सूत्र संचालन

शालेय परिपाठ सूत्रसंचालन मराठी – Paripath Sutrasanchalan in Marathi

मी प्राथमिक शाळेत असताना शाळेमध्ये काही महिने परिपाठ होत असे, शाळेतील हा नवीन कार्यक्रम मला खूप आवडला होता. पण काही महिन्यानंतरच तो उपक्रम बंद करण्यात आला. आताच्या मुलांना परिपाठ काय आहे आहे माहित देखील नाही आणि कदाचित शिक्षकांनाही याबद्दल माहिती नाही. आणि जर माहिती असेल तर त्यांना यामध्ये रुची नसावी. म्हणून पहिल्यांदा आपण परिपाठ म्हणजे काय असते, त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया. आणि मग परिपाठामध्ये आपण काय काय करू शकतो हे बघूया. परिपाठामध्ये एक किंवा दोन विद्यार्थी-विद्यार्थिनी सूत्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडतात, या सुत्रसंचालनासाठी लागणारी माहितीही आपण पाहूयात.

परिपाठ म्हणजे काय?

जेव्हा सकाळी शाळा भरते आणि पटांगणामध्ये राष्ट्रगीत गायले जाते, प्रतिज्ञा म्हणली जाते त्यासोबतच आणखी काही उपक्रम घेतले जातात. जसे प्रार्थना, सुविचार, पंचांग, दिनविशेष, बातमीपत्र, प्रश्नमंजुषा, बोधकथा, सामान्य-ज्ञान, इंग्रजी शब्दार्थ, पाढे, पसायदान, समूहगीत इत्यादी.

परिपाठाचा काही फिक्स फॉर्मुला नाही, शिक्षक परिपाठाचे नियोजन आपापल्या प्रकारे करू शकतात. त्यामध्ये ते त्यांच्या अभ्यासानुसार आणि मुलांच्या आवडीनिवडीनुसार विविध उपक्रम जोडू शकतात. परिपाठ घेताना एक किंवा दोन विद्यार्थी परिपाठाचे सूत्रसंचालक म्हणून काम करतात. विविध उपक्रमांचा परिचय करून देणे ही सूत्रसंचालकाची जबाबदारी असते.आपण याचे एक उदाहरण डिटेल मध्ये खाली पाहूयात.

परिपाठाचे फायदे?

परिपाठ तसा वर्गामध्ये ही घेतला जाऊ शकतो पण परिपाठ पटांगणात घेण्याचे आणखीही खूप फायदे आहेत. परिपाठ पटांगणामध्ये घेतल्याने विद्यार्थ्यांना सामूहिक शिक्षणाचे फायदे मिळतात आणि त्याचे महत्त्वही कळते. मोकळ्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढते.

परिपाठात राबवले जाणारे उपक्रम जर विद्यार्थ्यांच्या आवडीचे असतील तर ते त्यामध्ये मनापासून भाग घेतात. त्यांची विचारशक्ती, सर्जनशीलता यामुळे वाढते. परिपाठा मुळे मुलांची शाळेमध्ये उपस्थिती सुद्धा वाढू शकते. जेव्हा दिवसाची सुरुवात हसत-खेळत होते तेव्हा दिवस हि खूप चांगला जातो. विद्यार्थी संध्याकाळी हसत-खेळत घरी जातात आणि दिवसभर ही आनंदाने अभ्यास करतात.

प्रत्येक विद्यार्थ्यांची आपली प्रतिभा असते, परिपाठामध्ये त्यांना आपली प्रतिभा प्रदर्शित करता येते. जसे ज्यांना चांगले दाता येते ते एखादे सुंदर गाणे परिपाठामध्ये जाऊ शकतात. ज्यांना सामान्य ज्ञानाची आवड आहे त्याबद्दलची माहिती ते परिपाठामध्ये देऊ शकतात. एकाने जमा केलेली माहिती, अर्जित ज्ञान साऱ्यांना मिळू शकते त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांचा एकूण फायदाच होतो.

परिपाठाच्या उपक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना एकत्रपणे तयारी करावी लागते, विविध विषयांवरची माहिती जमा करावी लागते, सराव करावा लागतो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये मैत्री होते. प्राथमिक शाळेत झालेली अशी मैत्री हे आयुष्यभरासाठी पुरते.

परिपाठामध्ये घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधानाबद्दल ची माहिती, देशभक्तीपर गीते आणि संबंधित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाबद्दलचा आदर वाढतो. परिपाठा मुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा शिस्त सुद्धा वाढते.

