निबंध भाषण मराठी

जागतिक तापमानवाढ मराठी निबंध, भाषण, लेख – Essay on Global Warming in Marathi

जागतिक तापमानवाढ मराठी निबंध भाषण लेख - Essay on Global Warming in Marathi

जागतिक तापमानवाढ हा विषय मुलांना शाळेमध्ये निबंध, भाषण, परिचछेद लेखन, वादविवाद स्पर्धा इत्यादींसाठी सांगितला जातो. ह्या लेखामध्ये आम्ही जागतिक तापमानवाढ ह्या विषयावर निबंध, भाषण दिले आहे. ह्या लेखामध्ये आम्ही जागतिक तापमानवाढ म्हणजे काय?

तसेच जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला जागतिक तापमानवाढ या विषयावर निबंध, भाषण लिहण्यास उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

जागतिक तापमानवाढ मराठी निबंध भाषण लेख

जागतिक तापमानवाढ आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्बवायूचे उत्सर्जन याबाबत सातत्याने चर्चा होत असते; परंतु त्याबाबत आजही माणसाला जाग आल्याचे दिसत नाही. आता जागतिक हवामानशास्त्र संस्थेने आपल्या अहवालातून २०१३मध्ये कर्बवायू उत्सर्जनाची वाढलेली पातळी ही गेल्या तीन दशकांमध्ये सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. वाहनांची वाढती संख्या, बेसुमार जंगलतोड, सीएफसी वायूचे उत्सर्जन यामुळे पृथ्वीवरील हवामानात येत्या काही वर्षात अत्यंत घातक बदल होणार आहेत. या तापमानवाढीचे परिणाम बदलत्या हवामानाच्या रूपाने दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षात सर्व ऋतू बदलत चाललेले आहेत, पावसाळा अनियमित झालेला आहे, चक्रीवादळे होण्याचे प्रमाण सगळ्याच देशात वाढलेले आहे.

जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या ताज्या अहवालामध्ये गेल्या तीन दशकांमध्ये कर्बवायू उत्सर्जनाची पातळी ही २०१३ या वर्षामध्ये सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षातील कर्बवायूचे उत्सर्जन हे विक्रमी प्रमाण असून १९८४ नंतरचे ते सर्वाधिक आहे. कर्बवायू आणि इतर हरितगृहवायूंच्या उत्सर्जनामध्ये घट करून ही परिस्थिती तातडीने नियंत्रणामध्ये आणायला हवी.

जागतिक हवामान संघटनेने दिलेला हा इशारा नक्कीच गंभीर आहे. अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिग, जागतिक तापमान वाढ किंवा हवामानातील बदल असे शब्दप्रयोग आपण वापरतो. ग्लोबल वॉर्मिग किंवा तापमान वाढ ही दोन गोष्टींमुळे होते. त्यातील एक म्हणजे हरितगृह वायू परिणाम म्हणजेच ग्रीनहाऊस इफेक्ट होय.

ग्रीनहाऊस इफेक्टसाठी कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड हे तीन वायू जबाबदार आहेत. या सगळ्या वायूंचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त झपाटयाने वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमानदेखील आता वाढत चाललेले आहे. यातील दुसरा भाग म्हणजे सूर्याच्या तीव्र किरणांपासून संरक्षण होण्यासाठी पृथ्वीच्या सभोवताली एक कवच आहे, त्याला आपण ओझोनचा थर असे म्हणतो.

हा थर सूर्यापासून पृथ्वीकडे येणारी उष्णता अंतराळातच अडवतो. त्यामुळे सूर्याची जवळपास ५४ टक्केच उष्णता पृथ्वीकडे येते. बाकीची उष्णता ओझोनमुळे परस्पर परावर्तीत होते. ओझोनचे हे सर्वात मोठे कार्य असून त्यामुळे या वायूला पृथ्वीचे कवचकुंडल असे म्हटले जाते; परंतु या ओझोनच्या थरालाही आता धोका निर्माण झालेला आहे.

प्रदूषण मराठी निबंध, भाषण, लेख – Essay on Pollution in Marathi

याचे कारण म्हणजे, क्लोरोफ्ल्युरोकार्बन हा वायू आपण मोठया प्रमाणात वापरतो. खास करून तो जेट विमानातून बाहेर पडतो. आपण वापरत असलेल्या प्रेमधून तो बाहेर पडतो. तसेच फ्रिजमधूनही हा वायू बाहेर पडतो आणि तो वातावरणात मिसळला जातो. हा सीएफसी वायू ओझोनचे विघटन करण्यासाठी कारणीभूत ठरतो. या विघटनामुळे ओझोनच्या थराला एक मोठे खिंडार पडले आहे.

