निबंध भाषण मराठी

मराठी, संस्कृत सुभाषिते, वचन, श्लोक, वाक्य संग्रह रत्न भांडार, अर्थ 

मराठी, संस्कृत सुभाषिते, वचन, श्लोक, वाक्य संग्रह रत्न भांडार, अर्थ 

मराठी भाषा हि ज्ञानाची गंगा म्हणून ओळखली जाते. या ज्ञानाच्या गंगेत न्हाऊन पावन होण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलांना मराठी भाषेचे महत्व, तथा सखोल ज्ञान मिळण्यासाठी निबंध लेखन करण्यास सांगितले जाते. निबंध लेखनातून मुलांना भाषेचे अलंकार, उपमा, व्याकरण, विरामचिन्हे इत्यादींचे ज्ञान मिळते. विविध प्रकारच्या निबंधांमध्ये मुलांनी मराठी, संस्कृत सुभाषितांचा वापर करावा असे अपेक्षित असते. मराठी, संस्कृत सुभाषितांचा वापर केल्याने मराठी भाषेतील तुमचे ज्ञान दिसून येते तसेच निबंधाला हि शोभा येते. पण त्यासाठी योग्य ते मराठी, संस्कृत सुभाषित वापरता आले पाहिजे तसेच त्या सुभाषितांचा अर्थ हि समजला पाहिजे. थोडक्यात काय तर मराठी संस्कृत सुभाषिते वापरल्याने तुमचा निबंध, मराठी लेखन, भाषण परिपूर्ण होते.

म्हणूनच आम्ही ह्या लेखामध्ये मराठी, संस्कृत अशा दोन्ही भाषांमधील काही प्रसिद्ध सुभाषिते, वचन, वाक्ये दिली आहेत. हि मराठी संस्कृत सुभाषिते, वचन, वाक्ये संग्रह तुम्हाला तुमच्या निबंध, मराठी लेखन, भाषण, वक्तृत्व स्पर्धांमध्ये मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

मराठी, संस्कृत सुभाषिते, वचन, श्लोक वाक्ये संग्रह, रत्न भांडार 

 1.      नाही निर्मळ जीवन काय करील साबण.
 2.      महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती.
 3.      ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
 4.      वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे.
 5.      मोडेन पण वाकणार नाही.
 6.      पाचामुखी परमेश्वर.
 7.      केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.
 8.      आधी प्रपंच करावा नेटका मग जावे परमार्थविवेक.
 9.      सत्य नेहमी कटू असते.
 10.   निंदकाचे घर असावे शेजारी.

मराठी निबंध लेखन, भाषण, लेख, संग्रह

 1.   भिक्षापात्र अवलंबणे | जळो जिणे लाजिरवाणे |
 2.   कन्या सासुरासी जाए| मागे परतोनि पाहे|
 3.   आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदची अंग आनंदाचे |
 4.   आपुले मरण पाहिले म्यां डोळा | तो जाहला सोहळा अनुपम्य |
 5.   आम्ही जातो आपुल्या गावा | अमुचा राम राम घ्यावा |
 6.   जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति | देह कष्टविती उपकारे |
 7.   जें का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले | तोचि  साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा |
 8.   जोडोनिया धन उत्तम वेव्हारे | उदास विचारे वेच करी |
 9.   देवाला जे शरण गेले, त्यांची कुळे खरी शुद्ध.
 10.   ज्यांना देव आवडतो तेच पवित्र व सोवळे.
 11.   ज्यांचा आवडता देव | अखंडित प्रेमभाव |
 12.   सहज चाली चालता पायवाटे | चिंतामणीसमान होती गोटे |
 13.   अणुरणिया थोकडा | तुका आकाशाएवढा |
 14.   कानडीने केला मऱ्हाटाभ्रतार | एकाचे उत्तर एका नये |
 15.   तुका म्हणे तोचि संत | सोसी जगाचे आघात |
 16.   मोले घातले रडाया | नाही आसू आणि माया |
 17.   निश्चयाचे बळ | तुका म्हणे तेचि फळ |
 18.   सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वताएवढे |
 19.   ओले मातीचा भरवसा | का रे धरिसी मानसा |
 20.   पाहो ग्रंथ परी | आयुष्य नाही हाती |

