निबंध भाषण

सचिन तेंडुलकर – निबंध, माहिती मराठी मध्ये (माझा आवडता क्रिकेटपटू Sachin Tendulkar)

Essay on Sachin Tendulkar, A Role Model, Favourite Cricketer, Biography, Achievements Speech,
dnaindia.com

जेव्हा आपण भारतातील खेळांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला खेळ येतो तो म्हणजे क्रिकेट होय. क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडता खेळ आहे. भारतात खेळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच खेळ असे समीकरण झाले आहे. ज्याने व्यक्तीने भारतीयांना या परदेशी खेळाचे वेड लावले तो म्हणजे, सचिन तेंडुलकर- भारतीय क्रिकेटचा देव. जेव्हा जेव्हा आपण भारतीय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा सचिन तेंडुलकर हे नाव त्या संभाषणात येतेच.

लहान मुलांवर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक प्रभाव पडतो, म्हणूनच त्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूवर निबंध, भाषण, परिच्छेद लिहायला सांगितले जाते आणि बहुतेक वेळा या विषयाचा हिरो सचिन तेंडुलकरच असतो. नव्या पिढीत आजकाल महिंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली सुद्धा लोकप्रिय आहेत. आम्ही इथे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरबद्दल माहिती देण्याचे आम्ही ठरविले. या लेखात आपल्याला सचिन तेंडुलकर यांचे कुटुंब, बालपण, शिक्षण तसेच एक क्रिकेटपटू आणि राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द, त्याच्या कर्तृत्व आणि गुण याची माहिती निबंधाच्या रूपात देणार आहोत. या माहिती किंवा निबंधावरून तुम्ही भाषण सुद्धा लिहू शकता.

सचिन तेंडुलकर वर मराठी मध्ये निबंध (Essay on Sachin Tendulkar in Marathi)

सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वांत नामांकित आणि एकमेव असा खेळाडू आहे की ज्याची पूजा देखील केली जाते, ज्याला क्रिकेटचा देव समजले जाते. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (ओ.डी.आय.) क्रिकेट सामन्यांमध्ये आणि कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जास्त शतक बनवणाऱ्या तसेच सर्वात जास्त धावा काढणारे यादीमध्ये सचिन अग्रस्थानी आहे. कसोटी क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील सचिन तेंडुलकर हा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे ज्याने पन्नास शतके केली आहेत.

सुरुवातीचे आयुष्य आणि बालपण

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईच्या दादर येथील निर्मल नर्सिंग होममध्ये झाला होता. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर जे एकेकाळी महाराष्ट्रातील प्रख्यात कादंबरीकार होते, त्यांनी त्यांचे आवडते संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावर सचिनचे नाव ठेवले. त्याची आई रजनी विमा व्यावसायिक होती. नितीन, अजित आणि सविता ही सचिनची भावंडे.

सचिनने आयुष्याची पहिली काही वर्षे वांद्रे पूर्वेतील साहित्य सहवास सहकारी गृहनिर्माण संस्थेत घालविली. शाळेच्या काळात, तो नेहमीच इतर मुलांबरोबर भांडणासाठी नेहमी तयार असायचा आणि इतरांना दमदाटी करायला कधीही मागेपुढे पाहत नव्हता. अशा वागणुकीमुळे त्याच्या मोठा भाऊ अजितने त्याला क्रिकेटमध्ये गुंतवण्याचे ठरवले. त्यांनी सचिनला रमाकांत आचरेकर यांच्याकडे नेले, जे त्या काळातील सर्वात नामांकित क्लब क्रिकेटर आणि प्रशिक्षक होते. रमाकांत आचरेकर हे दादरच्या शिवाजी पार्क येथे क्रिकेट शिकवायचे.

आचरेकरांना तरुण सचिन आवडला आणि त्यांनी त्याला प्रशिक्षित करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी दादरमध्ये असलेल्या शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूलमध्ये सचिनची भरती करण्यास सुचवले जेणेकरून सचिनला क्रिकेटच्या प्रशिक्षणात जास्तीत जास्त वेळ देता येईल.