परिपाठ नियोजनासाठी काही टिप्स

शिक्षकांनी परिपाठाचे नियोजन करताना काळजी घ्यावी की सारे उपक्रम दहा ते पंधरा मिनिटात संपतील. जर परिपाठ जास्तवेळ लांबवला तर कदाचित विद्यार्थ्यांना तो कंटाळवाणा वाटू शकतो. सारे उपक्रम हे उभ्यानेच घेऊ नये.

विद्यार्थी जर प्राथमिक शाळेतील असतील तर परीपाठासाठी लागणारी माहिती कुठून जमा करावी ती कशी छाटावी याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा.

शिक्षकांनी काळजी घ्यावी की परिपाठ हा विद्यार्थ्यांना गृहपाठा सारखा वाटू नये. उलटे, परिपाठ हा त्यांना एक फन ऍक्टिव्हिटी म्हणून वाटला पाहिजे आणि तरच ते अगदी मनापासून यात भाग घेतील आणि तरच परिपाठाचे खरे फायदे त्यांना मिळू शकतात.

परिपाठ सूत्रसंचालन

आपण वरती पाहिलेच की परिपाठाचे सूत्रसंचालन एक किंवा दोन विद्यार्थी-विद्यार्थिनी करू शकतात. त्यांची जबाबदारी असते की परिपाठामध्ये येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचा परिचय करून देणे. हा परिचय रोज विविध प्रकारे केल्याने त्या सूत्रसंचालकाची क्रिटिविटी दिसून येते. ते शब्दांची बंधन करायला शिकतात, भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना हे गुण खूप उपयोगी पडतील. आता आपण पाहुयात की या विविध उपक्रमांचा परिचय कसा करता येऊ शकतो.

परिचय / ओळख :

माझे नाव………. आहे आणि मी आज या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे; तर चला सुरुवात करुया..

दिवस आज छान आहे… गर्वाने माझी मान ताठ आहे… तुमच्या परवानगीने मी आता परिपाठाची सुरुवात करत आहे….

आपल्या शाळेचा आहे काही वेगळाच थाट… आपल्या शाळेसारखी नाही कुणाचीच बात… घेऊन आलोय मी आज तुमच्यासाठी आजचा परिपाठ…..

सूर्याच्या सोनेरी किरणांची… झाली धरणीशी गाठ. चला सर्व सुरू करूयात आजचा परिपाठ….

राष्ट्रगीत : या भारत राष्ट्राचे महात्म्य थोर आहे… याच्या चरणाशी माझे जीवन अर्पण आहे… चला वाढवू याचा आज सन्मान… बोलून एक साथ “मेरा भारत महान”…… एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर…

प्रतिज्ञा : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहूती दिली त्यांनी मरणाची… चला घेऊया प्रतिज्ञा त्या देशाला जपण्याची……एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर…

संविधान : आंबेडकरांनी दिले आपल्याला संविधानाचे ज्ञान…. चला करूया त्यांचे गुणगान….त्यांचे गुणगान…

दिनविशेष : आयुष्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, आणि प्रत्येक दिवशी काही ना काही घडत असते.. आज या दिवशी मागच्या शंभर वर्षात काय काय घडले ते जाणून घेऊयात…

आजच्या बातम्या : रोज नवीन काही घडत आहे… भारत मंगळावर पोहोचला… सीरियातील युद्ध काही संपत नाही.. सिंगापूरला लोकशाही काही मिळत नाही… असेच खूप काही आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आजच्या बातम्या या उपक्रमामध्ये….

बोधकथा : आपणास आजूबाजूचा निसर्ग, मनुष्य, प्राणी, पक्षी, नदी-नाले रोज काही ना काही शिकवत असतात. खूप काही आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखे; कदाचित, आयुष्यही कमी पडेल.. एवढे सारे.. आजची बोधकथा ही आपल्याला असंच काहीतरी नवीन शिकवणार आहे.. चला स्वागत करूयात समीर चे…

तुम्ही अशी मराठी परिपाठ सूत्रसंचालनाची अनेक उदाहरणे सतीश बोरकडे यांच्या ब्लॉगवर पाहू शकता, मी इथे तुम्हाला लिंक देत आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर याला चांगली रेटिंग द्या आणि कमेंट section मध्ये आपले मत दर्शवा.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 3 Average: 4.7]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange