निबंध भाषण मराठी

माझी आजी – मराठी निबंध, भाषण, लेख

माझी आजी मराठी निबंध भाषण लेख marathi essay

आजी म्हटलं कि आठवते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा, आजीच्या गमतीदार गोष्टी, आजीचे लाड, प्रेम आणि बरंच काही. आपली आजी म्हणजे अखंड प्रेमाचा झराच जणू. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा माझी आजी या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही माझी आजी या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला माझी आजी ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

माझी आजी – मराठी निबंध, भाषण, लेख

मला आई बाबा रागावले की, मी आजीकडे धाव घेते. मग आजी मला प्रेमाने जवळ घेते. आई-बाबांचे आजीपुढे काहीच चालत नाही. उलट त्यांनाच म्हणते, लेकरू लहान आहे रे, रागावू नका रे. त्यामुळे मी पदराआड लपते. ती मला प्रेमाने जवळ घेऊन ‘ अगं राणी, असे वागू नये. चांगले वागावे, मोठ्यांचे ऐकावे, असा उपदेश करते. तिचा प्रेमळ स्वभाव मला फार आवडतो.  

माझ्या आजीचा वेश म्हणजे साधी सुती साडी व तसलेच पोलके. आणि कपाळावर भले मोठे कुंकू. हे माझ्या आजीचे दृश्यरूप आहे. तिचे राहणीमान अत्यंत साधे आहे. आजीला दागिन्यांचा सोस नाही. वयाची साठी उलटली असली तरी आजीच्या चेहऱ्यावर तेज आहे. दिवसभर काम करूनही ती हसतमुख असते. ‘कंटाळा’ हा शब्द तिच्या जीवनात नाही.

आजीचा स्वभाव धाडसी आहे. कोणतेही संकट आले तरी ती त्यास हसतमुखाने तोंड देते. माझ्या आजोबांना खूप बरे वाटत नव्हते. पण एवढ्या मोठ्या संकटात पण आजीने त्यांची रात्रंदिवस सेवा करून  त्यांच्यावरचे संकट दूर केले. आता आजोबा छान हिंडतात-फिरतात. त्यांचे खाणे, पिणे, फिरणे, जागरण याकडे आजोबा आजारी असल्यापासून अगदी आजी काटेकाळजीने लक्ष देते. त्यामुळेच आजोबा पूर्णपणे बरे होऊन फिरत आहेत. आजी जुन्या साड्यांच्या उबदार व मजबूत अशा सुंदर चौघड्या शिवते. स्वयंपाक तर आजी इतका सुंदर करते की तिच्या हाताची सर दुसऱ्या कुणालाच येणार नाही. ‘स्वच्छता’ हा तर आजीचा स्थायीभाव आहे. शिक्षणाविषयी तिला फार गोडी वाटते. हा तिच्या स्वभावातला एक विशेष भाग आहे.

माझी आई मराठी निबंध, भाषण, लेख | Essay on My Mother, Majhi Aai in Marathi

आजीने वयाची पंच्च्याहत्तरी ओलांडली आहे. पण आजी थोडीही वाकलेली नाही. अजूनही ती ठणठणीत आहे. आताही ते दोघे महिन्यातून २-३ वेळा गावाला जातात आणि शेतात काम करतात. गावाला गेल्यावर आजीच्या हातचे मस्त चुलीवरचे जेवण मला खूपच आवडते.

माझ्या आजी आजोबांना गावाला राहायला खूप आवडते पण आम्हा भावंडांसाठी ते पुण्याला राहतात. गावाला असल्यावर आमच्या आजी आजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असतो. सुट्टीमध्ये आम्ही सर्व भावंडे आणि आजी आजोबा गावाला खूप धमाल करतो. शेतामध्ये जातो, नदीला मासे पकडायला जातो. दिवाळीच्या सुट्टीदरम्यान आमच्या गावची यात्रा असते. त्यावेळी सर्व नातेवाईक, आणि आम्ही सर्वजण गावाला एकत्र जमतो. देवाचा कार्यक्रम, आणि प्रसन्न असे वातावरण त्यावेळी असते. गावातील मंदिरे खूप सजवलेली असतात. खूप खेळणी, लावण्यांचे कार्यक्रम, वेगवेगळी दुकाने, मिठाई त्यावेळी विकायला असते. त्यावेळी गावात सर्वांच्याच  घरी पुण्याहून पाहुणे आलेले असतात. खूपच मज्जा येते. घरी आलेल्या सर्व पाहुण्यांचा पाहुणचार आजी अगदी मनापासून करते. अशाप्रकारे वर्षातून किमान दोनदा आम्ही गावाला जातो.

आजीचा दैनंदिन कार्यक्रम बघून आश्चर्य वाटते. चोवीस तासांपैकी पंधरा-सोळा तास ती काम करत असते. सकाळी पहाटे ती ५ वाजता उठते. आंघोळ करून ती एक तास पोथी वाचते व रात्री सुद्धा ती एक तास वाचन करते. तिला भजन म्हणायला खूप आवडते. तिला कीर्तन ऐकायलाही खूप आवडते. टी.व्ही. वरील ठराविक कार्यक्रम – बातम्या, मालिका ती आवडीने पाहते. तिने लहानपणापासूनच आम्हा सर्व भावंडाना खूप छान सांभाळले आहे. खूप चांगले संस्कार दिले आहेत. ती आम्हा सर्व भावंडांना रात्री झोपताना त्यांच्या जुन्या गोष्टी, गमतीजमती सांगते. लहानांसाठी लहान तसेच मोठ्यांसाठी मोठी होणारी ही आजी सर्वांना हवीहवीशी वाटते. आजीचे हे साधे, कर्मकठोर राहणीमान हाच माझ्यापुढील आदर्श आहे.  


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये भ्रष्टाचार संपला तर ह्या विषयावर निबंध भाषण दिले आहे. मी अशा अशा करतो कि हा निबंध भाषण तुम्हला उपयोक्ता ठरेल. जर तुम्हाला हा निबंध भाषण आवडले असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 19 Average: 4.5]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)