निबंध भाषण मराठी

निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेख

निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व - मराठी निबंध, भाषण, लेख

या लेखामध्ये आम्ही निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व मराठी निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये दिला आहे. नागपंचमी बद्दलची ही मराठी माहिती तुम्हाला शाळेमध्ये गृहपाठ निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व विषयावर मराठी निबंध, भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

In this article, we are giving you sample essay on Nature in Marathi language. You can use content of this essay for other related topics like nature my best friends, nature is my teacher, importance of nature etc. The first essay is suitable for students of class 8,9,10,11,12th etc. In next section we have given a simple short essay on importance of nature, this essay is good for kids of class 3,4,5,6,7 etc. Let’s jump to the essay them, shall we?

निसर्ग  मराठी निबंध, भाषण (Speech, Essay on Nature in Marathi)

सृजनकर्त्याने पहिल्यांदा निसर्ग बनवला; वातावरण, पाणी, जीवाणू , झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी आणि मग मानवाचा जन्म आणि विकास झाला. या निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व असूच शकत नाही, आणि हे विधान विज्ञान सुद्धा मानते. आपल्या आकाशगंगेमध्ये लाखो तारे, ग्रह आहेत काही पृथ्वीपेक्षा मोठे तर काही छोटे. पण आपल्या निरीक्षण योग्य अवकाशात मात्र एकाच ठिकाणी जीवन सापडते ती जागा म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरच्या जीवनाचा आरंभ कसा झाला? का झाला? कशामुळे झाला? असे पृथ्वीवर काय वेगळे आहे की या ताऱ्यांच्या, ग्रहांच्या गर्दीमध्ये फक्त इथेच जीवन दिसते, फुलते आणि बहरते.

पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग. या वातावरणाशीवाय, निसर्गाशिवाय कुठल्याही ग्रहावरती जीवन बहरू शकत नाही. या सौरमंडलात आपण अशा अमूल्य ठिकाणी राहत आहोत, आपलं पूर्ण अस्तित्वच या निसर्गाने मांडले आहे.

 

[emaillocker id=10751]

जेव्हा एखादा नवीन ग्रह बनतो तो लाव्ह्याचा एक जळता गोळा मात्र असतो, हा गोळा अवकाशात लाखो वर्ष फिरत राहतो. तो हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते पण या प्रक्रियेत सुद्धा लाखो वर्षं निघून जातात.

अशा लाखो वर्षांच्या मेहनतीनंतर ग्रह जेव्हा पुरेसा थंड होतो तेव्हा जीवनचक्राचे पहिले पाऊल ग्रहावरती पडते, ते म्हणजे वातावरण बनण्याची सुरुवात. कुठलही ग्रहावरती वातावरण बनण्यासाठी कार्बोन डाय ऑक्साइड सारख्या ग्रीन हाऊस वायूंची गरज असते. तिथल्या जमिनीवरच्या रासायनिक प्रक्रियेतून, ज्वालामुखी मधुन हे ग्रीनहाउस वायू बाहेर पडतात आणि हळूहळू वातावरण बनायला मदत करतात.

लाखो वर्षांच्या या प्रक्रियेनंतर तो ग्रह संतुलित होतो, जर तिथे पाण्याचे अस्तित्व निर्माण झाले तर जीवनाची दुसरे पाऊल उचलले जाते. जिवाणूंच्या रूपामध्ये जीवनचक्र आपले काम चालू करते. परत एकदा लाखो वर्षांच्या उत्क्रांती नंतर छोटे छोटे प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, सजीव रूप घेऊ लागतात. हळूहळू त्या ग्रहावरती निसर्ग आपले अस्तित्व प्रस्थपित करायला सुरुवात करतो आणि मग हा निसर्ग प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, कीटक वाढवतो. आणि मग तिथून जीवनचक्राचा पुढचा लाखो वर्षांचा प्रवास सुरू होतो.

पृथ्वीवरच्या सजीवांचा इतिहास असाच आहे, करोडो वर्षांच्या अश्या मेहनतीनंतर पृथ्वीवर जीवन अवतरले आणि फुलले. देव म्हणा किंवा बिग बँग, निसर्ग हा मानवाला दिलेला सगळ्यात मोठा उपाहार आहे. या निसर्गाने आपल्याला फक्त जन्म दिला नाही तर आपले संगोपनही केले आहे. आपल्या उत्क्रांतीमध्ये या निसर्गाचा खूप मोठा वाटा आहे. मानवाच्या आणि इतर सजीवांच्या उत्क्रांतीसाठी लागलेले अन्न, पाणी, निवारा याच निसर्गाने दिला.

[/emaillocker]

 

निसर्ग आपल्याला फळे, फुले, भाज्या, धान्य देतो; पिण्यासाठी, साफसफाईसाठी पाणी देतो, घर बांधण्यासाठी लाकूड देतो या निसर्गाशिवाय मनुष्य जीवनाची सुरुवात ही करू शकला नसता. या निसर्गाच्या अंगाखांद्यावर मनुष्य प्रगत होऊ लागला त्याने हत्यारे बनवली, आग पेटवली, चाकाचा शोध लावला आणि या शोधाने मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. या सर्वासाठी लागणारी सामग्री आणि कल्पना मनुष्याला कुठून भेटली? या निसर्गाकडूनच.

नवीन बनवलेल्या दगडांच्या हत्याराने तो शिकार करू लागला, आगीच्या साहाय्याने तो ती शिकार शिजवून खायला शिकला. मनुष्याचे पोषण होऊ लागले, पुढे चाकाच्या साहाय्याने मनुष्य विविध ठिकाणी वेगाने पोचू शकला. मानवाच्या प्रगतीमधील या तीन घटना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत आणि हा उपहार आपल्याला या निसर्गाने दिला आहे.

हजारो वर्षांच्या प्रगतीनंतर मनुष्यजीवन सुधारू लागले. मनुष्य इमारती बांधू लागला, कपडे शिवून घालू लागला, औषधांनी रोग दूर ठेवले, माणसाचे आयुष्य वाढले. अल्पवयीन मृत्यू कमी झाल्याने जीवनकाळ वाढला. या सर्वांमुळे माणसांची मनुष्याची लोकसंख्या वाढू लागली, समाज बनू लागले, भाषेची, लिपीची गरज भासू त्यातून हळूहळू परंपरा, संस्कृती निर्माण होऊ लागल्या. मानवाच्या प्रगतीपथावर ही निसर्गाने त्याची साथ दिली. या प्रगती साठी लागणारी सर्व सामग्री या निसर्गाने आपल्याला दिली. पुढे मनुष्याने विजेचा शोध लावला, रस्ते बांधले, नौका बनवल्या, समुद्र प्रवास चालू केला यामागची कल्पना आणि प्रेरणा मानवाला निसर्गाकडूनच मिळाली.

मनुष्य आता खूप प्रगत झाला आहे त्याच्याकडे आता उंच उंच इमारती, चांगले रस्ते, विमाने, शस्त्रे, विज्ञान आणि ह्या मधील सर्व काही आहेत. मनुष्य मोठी स्वप्न पाहू लागला, त्याच्या मूल गरजा सहज भागू लागल्या, आणि तो आता भौतिक सुखांच्या मागे पळत आहे. मोठे घर, मोठी गाडी इत्यादी. या सुखांसाठी लागणारी सामग्री कुठून येते? या निसर्गाकडूनच.

मनुष्याच्या प्रगतीसोबत त्याची महत्वकांक्षा सुद्धा वाढली आता मनुष्य दुसऱ्या ग्रहांवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे जीवन बनवण्याचा प्रयत्न करतोय. अवकाश संशोधनातील उन्नत देश मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण या जीवनाचे चिन्ह काय आहे? कुठल्याही ग्रहावर जीवन सुरू होण्यासाठी निसर्ग लागतो, वातावरण लागते, समतोल तापमान लागते.

आपण पृथ्वी वरती असलेल्या सुंदर निसर्गाचा दिवसेंदिवस ऱ्हास करत आहोत आणि दुरच्या ग्रहांवर तोच निसर्ग बनवण्यासाठी धडपडत आहोत. याला मानवाची दांभिकता किंवा ढोंगीपणा (hypocrisy) बोलता येईल. आपल्याकडे जे आहे त्याचा नाश करून नसत्याच्या मागे पाळण्यामध्ये माणसाला वैज्ञानिक प्रगती चा आनंद मिळत आहे. विज्ञानाने आपल्याला शेकडो सुख सुविधा दिल्या आहेत पण ह्या विज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ग्रहांचा शोध घेण्यापेक्षा आपल्या पृथ्वीला कसे सुखरूप आणि सुंदर ठेवता येईल याकडे दिला पाहिजे.

प्रदूषण, वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या भयानक समस्या आपल्याला भेडसावत आहेत. या सर्वांवर निसर्गाचे संगोपन हा एकच तोडगा आहे, आज निसर्ग जपण्याची खूप गरज आहे. ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला, आपले संगोपन केले, आपल्या प्रगतीचा सोबती झाला त्याच निसर्गाकडे आपला विनाश करण्याची ही ताकद आहे. आपण या निसर्गाची लूट करत आहोत त्याला जखमी करत आहोत. काही देश तर या निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते क्लायमेट कंट्रोल शस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

अशी शस्त्रे ज्यांनी वाटेल तेव्हा, वाटेल तिथे पाऊस, दुष्काळ, पूर, भूकंप, वादळ निर्माण करू शकतात. ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला त्या निसर्गाचा विनाश करण्याचा आपण प्रयत्न करतोय आहे. आणि हे असेच चालू राहिले तर हा निसर्गच आपला एक दिवस विनाश करेल.

आपल्या या नवीन पिढीला एकत्र यावं लागेल, निसर्गाचे संगोपन करावे लागेल. प्रदूषण कमी झाले पाहिजे, वृक्षारोपण वाढले पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणात राहिली पाहिजे; या सर्वांवर विचार झाला पाहिजे नवीन पिढी एकत्र आली तरच आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना एक सुंदर, विशाल निसर्ग देऊ शकतो.