मराठी निबंध लेखन, संग्रह, विषय, भाषण टिप्स  

 1.   जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे | अंत हे काळीचे नाही कोणी |
 2.   पोटा एका साटी | तुका म्हणे जाले कष्टी |
 3.   अवगुणांचे हाती | आहे अवघी फजिती ||
 4.   आशाबद्ध जना काय जाणे नारायण ||
 5.   शुद्ध बिजापोटी | फळे रसाळ गोमटी ||
 6.   काय दिनकरा | केला कोंबड्याने खरा ||
 7.   नाही काष्ठाचा गुमान | गोवी भ्रमर सुमन ||
 8.   चुकलिया माये | बाळ हुरु हुरु पाहे ||
 9.   चावल्यावाचून गिळत नाही अन अनुभवावाचून कळत नाही.
 10.   नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी ||
 11.   हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
 12.   तू माझी माऊली | मी तुझी तान्हुली || गोरस वो घाली | प्रेमपान्हा ||
 13.   मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सूर्याशी ||
 14.   मरावे परि किर्तीरुपे उरावे.
 15.   अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक
 16.   जे जे भेटे | ते मानिजे भगवंत |
 17.   तुका म्हणे, उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे |
 18.   पावसाळ्याविना पाऊस आणि प्रसंगाविना माणूस प्रगट होत नाही.
 19.   प्रत्येकाजवळून शिकण्यासारखे काहीतरी असतेच. मग ती स्वतः मलिन होऊनही दुसऱ्याला स्वच्छ करणारी केरसुणी असो.  
 20.   देव्हाऱ्यातील देवता आत्म्याचं स्वातंत्र्य सांगते, तर बेटावरील स्वातंत्र्यदेवता राष्ट्र्राच स्वातंत्र्य प्रतिपादन करते.

मराठी निबंधाचे प्रकार, निबंध कसा लिहावा, कसा असावा? Types of Marathi Essays

 1.   जोडलेल्या पैशापेक्षा जोडलेली माणसं आयुष्यात उपयोगी पडतात.
 2.   स्वतःच्या सुखदुःखाच्या तराजूवर दुसऱ्याचं सुखदुःख तोललं तर त्याच खरं मोल कळतं.
 3.   सारी सुखं पैशांनी विकत घेता येत नाहीत.
 4.   स्त्री म्हणजे वात्सल्याचा झरा | ममतेची मूर्ती म्हणजे स्त्री.
 5.   झाकली मूठ सव्वालाखाची असते आणि ती सांभाळायची असते.
 6.   बापाला जो घाव सोसतो तो आईला सोसतोच असं नाही. जे वादळ अस्मान पेलत ते जमीन पेलतेच असं नाही.

तर अशा प्रकारे आम्ही हि मराठी, संस्कृत सुभाषिते, वचन, श्लोक, वाक्ये संग्रह ह्या लेखामध्ये दिली आहेत. हि सुभाषिते, वचन, श्लोक, वाक्ये समजण्यास अतिशय सोपी आहेत. म्हणूनच आम्ही या सुभाषितांचा अर्थ दिलेला नाही आहे. जर तुम्हाला आवश्यक असेल तर आम्ही नक्कीच ह्या मराठी संस्कृत सुभाषिते, वचन, वाक्ये यांचा अर्थासकट लेख लिहू.

जर तुम्हाला हा लेख आणि ह्यातील सुभाषिते, श्लोक, संग्रह आवडली असतील तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि जर तुम्हाला एखाद्या सुभाषितांचा अर्थ माहित करून घ्यावयाचा असेल तर खाली कंमेंट सेकशन मध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 4 Average: 4]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Comment

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)