निबंध भाषण मराठी

अतिवृष्टी, महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख

महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख

मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी, महापूर हे अशाच एका आपत्तीचे नाव आहे. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा महापुराचे थैमान या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते.

ह्या लेखामध्ये आम्ही अतिवृष्टी, महापुराचे थैमान या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला महापुराचे थैमान  ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

अतिवृष्टी, महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख

मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो जर एखाद्या वाहनाला फार मोठा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाली तर त्यांना उपचारासाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी समाजातील अनेकजण धावपळ करतात. एकंदरित सांगावयाचे झाल्यास मानवी संवेदनामुळेच ही सकारात्मक कृती समाजाकडूनच घडते तसेच यामध्ये प्रशासनाच्या वतीनेसुध्दा योग्य ती दखल घेतली जाते, म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे

भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

गावात येणारे महापूर वा अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते

दरवर्षी सातत्याने येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी, अज्ञान तसेच माहितीचा अभाव यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी, कमीत कमी जीवित वित्त हानी होईल याची खात्री करण्यासाठी आपत्तीला सहज बळी पडणाऱ्या वर्गाचे रक्षण करण्यासाठी, आपत्तीनंतर दैनंदिन जीवन उध्वस्त होऊ नये याची तयारी करावी लागते.

आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृध्द, महिलां तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातर जमा करण्यासाठी याशिवाय आपत्ती काळात पाणी पुरवठा, जनावरांना चारा, खानपान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील. याची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक ठरते

२६ जुलैचा पूर ज्यांनी अनुभवला त्यांच्या आयुष्यातील ते तीन दिवस त्याचे दूरगामी परिणाम विसरूच शकणार नाहीत. या निसर्गाच्या तांडवाचा मुंबईकरांवर जबरदस्त परिणाम झाला आणि तो हरेक क्षेत्रात दिसला. पुढील काळात मुंबईची अशी अवस्था होऊ नये यासाठी राज्यकर्त्यांनी काय उपाय योजले त्याचेनेमकेकाय झाले हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले आहेच. मात्र सरकारी यंत्रणांच्या पलिकडे मुंबईच्या मुंबईकरांच्या आयुष्यात या घटनेनंतर अनेक बदल झाले. हे बदल वैयक्तिक, विज्ञानपर्यावरण तंत्रज्ञानाच्याही पातळीवर होत गेले.

या पूराने सर्वात पहिला बदल घडवला तो पावसाकडे पाहण्याच्या दृष्टीत. मुसळधार पाऊस मुंबईकरांना नवा नव्हता. दरवर्षी एकदा तरी लोकल बंद पडल्याशिवाय पाऊस पडल्यासारखे वाटत नाही, हा संवाद २६ जुलैपूर्वीही होता. मात्र महापुराने ही भाषाच बदलली. त्यानंतर जेव्हा जेव्हा मुंबईत मोठा पाऊस झाला तेव्हा त्याची तुलना २६ जुलैशी केली गेली. त्यानंतरचा प्रत्येक मोठा पाऊस मुंबईकरांच्या काळजात धडकी भरवणारा ठरला.

पूर्वी ट्रेन बंद पडतच होत्या. घरी पोहोचायला एक तासाऐवजी चारपाच तास लागत. मात्र २६ जुलैने ही वेळ दोनतीन दिवसांवर नेली. गेल्या दहा वर्षांत पुन्हा असा पाऊस लागला नसला तरी मुसळधार पाऊस सुरू झाला की मुंबईकरांच्या हृदयाचा एक ठोका चुकतो. सकाळी पाऊस सुरू झाला की माणसे घराबाहेर पडताना बिचकतात. पाऊस हा आता भीती घेऊन येतो.