सचिन तेंडुलकरचा क्रिकेट प्रवास

प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर सचिनची क्रिकेटविषयीची आवड आणखीनच वाढली आणि त्याने शालेय क्रिकेटसाठी खेळायला सुरुवात केली. सचिनने शालेय क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन दाखविले म्हणूनच सचिनची 1987-88 च्या मोसमातील रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळण्यासाठी निवड झाली. दुर्दैवाने सचिनला पहिल्या अकरा सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही पण अनेकदा त्याला पर्याय म्हणून नियुक्त करण्यात आले. वयाच्या 15व्या वर्षी तो मुंबई येथे त्याच्या होम ग्राऊंडवर 11 डिसेंबर 1988 रोजी पहिला सामना खेळला.

त्या ऐतिहासिक सामन्यात सचिनने नाबाद १०० धावांची खेळी केली. यासह तो पदार्पण सामन्यात शतक ठोकणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी वानखेडे स्टेडियमवर सचिनचा खेळ पाहिला आणि अशा प्रकारे या सामन्यात खेळण्यासाठी त्यांची निवड केली. देवधर करंडक आणि दुलीप करंडक स्पर्धेतही त्याने पहिल्या सामन्यात शतके ठोकली.

1988-89 मध्ये सचिन मुंबईच्या क्रिकेट संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 1989-90 च्या मोसमात मुंबई संघाकडून खेळताना त्याने दिल्ली संघाविरुद्ध शतक झळकावले. सचिन ने 1988 आणि 1989 मध्ये इंग्लंड दौरे सुद्धा केले.

सचिनचे आंतरराष्ट्रीय करिअर

१९८९ मध्ये भारतीय संघासह सचिनला पाकिस्तान दौर्‍यासाठी प्रथम संधी मिळाली. १९८८ मध्ये भारतीय निवड समिती वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी सचिनची निवड करण्यासाठी उत्सुक होती परंतु सचिनने कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कॅरेबियन सामन्यांत वेगवान गोलंदाजांचा सामना करावा अशी त्यांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय रोखला.

वयाच्या १६व्या वर्षी त्याने पहिली कसोटी कराची येथे नोव्हेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळली होती. हा सामना म्हणजे वकार युनूसचाही पहिला आंतराष्ट्रीय सामना होता. या मॅच मध्ये वकार युनूसचा एक बाउंसर सचिनच्या नाकावर लागला, सचिन ने कुठलीही वैद्यकीय मदत न घेता खेळ सुरू ठेवला.

त्यानंतरच्या न्यूझीलंड दौर्‍यामध्ये त्याने कसोटीमध्ये ११७ धावा केल्या, त्या कसोटींमध्ये सर्वाधिक धावा ठरल्या. जुलै आणि ऑगस्ट १९९० मध्ये जेव्हा इंग्लंड भारतात दौर्‍यावर आला तेव्हा दुसर्‍या कसोटीत ११९ धावांची नाबाद खेळी करताना त्याने कसोटीत शतक झळकावणारा दुसरा सर्वात युवा फलंदाज होण्याचा मान मिळविला. या खेळीत सचिनने केलेल्या कामगिरीमुळे लोक आश्चर्यचकित झाले. इंग्लंडच्या सीमर्सविरूद्ध त्याच्या तंत्राची प्रशंसा केली गेली.

१९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍यादरम्यान सचिनने उत्तम कामगिरी केली. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद १८८ धावा फटकावल्या आणि त्यानंतर पर्थमध्ये ११४ धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ह्यूने एकदा अॅलन बॉर्डरला सांगितले की सचिन एक दिवस त्यांच्यापेक्षा जास्त धावा करेल.

१९९४ – १९९७: सचिनच्या कारकीर्दीचे गौरवशाली वर्षे

१९९४ ते १९९७ या काळात सचिन त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. या काळात त्याने जगाला आपला उत्कृष्ट खेळ दाखवून पूर्ण क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. १९९४ मध्ये ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात सचिन प्रथमच सलामी फलंदाज म्हणून सामन्यात उतराला आणि फक्त ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. लवकरच सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोलंबो येथे ९ सप्टेंबर १९९४ रोजी एकदिवसीय सामन्यात पहिले शतक झळकावले. ७९ सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्याने पहिले एकदिवसीय शतक झळकावले. तेंडुलकरने १९९६च्या विश्वचषकातही आपली उत्तम कामगिरी कायम ठेवली आणि दोन शतके ठोकून या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या.

