निबंध भाषण मराठी

जीवनात खेळाचे महत्त्व निबंध, भाषण, लेख मराठीमध्ये

जीवनात खेळाचे महत्त्व निबंध, भाषण, लेख मराठीमध्ये

ह्या लेखामध्ये जीवनात खेळाचे महत्त्व ह्या विषयावर निबंध व भाषण दिले आहे. मुलांना शाळेमध्ये जीवनात खेळाचे महत्त्व ह्या विषयावर बऱ्याचदा निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. म्हणूनच हा जीवनात खेळाचे महत्त्व निबंध व भाषण तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

जीवनात खेळाचे महत्त्व निबंध, भाषण, लेख मराठीमध्ये

राहुलयेराहुल….?? चलतोयस ना?? किती रे हा उशीर.. सर्व मुलं येऊन पण गेली असतील..

तु जर आता दहा म्हणायच्या आत बाहेर नाही पडलास तर मी निघून जाईन हां.. आणि परत कधी तुझी वाट पण बघणार नाही.

मी कधीपासून राहुलच्या घराच्या व्हरांड्यात बसून त्याच्या येण्याची वाट पाहत होतो. राहुल माझ्याच क्लासमध्ये आहे. आम्ही रोज शाळा सुटल्यावर गावाबाहेरच्या मोठ्या मैदानात खेळायला जातो. आज कितीतरी वेळ झाला तरी राहुल घरातून बाहेर पडण्याचे नावच घेईना. एव्हाना माझे एक ते दहा अंकसुध्दा बोलून झाले होते. मी निघण्यासाठी वळतच होतो कि राहुल धावत मागून येऊन मला जोरात मिठी मारून सॉरी सॉरी म्हणू लागला. “चल ठिक आहे.. आज लास्ट चान्स तुला. मी लटकेच रागवत राहूलला माफ केले. ॅक्च्युअली मलाच राहुल सोबत खेळायचे होते.’हि इज माय बेस्ट पार्टनर इन गेमम्हणून मग मला त्याच्यावर जास्त रागवताच आले नाही.

मग आम्ही दोघेही खेळाचे साहित्य घेऊन मोठ्या मैदानाकडे निघालो. मैदान पुर्णपणे सामसुम होते. या वेळेत पुर्ण मैदान गजबजलेले पाहायला मिळायचे. पण आज पुर्ण मैदान सहा वाजले तरी दुपारच्या शांत झोपेत गढून गेलेले. आम्ही आमचा नेहमीचा व्यायाम केला आणि पुन्हा बाकीच्या मित्रांची वाट पाहू लागलो.

वाट पाहता पाहता साडेसात वाजूनही गेले पण कुणाच्याच येण्याचे चिन्ह दिसून येत नव्हते. मग आम्हीही निराश होऊन माना खाली घालून घरी परतलो. उद्या सकाळी शाळेत जाऊन प्रत्येकाची खरडपट्टी करायचे ठरवले.

दुसरा दिवस उजाडला.. मी आणि राहूल सगळ्या मित्रांना भेटलो. तर त्यांच म्हणणं होतं कि नुसत खेळून काही फायदा होत नाही. आमचे आईवडिल म्हणतात कि अभ्यास केला तर चांगल यश मिळत. खेळल्यामुळे आपलं आभ्यासात लक्ष नाही लागत. आणि मग आपणबनतो. म्हणून आमच्या मम्मी पप्पांनी बाहेर खेळायला जायला सक्त मनाई केलेय. त्यांच हे बोलण ऐकल्यावर मला खूप भीती वाटू लागली. म्हणजे उद्या माझे मम्मी पप्पासुध्दा मला खेळायला जायला नको म्हणाले तरया एका विचारानेच माझं शाळेत लक्षच लागत नव्हते. शाळा सुटल्यावर मी घरी आलो.

खाता पिता सरळ माझ्या रूममध्ये खिडकीजवळ बसून हातात चेंडू घेऊन भींतीवर आपटू लागलो. माझी नजर कुठेतरी शुन्यात लागलेली. आज मी खूप विचार करत होतो. मला काहीच करूसे वाटत नव्हते सारे अवसान गळून गेल्यासारखे जाणवत होते. माझे बाबा रिटायर्ड मिलिट्री ऑफिसर आहेत. मला त्यांच्याजवळ खूप साय्रा खेळाबाबत माहीती मिळायची. पण मला आज ते प्रश्नसुध्दा बाबांना विचारायला भीती वाटत होती. त्यांनी जर या गोष्टींना होकार दिले तर माझेही सगळे खेळ आपोआप बंद होतील. मग हा विचार आला आणि बाबांकडे जायचे टाळले.

सकाळपासून मी खोलीतून बाहेर नाही पडलोय हे बाबांना कळल्यावर बाबानी माझ्या खोलीकडे धाव घेतली. मला असं अस्वस्थ बसलेला पाहून त्यांनी मला काय झालय हे खोदून खोदून विचारायला सुरवात केली. मला बाबांपासून जास्त काही लपवायला जमतच नसे.. आताही त्यांनी इतकं प्रेमाने विचारलं मग मी सर्वकाही सांगून टाकले. माझं बोलण ऐकल्यावर बाबांनी हळूवारपणे दाढीवरून हात फिरवले. मग वरती एका कोपय्रात लक्ष लावून त्यांनी माझ्याकडे पाहीले.

बघ रोहनचुकी कुणाचीच नाहीये. ना तुझ्या मित्रांच्या आईवडिलांची.. ना तुझ्या मित्रांचीचुक तर तुझीही काहीच नाहीये. पण रोहन आपल्याला इतके समजले पाहीजे कि कुणाला किती महत्व दिले पाहीजे. म्हणजे खेळ महत्त्वाचा नाही असं होतं नाही.. ख़ेळ तर महत्त्वाचा आहेच सोबत आभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे.. जर तु फक्त आभ्यास करत राहीलास आणि खेळाकडे दुर्लक्ष केलेस. तर तुझ्या शरिरामध्ये कसलेच बळ उरणार नाही. शरिराचा व्यायाम झाल्यामुळे शरिराची पुरेशी वाढ होणार नाही. अशाने मुलांना अपंगत्व येण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी आभ्यासासोबत मुलांना खेळ खेळणं तितकेच आवश्यक असतात.

बाबांनी मला जे समजावून सांगितले ते मला तंतोतंत पटले. मी त्या दिवसापासून कोणत्याच मित्राला खेळण्यासाठी विनवले नाही. मी माझा अभ्यास झाला कि खेळायचो. खेळून कंटाळा आला कि परत आभ्यासाला बसायचो. अशा तर्हेने मी शाळेत सगळ्या विषयात चांगल्या गुणांनी पहीला आलोतसेच त्या विद्यालयात मी आदर्श विद्यार्थी म्हणून नावारूपाला आलो. मला कुणाला खेळाचे महत्त्व पटवण्याचे कष्टही पडले नाही. माझ्या मित्रांना त्यांच्या आईवडिलांना माझ्यावरून खेळाचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहेत ते कळले..

आता आम्ही रोज संध्याकाळी दोन तास आनंदाने खेळतो.. माझ्या मित्रांच्या आईवडिलांनाही आता आमच्या खेळण्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आजकाल आम्हीच जर खेळायला जायचा कंटाळा केला तर घरचे जबरदस्ती खेळायला पाठवून देतात. आपल्या शरिरात उर्जा टिकून ठेवण्यासाठी खेळाची खूप गरज आहे. असं ते वारंवार सांगतातम्हणून खेळ नेहमीत खेळावेत.. कारण आपल्या आयुष्यात आहाराइतकेच खेळ महत्त्वाचे आहेत..!


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये जीवनात खेळाचे महत्त्व ह्या विषयावर निबंध व भाषण दिले आहे. मी अशी अशा करतो कि हा निबंध तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 2 Average: 4.5]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)