मराठी निबंध भाषण

पाण्याचे महत्व मराठी माहिती निबंध भाषण लेख Importance of Water in Marathi

पाण्याचे महत्व मराठी निबंध भाषण लेख- Importance of Water Essay in Marathi

पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरिक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन पाण्याचे असते. शरीरातले पाणी जर कमी झाले तर आरोग्याला गंभीर अपाय होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या क्रियांसाठी पाण्याचा वापर होतो. म्हणूनच आम्ही ह्या लेखामध्ये पाण्याचे महत्व ह्या विषयावर मराठी माहिती, निबंध व भाषण दिले आहे. मुलांना शाळेमध्ये पाण्याचे महत्व ह्या विषयावर बऱ्याचदा निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. म्हणूनच हा पाण्याचे महत्व मराठी निबंध,  माहिती व भाषण तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर सुरु करूया.

पाण्याचे महत्व मराठी माहिती निबंध भाषण लेख

पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत घटक आहे. पाणी नसेल तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्व आहे.अन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रूपात बाहेर टाकणे यासाठी पाण्याचाच उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते.

पाणी अन्नाच्या प्रत्येक उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे रोजच्या १५00 ते २000 आवश्यक कॅलरीजसाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) पिणे प्रत्येक दिवसाला गरजेचे असते. आपल्याला येणारा घाम, मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सजिर्त केले जाते. या उत्सर्जनाच्या प्रमाणात आपला पाणी पिण्याचा रोजचा कोटा असावा. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.

आपण निरोगी राहण्यासाठी पाणी तर लागतेच; पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोगजंतूविरहित असावे लागते. पिण्याच्या पाण्यामधून अनेक प्रकाराचे विषाणू, जीवाणू, रोगजंतू, जंत आणि विषारी पदार्थ शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे जरुरी असते.

त्यासाठी -पाणी गाळून घेऊन १0 ते १५ मिनिटे उकळल्यास त्यातील अनावश्यक क्षार निघून जातात आणि पाण्याचा जडपणा नष्ट होतो, तसेच त्यातील बरेचसे जीवजंतू नष्ट होतात.0.५ ग्रॅम क्लोरिनच्या गोळ्या पाण्यात टाकल्यास ते निर्जंतुक होते. बाजारात अनेक प्रकारचे पाण्याचे फिल्टर्स आणि छोटी-मोठी शुद्धिकरण उपकरणे मिळतात. आपल्या रोजच्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करणे हितावह ठरू शकते.

पाणी आपले जीवन. पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का ? देशातील जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते दुषित होत चालले आहेत. आपण आपल्या हाताने पाण्याचे हे स्तोत्र नष्ट करत आहोत का ? पुढील पिढ्यांसाठी आपण ह्या प्रदूषित नद्या, दुषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात अडथळा करणे ह्याने आपण आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळ जवळ दोन तृतीयांश नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत तर बाकीच्या प्रदूषित झाल्या आहेत . शेती साठी लागणारी जमीन आहे पण प्रदूषित पाण्यामुळे पीकही घेवू शकत नाही अशी आपल्या इथल्या शेतकर्याची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन केल्याने दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे.

आणि जो पाणीसाठा शिल्लक आहे त्यात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, नदीकिनारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ,वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभारच लावत आहोत.

जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत नि निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशात आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाट उचलू शकतो.

महाराष्ट्रात नाशिकला कुंभमेळा भरतो करोडो लोक तेथे स्नान करून पावन होतात. परंतु गोदावरी नदी हि अत्यंत प्रदूषित झालेली आहे. मेगासेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह ह्यांनीकुंभ मेळ्यात मुख्यमंत्र्यांनीच आधी स्नान करून आचमन करून दाखवावे असा उपरोधिक टोला लावला आहे.’ ह्या वरून बोध घेवून सरकारने नद्या प्रदूषित होवू नये म्हणून पावले उचलणे गरजेचे वाटते.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण पाणी पितो. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी पेलाभर पाणी घेतो. मात्र, खूपदा एखाद दुसरा घोट पाणी पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. हे दृश्य घरी, समारंभात बऱ्याचदा पाहायला मिळते. हे फेकून दिलेले पाणी आपण मोजले, तर आपण पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो हे कळेल. असा प्रयोग आपण आपल्या घरीही सहज करू शकता. दिवसभरात किती पाणी वाया जाते ते बघा.

बऱ्याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ऐका. कुठे पाणी वाहते आहे याचा शोध घेऊन नळ बंद कराविनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल, तर त्याला समज द्या. जनजागृती कराकुंडीमध्ये पाण्याचा ओलावा ठेवू शकता आणि सेंद्रीय कोरड्या तणाचा वापर करा.

हे तण ओले करून त्याचे आच्छादन दिल्याने कुंडीतील झाडास पाणी कमी लागते. हे तण ओलावा धरून ठेवतेघरातील फिशटँक वारंवार धुऊ नका. तो पूर्ण भरत असाल, तर निम्म्याने धुवा. आठवड्यातून काही ठराविक दिवस तो स्वच्छत करण्याचे बंधन पाळा. फिशटँकमधील पाणी कुंड्यांना घाला.

अशा प्रकारे योग्य नियोजन केले तर आपल्याला पाण्याचे महत्व समजले असे म्हणता येईल.


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये पाण्याचे महत्व ह्या विषयावर मराठी माहिती, निबंध व भाषण दिले आहे. मी अशी अशा करतो कि हा निबंध, मराठी माहिती तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 74 Average: 4.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

3 Comments

Secured By miniOrange