वर्ष १९९८ हे सचिनच्या कारकीर्दीत एक महत्त्वाचे पाऊल ठरले. यावर्षी त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत सर्वाधिक धावा केल्या. सचिनने या मालिकेत भारताच्या विजयात सचिन तेंडुलकरचे महत्वाचे योगदान होते; त्याने या मालिकेत ३ शतके ठोकली. ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात भारताचे प्रतिनिधित्व करणारा लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन याच्यासोबत सराव करून या मालिकेसाठी तयारी केली होती.

सचिनचे मैदानावरील प्रदर्शन असे होते की ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नने कबूल केले की सचिन त्याच्या गोलंदाजीवर त्याला मैदानाबाहेर फटकेबाजी करत आहे असे स्वप्न पडले. शार्जामध्ये जेव्हा सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतके ठोकली आणि मालिका जिंकली. ही शतके क्रिकेटींग जगतात ‘डेसर्ट स्टॉर्म ’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ढाका येथे झालेल्या पहिल्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने १४१ धावा फटकावून आणि ४ विकेट्सही घेतल्या.

१९९९: वडिलांचा मृत्यू

१९९९ हे सचिनच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचे वर्ष होते. चेन्नईत पाकिस्तान विरुद्ध खेळताना लिटल मास्टरने पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून निर्धारित शतक झळकावले परंतु जेव्हा सचिन बाद झाला तेव्हा संघही कोसळला आणि सचिनचा उत्कृष्ट डाव निरुपयोगी ठरला.

सचिन १९९९ ची विश्वचषक ट्रॉफी भारतात आणेल अशी सर्व भारताला आशा होती. यादरम्यान, सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. सचिनने झिम्बाब्वेविरुद्धचा सामान्यांच्या वेळी आपल्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी हजर झाले. तेव्हा त्याच्या आईने त्याला परत जाण्यासाठी आणि आपल्या देशासाठी खेळायला सांगितले. सचिन तेंडूलरच्या वडिलांनीही हीच इच्छा होती. केनियाविरुद्धच्या शतकी खेळीच्या जोरावर त्याने संघाला सुपर-स्टेज मध्ये पोहचला.

वर्ष 2000

2000 मध्ये सचिन दुसऱ्यांना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला, या अगोदर तो 1996-97 मध्ये भारताचा कर्णधार होता, पण त्यावेळी त्याला भारतीय संघासाठी विशेष असे यश मिळवता आले नाही. संघाचा कर्णधार म्हणून सचिनचा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरला. त्याच्या कॅप्टन्सी मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचा पराभव झाला तसेच दक्षिण आफ्रिकेत कडून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सुद्धा पराभव पत्करावा लागला. या अपयशानंतर त्याने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आणि मग कर्णधारपद सर्व गांगुली यांच्याकडे सोपवण्यात आले.

2003 विश्वचषक

2003 चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक भारताला जिंकता आला नाही. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. 2003 विश्वचषक दरम्यान सचिनचा खेळ मात्र उल्लेखनीय होता, त्याने 11 सामन्यांत 673 धावा काढून मॅन ऑफ द टूर्नामेंट सुद्धा झाला.

त्यावर्षी सचिन तेंडुलकर चा एकदिवसीय क्रिकेटमधील फॉर्म खूपच उल्लेखनीय होता, त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सोबतच्या तिरंगी मालिकेत दोन शतके ठोकली. मालिकेच्या अंतिम कसोटी सामन्यांमध्ये सचिनने नाबाद 241 धावा केल्या. 2004 मध्ये सचिन तेंडुलकरला अनेक दुखापतीने भेडसावले, त्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध म्हणजे टेनिस एलबो. क्रिकेट जगतात असा खूप वेळा विनोद केला जातो की भारतीयांना टेनिस एलबो हा शब्द सचिन तेंडुलकर मुळे लक्षात राहतो.

2005 ते 2006 हा सचिन साठी अवघड वेळ होता, या काळात तो कुठलेही शतक मारू शकला नाही आणि त्याचा क्रिकेटिंग फॉर्म सुद्धा बिघडला होता. परंतु काही वर्षांनी परत फॉर्म मध्ये येऊन जगातील एक दिवशीय क्रिकेटमधील सर्वप्रथम 200 रन काढणारा व फलंदाज बनला. सचिन तेंडुलकर हा 2017 च्या विश्वचषक विजेते संघाचा भाग होता. तीन दशके वाट पाहिल्यानंतर सचिनचे स्वप्न त्यादिवशी पुरे झाले.

सचिन तेंडुलकर ची राजकीय कारकीर्द

एप्रिल 2012 मध्ये, सचिन तेंडुलकरला राज्यसभा सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले. जनतेचा याबाबतीत संमिश्र प्रतिसाद होता. त्यांनी 4 जून रोजी पदाची शपथ घेतली. राज्यसभेच्या कार्यकाळात कमी उपस्थिती असल्याबद्दल सचिनला काही वादांना तोंड द्यावे लागले. राज्यसभेच्या 12 जागांपैकी एका जागेवर सचिन ची निवड झाली होती, या बारा जागांवर “साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या विषयांत विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या लोकांचे नामांकन केले जाते”.

माझा आवडता खेळाडू : सचिन तेंडुलकर निबंध

सचिन हा जागतिक क्रिकेटमधील एक महान फलंदाज आहे. त्याच्या नावावरती अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. त्याचा संयम आणि क्रिकेटची तंत्र याचे गुण सारे क्रिकेट जग गाते. सचिन तेंडुलकर हा फक्त फक्त त्याच्या विक्रमासाठी नव्हे तर त्याच्या विनम्र वागणुकी साठी, स्पोर्ट्समनशिप साठी सुद्धा ओळखला जातो. क्रिकेट फॅन्स कडून अगदी क्रिकेटचा देव म्हणून झाल्यानंतरही ही सचिन ने कधी अहंकार दाखवला नाही. त्यामुळेच तो साऱ्यांना आवडतो, आणि खूप साऱ्यांचा आदर्श सुद्धा बनतो.

24 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीत त्याला खूप वेळा जखमा झाल्या. या सर्वांशी झुंजत तो देशासाठी खेळत राहिला यातून सचिनचे समर्पण आणि ध्यास दिसतो. त्याच्या कारकीर्दीत खूप वेळा त्याला खराब फॉर्म आणि दुखापतीने त्रस्त केले. परंतु त्याने हार न मानता आपली कामगिरी चालू ठेवली, तो मेहनत करत राहिला आणि एक महान खेळाडू बनला.

यातून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. आयुष्यात चढ उतार येत राहतात, अशा परिस्थितीत खचून न जाता आपण आपले काम करत राहायचे, आणि त्यांनीच नशीब बदलते आणि यश मिळते. आयुष्यात आलेल्या अडचणींना घाबरून रडत बसण्यापेक्षा त्यांना तोंड देणे हेच शहाणपण, हे आपल्याला सचिन तेंडुलकरने शिकवले.

सारे क्रिकेट जगत सचिन वर अमाप प्रेम करते; क्रिकेटमधून, ॲडव्हर्टायझिंग मधून त्यांनी खूप पैसाही कमावला पण त्याने यश डोक्यात जाऊन दिले नाही, त्याचा अहंकार केला नाही.मोठ्या माणसाचे हेच लक्षण असते, आणि म्हणूनच जनता त्यांच्यावर वर्षानुवर्षे प्रेम करत राहते. सचिन तेंडुलकरच्या या सार्‍या गुणांमुळे तो माझा आवडता खेळाडू, क्रिकेटपटू, किंवा आदर्श आहे.


वर दिलेल्या माहितीचा किंवा निबंधाचा वापर आपण भाषणासाठी सुद्धा करू शकता. सचिन बद्दल दिलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या आर्टिकल ला चांगली रेटिंग द्या आणि तसेच सचिन बद्दलचे आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange