पत्रलेखन

ख्रिश्चन मित्रास नाताळच्या शुभेच्छा देणारे पत्र – मराठी पत्रलेखन

ख्रिश्चन मित्रास नाताळच्या शुभेच्छा देणारे पत्र - मराठी पत्रलेखन

डिसेंबर महिना जवळ येताच सर्वजण आतुरतेने वाट पाहतात ती नाताळची. हिवाळ्याच्या मस्त गुलाबी थंडीत एकमेकांना शुभेछया देऊन, गोडधोड पदार्थ खाऊन सर्वजण नाताळ म्हणजेच ख्रिसमस च आनंद लुटत असतात. मित्र, कुटुंबीय एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांना भेटवस्तू देतात.

आजकालच्या मोबाईल आणि इंटरनेट च्या जगात सर्व जण जवळ आले आहेत. काही सेकंदांमध्ये जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी आपण बोलू शकतो आणि विडिओ कॉल द्वारे पाहू हि शकतो.

पण पूर्वी असे नव्हते. पूर्वी लोक एकमेकांना नाताळच्या तसेच विविध सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहत. अशा पत्रांमधून प्रेम आणि आपुलकीची जाणीव होते. म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर पत्रलेखन करण्यास सांगितले जाते. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला “आपल्या ख्रिश्चन मित्रास नाताळच्या शुभेच्छा देणारे पत्र” दिले आहे. हे पत्र तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तसेच गृहपाठामध्ये मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

तुमच्या एखाद्या ख्रिश्चन मित्रास नाताळच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.                                         

ख्रिश्चन मित्रास नाताळच्या शुभेच्छा देणारे पत्र


                                                ‘श्री गणेश’,

                                                                                         १/१५, माणिकबाग

                                                                                         सिंहगड रोड

                                                                                         पुणे- ४११०४१

प्रिय दोस्त जॉन,

             सप्रेम नमस्कार आणि शुभ नाताळ.

       डिसेंबर महिना संपला आणि मला तुझ्या घरील नाताळच्या आणि दरवर्षी आपण केलेल्या मजेच्या नाना आठवणी येऊ लागल्या. तेवढ्यातच आमंत्रण आले.

कृपया जॉन मला माफ कर, पण यंदाच्या वर्षी मात्र मी नाताळात तिकडे येऊ शकणार नाही. कारण यंदा आम्हाला नाताळची सुट्टीच नाही. त्यामुळे यावर्षी आपण एकत्र उत्साह साजरा करू शकणार नाही. असो, तेव्हा यंदाचा येणार नाताळ तुला आणि तुझ्या कुटुंबियांना आनंदात जावो, अशा शुभेच्छा येथूनच व्यक्त करतो. सोबतच एक भेटकार्ड पाठवत आहे. ते मी स्वतः तयार केले आहे. नाताळच्या पाठोपाठ येणारे नवे वर्षही तुला आनंदाचे व वैभवाचे जावो. तुझा नाताळचा सण कसा साजरा झाला, याबद्दलचे सविस्तर पत्र मला पाठव.

        तुझ्या घरच्यांना माझा नमस्कार सांग.

                                                                                                तुझा मित्र,

                                                                                               ओंकार पवार

प्रति,

 जॉन डिसुझा

 रूम नं. २२, लक्ष्मी रोड,

मुंबई-४४

प्रेषक

  ओंकार पवार

 ‘श्री गणेश’, १/१५ माणिकबाग,

सिंहगड रोड, पुणे- ४११०४१


मी आशा करतो कि तुम्हाला हे पत्र आवडले असेल. जर ह्या लेखामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत झाली असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तूच विचार कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange