सूत्र संचालन

निरोप समारंभ कविता, शायरी, चारोळ्या मराठी मध्ये

निरोप समारंभ कविता, शायरी, चारोळ्या मराठी

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला निरोप समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या काही सुंदर कविता, शायरी आणि चारोळ्या यांचा संग्रह देत आहोत. कृपया लक्ष द्या की या कविता, शेर किंवा चारोळ्या आम्ही लिहिलेले नाहीत. आम्ही इथे फक्त एक संग्रह बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यांचे कवी, लेखक यांची माहिती सहजरीत्या उपलब्ध नसल्याने त्यांची नावे इथे देता आली नाहीत.

आम्ही शिक्षक सेवानिवृत्ती निरोप समारंभ साठी एक भाषण आणि एक मनोगत लिहिले आहे. त्याची लिंक तुम्हाला इथे मिळेलच, तो लेख वाचून घ्या. इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, कुठल्याही सूत्रसंचालनात किंवा भाषणात उगाचच कविता, चारोळ्या, शेरोशायरी, आवर्तने वापरू नका. त्यांचा त्या विषयाशी, कार्यक्रमाशी संबंध असेल तरच त्यांचा वापर योग्य वाटतो. फक्त सगळे वापरतात म्हणून तुम्ही कविता, चारोळ्या वापरू नका, त्याचा विषयाशी संबंध लागणे खूप खूप महत्त्वाचे असते. नाहीतर तुमच्या प्रेक्षकांना तुमचे सूत्रसंचालन किंवा भाषण नीरस वाटेल, ते त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतील.

निरोप समारंभ चारोळ्या संग्रह

करून जावे बरेच काही
निघून येथून जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या
निरोप शेवटी घेताना

आठवणी आपल्या सोबतच्या
पुन्हा पुन्हा आठवतात नयन सागरात दाटलेल्या
अश्रूंना त्यात तर पाठवतात

वाटले नाही कधी मला
निरोप आपला घ्यावा लागेल
सदा हास्य रुपी गालावर लपलेला
अश्रूचा थेंब नकळत उघडेल ओघळेल

आठवण एक प्रवाह आहे
हवे तसे वळवता येते
दुःखद आठवणीने रडता-रडता
सुखद आठवणीने असता येते

आठवणी हसवतात
आठवणी रडवतात
काहीच न बोलता
आठवणी निघून जातात
तरी आयुष्यात शेवटी
आठवणीच राहतात

रुसले होते भाव कधीचे,
शब्द जोडीला नसताना
पण कसे सुचवावे शब्दांना
तव स्मृतीत गुंतले असताना

काही माणसे हरवतात
डोळ्यासमोर दिसत असली तरी
आणि काही मात्र दिसत राहतात
डोळ्यासमोर नसली तरी

प्राजक्ता भरलेली ओंजळ
भोवती सहकाऱ्यांचा वेढा
हरवलेत आता एक क्षण सुगंधाचे
उरलाय फक्त आठवणींचा सडा

जवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही
नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही

निरोप द्यायचा कोणी
निरोप घ्यायचा कोणी
आपण सारे
निरोपाचेच धनी

निरोप नव्हे हा
ओलावा माणुसकीचा
विसरू कसे आम्ही
क्षण हा सौख्याचा…

यापुढच्या चारोळ्या तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पाहू शकता

आज घेउया निरोप आपण
विरह दाटतो उरी
असू द्या या प्रेमच सर्वावरी
प्रेमच सर्वावरी

निरोपाच्या हळव्या क्षणी
दाटून येती आठवणी
डोळ्यात साठते पाणी
अन मुक होते वाणी

पुढील चारोळ्या साठी तुम्ही हा व्हिडिओ पहा

निरोप समारंभ कविता

(1) मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो तो
गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला

(2) निरोपाचा क्षण नाही; शुभेच्छांचा सण आहे
राहुल बाहेर पडताना रेंगाळणार मन आहे
निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात
हसू आणत दुसऱ्यात आसू
मन नितळ नितांत आठवणीत
आम्ही जातो मम ग्रहाची देवा निरोप द्यावा सख्याहारी हरी

निरोप समारंभ शायरी

विदाई की है घड़ी
है मुश्किल बड़ी
कामना जीवन की तुम्हारी हो पूरी
यही है शुभकामना हमारी।।

विदाई का है दिन
माहौल है गमगिन
है ये आशा पूरी हो तुम्हारी
हरेक अभिलाषा।।

विदा होकर आज यहाँ से चले जाओगे
पर आशा है यही की जहाँ भी जाओगे खुशीयाँ ही पाओगे।।

भोर गमगीन होकर, ख़बर लाई है
दिन भी बैचेन है, धूप घबराई है
आपको हम फेयरवेल, दे दें मगर
दिल सुबकने लगा, आँख भर आई है।

आपसे ही शान, आपसे पहचान देखी है
निष्ठा और समर्पण की, दास्तान देखी है
आपके प्रयासों से, हमने इस कॉलेज की
ज़मीं से आसमाँ तक की उड़ान देखी है।

—-from rekhta.org———–
उस को रुख़्सत तो किया था मुझे मालूम न था
सारा घर ले गया घर छोड़ के जाने वाला – निदा फ़ाज़ली

आँख से दूर सही दिल से कहाँ जाएगा
जाने वाले तू हमें याद बहुत आएगा -उबैदुल्लाह अलीम

जाते हो ख़ुदा-हाफ़िज़ हाँ इतनी गुज़ारिश है
जब याद हम आ जाएँ मिलने की दुआ करना -जलील मानिकपूरी

Note: तुम्हाला आमचे हे निरोप समारंभासाठीचे कविता, चारोळ्या, शायरी चे कलेक्शन आवडले असेल तर खाली आम्हाला चांगली रेटिंग द्या. तुम्ही तुमच्या कमेंट्स खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 3 Average: 1.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange