निबंध भाषण

संगणक नसते तर मराठी निबंध, भाषण, लेख | Sangnak Computer Nasate Tar Essay in Marathi

Sangnak Computer Nasate Tar Essay in Marathi

संगणक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक कामामध्ये संगणकाचा उपयोग होतो.संगणक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक कामामध्ये संगणकाचा उपयोग होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे. पण जर संगणक नसतेच तर? संगणक नसते तर आपले आयुष्य आतासारखेच सुखकर असते का? संगणक नसते तर जग कसे असते? ह्या सर्व प्रश्नांचा उलगडा आपण ह्या निबंधातून करणार आहोत. 

संगणक नसते तर हा विषय शाळेमध्ये मुलांना सर्रास निबंध आणि भाषणासाठी सांगितलं जाते. आणि माझ्या मते तुम्ही हि नक्कीच ह्या निबंधाची इथे आले आहेत. तर ह्या लेखामध्ये आम्ही संगणक नसते तर हा निबंध दिला आहे. चला तर मग सुरु करूया.

संगणक नसते तर मराठी निबंध

आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत. त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीतअबँकस” (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसेंदिवस  या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या अलीकड़े संगणकाचा वापर सर्रास आणि अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण, सोशल मीडिया, जाहिराती अशा  अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे.

मराठी निबंध लेखन, संग्रह, विषय, भाषण टिप्स | Essay, Speech Topics in Marathi

एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया .

) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .

) अथकपणा :- आपण कितीही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .

) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करून दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किंवा देख्ररेखी शिवाय पार पाडतो.

) तंत्रज्ञानाचा अचूक वापरसंगणक हा तार्किक शास्त्राचे एक अचूक प्रतिक समजला जातो. दररोज होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानातील बदलाचा अचूक आणि योग्य तो वापर  करून घेणे हे संगणकाचे यश आहे.

आज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी संगणकाची गरज असते. वस्तू खरेदी करणे, मोठमोठ्या मॉल मध्ये जाऊन केलेली खरेदी, हॉटेलात खाणे झाल्यावर येणारे बिल, वा दवाखान्यात दाखल होणे . अनेक गोष्टी संगणकाच्या साहाय्यानेच पूर्ण होतात. या पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असत परंतु संगणकाने माहिती आणि तंत्रज्ञानात जी प्रगती घडवून आणली आहे त्यामुळे सर्वच कामे सोपी आणि सुकर झाली आहेत.

संगणकाचे स्वरूप सुद्धा काळानुसार बदलत गेले आहे ५० वर्षांपूर्वी एखाद्या चौकोनी डब्याच्या आकारात अवाढव्य दिसणारा संगणक आज मोबाईल च्या रूपात अगदी आपल्या हातात सामावलेला आहे. सर्वच क्षेत्रात संगणक महत्वाची कामगिरी बजावत आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा संगणक तुमची पाठ सोडत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच आज संगणकाच्या आधीन झाले आहेत.

मराठी, संस्कृत सुभाषिते, वचन, श्लोक, वाक्य संग्रह रत्न भांडार, अर्थ 

पण कधी विचार केलाय कि जर संगणक आपल्या आयुष्यात नसतील तर ? कोणीतरी येऊन थांब म्हणावे तसे आपले आयुष्य थांबून जाईल एवढे आपण संगणकावर अवलंबून आहोत. साधी सोपी आकडेमोड सुद्धा आपण त्याचाच आधार घेऊन करतो. असे म्हणतात कि मनुष्यप्राणी हा स्वावलंबी आहे परंतु संगणकाने आज आपल्या सगळ्यांनाच परावलंबी करून टाकले आहे. विचार करा कि एका तांत्रिक  रोबोट च्या हातात आपले सगळे आयुष्य आपण बहाल केलं आहे.

आज घरबसल्या केवळ बोटांच्या आधाराने आपण दैनंदिन जीवनातील सगळी कामे अगदी सहजरित्या पार पाडतो. लहान मुलांना मैदानी खेळापेक्षा विडिओ गेम्स जास्त आकर्षित करतात. मोठी माणसे दिवाळीची खरेदी एकत्र जाऊन करता एकाच घरात बसून संगणकाच्या द्वारे करतात आणि दिवाळी साजरी केली म्हणतात.

आज आपण प्रगतीपथावर जरी असलो तरी बदलत्या काळानुसार आपल्याला अनेक संकटाना सामोरे जावे लागणार आहे. पूर्वीच्या काळी आर्थिक सुबत्ता नसली तरी माणसे निरोगी होती. आज लहान वयातच वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. संगणका द्वारे जगातील कुठल्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते यातूनच नको त्या गोष्टी अगदी लहान वयातच मुलांच्या समोर येतात आणि परिणामी गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे. संगणकाच्या साहाय्याने आपण प्रगती केली आहे पण त्याचबरोबर एकत्र कुटुंबपद्धती दुरावत चालली आहे. घरातील सर्वच लहानमोठे सदस्य आजकाल एकत्र गप्पा मारताना कुठेच दिसत नाहीत. माणूस एकटा पडत चाललाय..

संगणक जर नसतील तर जगाचे सर्वार्थाने नुकसान होईल हे जेवढं खरं आहे तेवढंच दुरावलेली नाती एकत्र येतील हेही खरं आहे. म्हणूनच मला असं वाटतं कि संगणक हि माणसाची गरज बनता संगणकाला माणसाचा मित्र बनवायला हवं. शेवटी संगणक म्हणजे काय हो? माणसानेच निर्माण केलेली एक तांत्रिक आवृत्ती आहे. तिचा आपल्या आयुष्यात किती आणि कसा वापर करायचा हे आपणच ठरवायला हवे. थोडक्यात सांगायचे झालेच तर आपण जेव्हा घराच्या कुंडीत एखादे गुलाबाचे झाड लावतो तेव्हा त्याला खत पाणी घालून मोठे करतो, झाड बहरले कि त्याला येणारी सुंदर फुले तोडताना जेवढा आपण त्याला असणाऱ्या काट्यांचा विचार करतो ना तेवढाच आणि तितकाच विचार संगणकाच्या दुसऱ्या बाजूचा केला पाहिजे.

हे जेव्हा सगळ्यांना शक्य होईल  ना तेव्हा आपणच बनवलेला संगणक आपल्याला यशाच्या उंचच उंच शिखरावर नेऊन ठेवेल.

तर अशाप्रकारे आम्ही संगणक नसते तर हा निबंध दिला ह्या लेखामध्ये दिला आहे. तुम्हाला जर जा निबंध भाषण आवडले असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे मत आम्हाला कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 5 Average: 3.2]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)