मुंबईत नद्या? मिठी नदीच्या पुराने हाहाकार घडवल्याचे लक्षात आल्यावर मुंबईकरांना सर्वात आधी हा प्रश्न पडला होता. वांद्रे खाडीकडे येणारा नाला अनेकांना माहिती होता. मात्र ही मिठी नदी आहे आणि याच प्रकारे पोईसर, दहिसर, ओशिवरा अशा चार नद्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात याचा मुंबईकरांना शोध लागला. अर्थात शोध लागला आणि कोटय़वधी रुपये खर्च केले तरीही या नद्यांची अवस्था आजही नाल्यांपेक्षा बरी नाही, हे वास्तव उरतेच.

समुद्रकिनारा म्हणजे फिरायला जाण्याचे ठिकाण असे ठरवलेल्या मुंबईकरांना २६ जुलैने भरतीओहोटीची भाषा समजावली. समुद्रातील भरतीओहोटी हा फक्त विज्ञानातील एका वाक्यात उत्तरे देण्याचा विषय होता. मात्र तो थेट मुंबईकरांशी जोडला गेला. चंद्र, सूर्य, खाडीतील जीवसंस्था, मत्स्योत्पादन.. अशा सतराशे साठ गोष्टी भरतीओहोटीशी संबंधित असल्या तरी मुंबईकरांना मात्र भरती म्हणजे पाणी साठण्याच्या वेळा वाटतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की भरतीच्या वेळा विचारून घराबाहेर पडण्याचा मुहूर्त ठरवला जातो.

वेधशाळेचे अंदाज खिल्ली उडवण्यापुरतेच असतात असे वाटत असले तरी २६ जुलैनंतर मुंबईची वेधशाळा आधुनिक करण्यासाठी त्वरेने पावले उचलण्यात आली. अत्याधुनिक, पाचशे किलोमीटर परिसरात लक्ष ठेवणाऱ्या डॉप्लर रडारची मागणी तेव्हाच सुरू झाली. प्रत्यक्षात चीनवरून डॉप्लर आणण्यात अनेक सुरक्षा मानके आड आली आणि अखेर देशी बनावटीचे एस बॅण्ड रडार लावण्यासाठी मात्र २०११ वर्ष उलटले.

एकमेकांच्या सोबतीने २६ जुलैची रात्र रस्त्यावर काढणाऱ्यांना आयुष्यभराचे मित्र सापडले. हातात हात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढणाऱ्या हजारो लोकांनी शासकीय यंत्रणांची वाट पाहिली नाही.

त्यानंतर उत्तराखंडात महापूर आला खरा. प्रचंड थैमान घालून गेला. हजारो यात्री अडकून बसले, त्या प्रलयंकारी महापुरात अनेक इतिहासकालीन मंदिरांचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता कि तात्काळ मदत पाठविणेही अवघड झाले होते. अशाही परिस्थितीत मदतीचा हात घेऊन पुढे आले ते  म्हणजे आपले भारतीय सैनिक. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले.

पुरामुळे जसे प्रचंड नुकसान होते तसेच त्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करायला हवा तो म्हणजे त्याचे फायदे पुरामुळे भूजल पातळीत वाढ होऊन तलाव, नद्या, विहिरी, ट्यूबवेल इत्यादींच्या पातळीत वाढ होते. पूर आला कि तलावाच्या पाण्यात नैसर्गिक कचरा, पोषकतत्वे मिसळली जातात त्यामुळे  मासळ्यांची वाढण्यास मदत होते. जमीन सुपिक होते. त्यामुळेच महापूर जसा प्रचंड नुकसान घडवून आणतो तसेच काही फायदेही देतो.

महापूर आला कि थैमान घालतो खरा. पण जाताना शिकवून जातो ती एकमेकांमधली माणुसकी. कठीणप्रसंगी ओळख पाळख बघता एकमेकांना केली जाणारी मदत.


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये अतिवृष्टी, महापुराचे थैमान ह्या विषयावर निबंध भाषण दिले आहे. मी अशा अशा करतो कि हा निबंध भाषण तुम्हला उपयोक्ता ठरेल. जर तुम्हाला हा निबंध भाषण आवडले असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 47 Average: 4.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange