निबंध भाषण मराठी

जर पाऊस पडला नाही तर – मराठी निबंध, भाषण (Paus Padla Nahi Tar)

jar paus padala naahi tar marathi essay speech

इथे आम्ही तुम्हाला “पाऊस पडला नाही तर” या विषयावर निबंध दिला आहे, या माहितीचा वापर आपण भाषण किंवा लेखाच्या रूपात सुद्धा करू शकता. जर तुम्हाला हा निबंध किंवा माहिती आवडली असेल तर आम्हाला कंमेंट सेक्शन मध्ये कळवा.

पाऊस पडला नाही तर – मराठी निबंध , भाषण

आपण शाळेमध्ये कधी गप्पा मारताना जर कोणी विचारले किंवा शिक्षकांनी जरी विचारले तरी सर्वजण अगदी उत्साहाने सांगतात “माझा आवडता ऋतू” म्हणजे “पावसाळा“. शाळेत असताना सर्वांनाच असे वाटते कि खूप पाऊस पडावा आणि शाळेला सुट्टी मिळावी. मग घरी राहून खूप भिजायचे ,कागदाची नाव (होडी) बनवून पाण्यात सोडायची ,चिखलात मस्त खेळायचे असा विचार करून बरेच जण आपण शाळेला दांडी सुद्धा मारतो.

पण सध्याच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात आपण वृक्षतोड करून त्याजागी मोठमोठ्या कंपन्या आणि इमारती उभारत आहोत, त्यामुळे प्रदूषण आणखीनच वाढत आहे. त्यामुळे पावसासाठी लागणारे अनुकूल हवामान नसल्यामुळे सध्या गेल्या काही वर्षांपासून म्हणावा असा पाऊस पडत नाहीये. मग हे पावसाळ्यातले अनुभव आपण कसे अनुभवणार?

वर्तमान पत्रात रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बातमी येत असते, मला असा प्रश्न पडला कि ते कशामुळे आत्महत्या करत असतील? विचार केल्यानंतर सुचलं की कर्ज फेडू न शकल्यामुळे ते आत्महत्या करतात. भारतात शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. कधी पाऊस जास्त झाला तर पिकांचे नुकसान होते. तसेच कधी पाऊस न पडल्याने सुद्धा पिकांचे नुकसान होते. जर पीकच आले नाही तर ते कर्ज कसे फेडणार, त्यामुळेच ते आत्महत्येचा विचार करत असतील. अशाप्रकारे जर खरंच पाऊस पडला नाही तर … तर काय होईल?

पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मग झरे, विहिरी, बोअरवेल च्या रूपाने परत वापरात येते. खरंच पाऊस पडला नाही तर आपण पिणार काय? आपण कसे जगणार? एकवेळ माणूस किंवा कोणताही सजीव अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय आपण जास्त काळ जगूच शकत नाही.पाणी हे आपल्या जीवनाचे अमृत आहे.

पृथ्वीवरील जीवनाची सुरवात हि पाण्या मधेच झाली. आजही जेव्हा शास्त्रज्ञ परग्रहावर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते सर्वात पहिले पाणीच शोधत असतात. या पाण्यामध्ये एक नवीन जीवनमाला बनवण्याचे सामर्थ्य आहे. अश्या या मूलभूत, अपरिवर्तनीय जीवन घटकाला आपण आज काय किंमत देतो? यावर विचार करणे काळाची गरज आहे.

आपल्या भारताची अर्थव्यवस्था हि या पावसावर अवलंबून आहे, ७०% पेक्षा जास्त लोग शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत. बऱ्याचश्या शेतकऱ्यांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे, जलसंधारणाची तशी फारशी व्यवस्था भारतात नाही. पण आपण सर्वजण याचा विचारदेखील करत नाही. आपण भरपूर प्रमाणात पाणी वाया घालवतो.

शॉवर, वॉशिंग मशीन, टॉयलेट फ्लश मुले खूप पाणी वाया जाते. आपल्याकडे पावसावर अवलंबून असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणलोट सारख्या प्रकल्पांच्या पद्धती आपण विसरून गेलो आहोत. रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पामध्ये आपण घराच्या किंवा इमारतीच्या गच्चीवरील साचलेले पाणी जमा करून ते नंतर वापरू शकतो. तसेच ते पाणी बागेतील झाडांना हि वापरू शकतो. पाणलोट पद्धती मध्ये आपण पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत झिरवण्यास मदत करतो.

[emaillocker id=10751]

पाणलोट चे शाश्त्र काही नवीन नाही, आपल्या मागील खूप पिढींनी हे विज्ञान लिहून ठेवले आहे आणि वापरले सुद्धा आहे. पण आज आपण रोबोट्स, एआय, मशीन लर्निंग, बिटकॉइन च्या जमान्यात या विज्ञानाला तुच्छ मानतो. आमिर खान या हिंदी फिल्मी अभिनेतान्याने महाराष्ट्रामध्ये एक मोठी लोक चळवळ उभी केली आहे, ती म्हणजे सत्यमेव जायते वॉटर कप. दरवर्षी या स्पर्धेमध्ये हजारो गाव भाग घेतात; पाणलोट विज्ञान आणि श्रमदानाच्या बळावर पाणी अडवतात, जिरवतात. या चळवळीने आता मोठे रूप धारण केले आहे. यात गावांना पैसे दिले जात नाही, यात कोणतीही सरकारी योजना किंवा मिळकत नाही; तरीही लोक पाण्यासाठी एप्रिल, मे सारख्या रखरखत्या उन्हात श्रमदान करत आहेत. या चळवळीला अजून मोठे केले पाहिजे, यात श्रमदान केले पाहिजे. या संकल्पनेसाठी आणि तिच्या अंमलबजावणी साठी आमिर खान आणि त्यांच्या टीमला सलाम.

पाऊस म्हटलं की एक वेगळाच अनुभव असतो. सगळीकडे ढगांचा गडगडाट ,कोसळणाऱ्या धारा, कधी कधी पावसाळ्याच्या सुरवातीला पडणाऱ्या गारा, ह्या तापलेल्या धरणीला शांत करणारा असा हा पाऊस ज्याची आपण प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. पावसाळ्यात आपण सर्वजण पर्यटनासाठी बाहेर पडतो, घाटांमधून जाताना उंच डोंगरांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आपण नेहमीच अनुभवतो. अगदी त्यांसोबत सेल्फी घेतो.

पावसाळ्यात सगळीकडेच रंगबेरंगी छत्र्या, सगळीकडे रेनकोट-टोप्या घातलेली माणसे, सगळीकडे पाणी साचलेले, रेल्वे उशिरा आणि अशाच काही गमती-जमती पाहायला आणि चांगले, वाईट क्षण अनुभवायला मिळतात. पण जर पाऊसच पडला नाही तर हे सर्व आपण कसे अनुभवणार.

पावसाविना आपल्या भारतातील काही गावे आत्ताच कोरडी आणि दुष्काळग्रस्त झाली आहेत आणि जर खरच पाऊस पडला नाही तर आपने जगणे अशक्य होईल. शहरातील लोक भरपूर पाणी वाया घालवतात. आपण पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. जास्तीत जास्त पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .पाणी ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे आणि तिचा वापर योग्य रीतीने केला पाहिजे. म्हणजे गावांना सुद्धा पाणी मिळेल.

[/emaillocker]

प्रदूषण थांबण्यासाठी जर आपण सर्वानी जर काही उपाय योजना केल्या, वृक्षतोड थांबवली, तरच आपल्याला पावसाळा अनुभवता येईल…नाहीतर एक दिवस असा येईल खरंच पाऊस पडणार नाही. आजच आपल्यावर अशी परिस्तिथी आले कि बाटली मध्ये पाणी विकत घेतो, वापरायचे पाणी टँकर ने आणतो. हि सारी लक्षणे समजून घेणे जरूरी आहे, नाहीतर आपली पुढची पिढी यातून कधीही सावरू शकणार नाही. विचार करा.

झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा

सूचना: जर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर या आर्टिकल ला चांगली रेटिंग द्या. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 571 Average: 4]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

66 Comments

Secured By miniOrange