सूचना: ह्या निबंधांमध्ये दिलेली माहिती तुम्ही वेगवेगळ्या संबंधित निबंधासाठी सुद्धा वापरू शकता जसे की निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निसर्गाचे महत्त्व, निसर्ग आणि मानव, निसर्गाची सुंदरता, निसर्गाचे महत्व इत्यादी.

निसर्गाचे महत्त्व लघुनिबंध (Importance of Nature – Short Essay, Paragraph)

This is simple essay for school kids of class 4,5,6,7 etc.

निसर्गाने आपल्या या मानव जातीला जन्म दिला आहे, तिचे संगोपन केल आहे. मानवी जीवनात निसर्गाचे खूप महत्त्व आहे. निसर्ग आपल्याला हवा, पाणी, अन्न, धान्य, सर्व काही देतो; या बदली कुठली किंमतीही मागत नाही.

उंच आकाशात उडणारी विमाने, आकाशाला भिडणाऱ्या इमारती, जलद गतीने चालणाऱ्या गाड्या यासुद्धा निसर्गातून मिळालेल्या सामग्री पासूनच बनतात. मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे, तरीसुद्धा आपण त्या निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. प्रदूषण, वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, पृथ्वीचे वाढते तापमान अश्या हत्यारांनी आपण निसर्गाला जखमी करत आहोत. आपण निर्मागावर प्रेम केलं पाहिजे, त्याला मित्र, सोबती सारखं वागवलं पाहिजे.

इथे खाली आम्ही काही संबंधित निबंध थिम बद्दल बोलणार आहोत. आम्ही यासाठी पूर्ण निबंध देत नाही पण वरील दिलेल्या निबंधातून तुम्ही नक्कीच खूप सारी माहिती खालील निबंध लिहण्यासाठी वापरू शकता.

निसर्गाची सुंदरता निबंध भाषण – Nature’s Beauty

निसर्गाची सुंदरता या थिम मध्ये आपण आपल्या निसर्गाच्या अविस्मरणीय सुंदरते बद्दल बोलू शकतो. वेगवेगळे ऋतू, वनस्पती, प्राणी, समुद्र, नद्या, नाले, पर्वत रांगा, आकाश, पाऊस, वसंत ऋतू मधला बहर अशा शेकडो सुंदर गोष्टी या निसर्गामध्ये आहेत. एवढेच नाही तर निसर्ग कुठलाही स्वार्थ न बाळगता, कुठलीही अपेक्षा न ठेवता सगळ्यांना स्वमनाने देत राहतो ही सुद्धा एक खूप सुंदर गोष्ट आहे आपण या थिम मद्ये या बद्दल सुद्धा बोलू शकता.

निसर्ग माझा मित्र निबंध भाषण – Nature My Best Friend

निसर्ग माझा मित्र किंवा सोबती या थिम मध्ये आपण निसर्ग आणि मानवामधील संबंधांबद्दल बोलू शकतो. उदाहरणार्थ निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपणास शांतता मिळते, आपण रोजच्या समस्यांपासून दूर जातो; याठिकाणी निसर्ग अगदी एखाद्या खरा मित्रा सारखा आपली साथ देतो. पावसातला गारवा, लहरींचा आवाज, वार्‍याची गूंज, आकाशातील चंद्र चांदण्या हे सर्व अनुभव आपल्याला शांत आणि प्रसन्न करतात अगदी एका सहचारी किंवा मित्रासारखे . शांत आणि संतुलित मन आपणास योग्य कार्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, आरोग्य व्यवस्थित ठेवते; याठिकाणी निसर्ग आपल्या पालकांसारखे वागतो, आपले संगोपन करतो, आपले संरक्षण करतो यासारख्या विषयावर तुम्ही निसर्ग माझा मित्र किंवा सोबती या निबंधांमध्ये बोलू शकता.

निसर्ग माझा गुरु शिक्षक – Nature My Teacher

निसर्ग माझा गुरु किंवा शिक्षक या थिम मध्ये आपण आपणास निसर्गाकडून मिळणाऱ्या शिकवणीबद्दल बोलू शकतो. निसर्ग निस्वार्थपणे आपल्याला पावलोपावली मदत करत असतो, आपल्यासाठी अन्न-धान्य, पाणी, हवा देतो आणि त्याबदली तो काही किंमत घेत नाही आणि कुठलीही अपेक्षा ठेवत नाही ही एक प्रभावी शिकवण आहे. ही शिकवण मोठ्या संत, साधूंनी सुद्धा दिली आहे. या थिम अंतर्गत आपण अश्या निसर्गाकडून मिळालेल्या शिकवणी बद्दल बोलू शकतो.

जर तुम्हाला हा निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व मराठी माहिती, निबंध, भाषण आवडला असेल तर कृपया खाली कंमेंट्स मध्ये आम्हाला कळवा. तसेच रेटिंग द्यायला विसरू नका.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 290 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

15 Comments

Secured By miniOrange