धुतले पाहिजेत, दिवसातून दोनदा ब्रश केला पाहिजे, जीभ क्लीनरचा वापर केला पाहिजे.

भांडी आणि कपडे वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. कपाटामध्ये डांबर गोळ्या ठेवल्याने कपड्याना वास लागत नाही. या छोट्या छोट्या सवयी आपल्याला निरोगी आयुष्याकडे नेतात.

रस्त्यावरील चाट ची चव चांगली लागते, पण स्वच्छतेबद्दल काय? आपण कधी रस्त्यावरील अन्न विक्रेत्याच्या हातांची, भांड्यांची तपासणी केली आहे का? ते पदार्थ कसे स्वच्छ करतात हे पाहिले आहे का? हे विक्रेते हातमोजे वापरत नाहीत आणि खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जातात, त्यावर माश्या बसतात, धूळ उडते. या अश्या सवयी आपल्या स्वास्थासाठी चांगल्या नाहीत.

आपणास अश्या सवयी बदलण्याची गरज आहे.स्वच्छतेच्या अश्या छोट्या छोट्या सवयीचा कंटाळा करून, दुर्लक्ष करून आपण आपल्या आरोग्यासोबत खेळत आहोत. इथे मराठी निबंधाचे प्रकार बद्दल वाचा.

मी अशी आशा करतो कि स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेख तुम्हाला आवडला असेल तर कृपया खाली चंगली रेटिंग द्या आणि कंमेंट करायला विसरू नका.धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange