पत्रलेखन

सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र – मराठी पत्रलेखन

सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र - मराठी पत्रलेखन

शाळेची सहल म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणीच जणू. शालेय सहलींमधून विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नेऊन तेथील ऐतिहासिक, भौगोलिक, आणि सामाजिक महत्व पटवून दिले जाते. अशा सहलींमधून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल माहिती मिळते आणि फिरायला मिळते त्यामुळे मुलेही उत्सुकतेने त्या ठिकाण बद्दल जाणून घेतात.

तर अशाच एका सहलीसाठी आपल्या वडिलांकडून परवानगी घेण्यासाठी लिहलेले पत्र कसे असेल, हे ह्या लेखातून आम्ही सांगायचं प्रयत्न केला आहे. मुलांना शाळेत विविध विषयांवर मराठी पत्रलेखन करावयास सांगितले जाते आणि शाळेतील सहलीसाठी परवानगी मागणारे पत्र हे त्यापैकीच एक. हे पत्र तुम्हाला तुमच्या गृहपाठ तसेच पत्रलेखनामध्ये मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र परगावी असलेल्या वडिलांना लिहा.

सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र


 || श्री ||

                                                                                              ‘दीप’

                                                                                               फ्लॅट नं.५, हडपसर

                                                                                               पुणे – ४११०२८

प्रिय बाबांना

             शि. सा. नमस्कार

दोन दिवसांपूर्वीच आईचे पत्र मिळाले. आपण सर्वजण खुशाल आहात हे वाचून आनंद झाला. बाबा, आमच्या शाळेची सहल रायगड, प्रतापगड येथे जाणार आहे. मला या सहलीला जाण्यासाठी परवानगी हवी आहे. म्हणूनच हे पत्र लिहीत आहे.

रायगड, प्रतापगड हे शिवरायांचे किल्ले आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणही आम्हाला दाखवणार आहेत. तेथील निसर्ग नयनरम्य आहे. आत्तापर्यंत या किल्ल्यांची वर्णने पुस्तकात वाचली. सहलीच्या निमित्ताने हे किल्ले आणि ठिकाणे आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतील. तसेच येताना आम्ही वाईमधील ढोल्या गणपतीचेही दर्शन घेणार आहोत. आपण मला सहलीला जाण्यासाठी परवानगी द्याल अशी अपेक्षा करतो.आमची ही सहल २३ डिसेंबरला निघणार आहे. ही सहल  तीन दिवसांची आहे. सहलीची वर्गणी ९०० रुपये आहे. सहलीची वर्गणी आणि आपले परवानगी-पत्र लवकरात लवकर पाठवावे, ही नम्र विनंती.

     घरातील सर्वांना माझा नमस्कार.

                                                                                        आपला आज्ञाधारक,

                                                                                         सागर शिंदे

प्रति,

प्रवीण शिंदे

रूम नं. १९, नागपूर चाळ,

जुन्नर – ४१००३२

प्रेषक

सागर शिंदे,

‘दीप’, फ्लॅट नं. ५,

हडपसर, पुणे- ४११०२८    


मी आशा करतो कि तुम्हाला हे पत्र आवडले असेल. जर ह्या लेखामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत झाली असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तूच विचार कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 32 Average: 4.3]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

2 Comments

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)