ऑस्ट्रिया नावाच्या देशाच्या क्षेत्रफळाइतके मोठे ते खिंडार आहे. या खिंडारामुळे किंवा ओझोनच्या कमतरतेमुळे सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी उष्णता अधिक प्रमाणात पृथ्वीकडे येऊ लागली आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्यासाठी केवळ हरितगृह वायू जबाबदार आहे, असे नाही तर ओझोनचा क्षयसुद्धा यासाठी कारणीभूत आहे.

कर्बवायूंपैकी जागतिक तापमान वाढीसाठी ७० टक्के कारणीभूत असणारा वायू म्हणजे, कार्बनडाय ऑक्साईड होय. दुसरा वायू म्हणजे, मिथेन होय आणि तिसरा महत्त्वाचा वायू म्हणजे नायट्रस ऑक्साइड. कार्बनडाय ऑक्साइड हा प्रामुख्याने नसíगक आणि मानवनिर्मित अशा दोन पद्धतीने बाहेर टाकला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठे ज्वालामुखी होतात, त्यातून मोठया प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड वायू बाहेर टाकला जातो. नसíगकपणे जंगलांना जेव्हा आगी लागतात, तेव्हा हा वायू बाहेर टाकला जातो.

कार्बनडाय ऑक्साइड वाढण्यामागची ही दोनच नसíगक कारणे आहेत, बाकी सर्व कारणे मानवनिर्मित आहेत. म्हणजे आपण कुठल्याही पदार्थाचे ज्वलन केले तर कार्बनडाय ऑक्साइड बाहेर पडतो. कोळसा, लाकूड तसेच पेट्रोल आणि डिझेल यांच्या ज्वलनामुळे कार्बनडाय ऑक्साइड बाहेर पडतो. पेट्रोलडिझेल हे कारखान्यांना, सर्व प्रकारच्या वाहनांना मोठय़ा प्रमाणात लागते.

दरवर्षी वाहनांची आणि कारखान्यांची संख्या ही आपल्याकडे वाढतच चालली आहे. त्यामुळे पेट्रोलडिझेलचा वापर फार मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढण्यामागे दैनंदिन वापरातील पेट्रोलडिझेल मोठया प्रमाणात कारणीभूत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कमीत कमी कार्बनडाय ऑक्साइड बाहेर टाकणाया गाडयांवर संशोधन झाले पाहिजे.

वाहनांच्या संख्येवर नियंत्रण असले पाहिजे. भारतात ते अजिबातच नाही. बाहेरच्या काही देशांमध्ये प्रत्येक कुटुंबात किती गाडया असाव्यात, याबाबत काही नियंत्रण आहे. वैयक्तिक पातळीवरसुद्धा आपण किती गाडया घ्यायच्या, याचा विचार करता येऊ शकतो. खासगी गाडीऐवजी सरकारी गाडीचा वापर केला तर कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल; परंतु हा विचार कोणी करत नाही. मुळात शासकीय पातळीवर ही गोष्ट होणे गरजेचे आहे.

हरितगृह वायूमधील मिथेन हा दुसरा वायू. हा मिथेन वायू जनावरांच्या शेणामधून बाहेर पडतो. तसेच भातशेती आणि रवंथ करणाया प्राण्यांकडूनही तो बाहेर फेकला जातो. मिथेन वायूसुद्धा तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. पण यामध्ये त्याची भूमिका अगदी कमी म्हणजे १० ते १२ टक्के आहे.

तापमान वाढीसाठी तिसरा वायू म्हणजे, नायट्रस ऑक्साइड हा कारणीभूत आहे. हा वायू रासायनिक कारखान्यांमधून आणि पेट्रोलडिझेलच्या ज्वलनातून बाहेर पडतो. या सर्व स्त्रोतांचा सारांश काढला तर प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलचा अधिक वापर हा या उत्सर्जनासाठी मोठया प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे या घटकांचा वापर कमी करणे हाच महत्त्वाचा पर्याय आपल्यासमोर आहे.

कार्बनडाय ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणखी काही उपाय करण्यासारखे आहेत. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड हा वनस्पतींकडून शोषला जातो, हे आपणास ठाऊक आहे. खासक करून मोठी घनदाट जंगले आहेत त्यांच्याकडून हा वायू मोठया प्रमाणात वापरला जातो. पण शहरांमध्ये कारखानदारी आणि वाहनांची संख्या वाढत आहे आणि या ठिकाणी वृक्षांची संख्या अत्यल्प होत चालली आहे. याचे कारण विकासासाठी आपण मोठया प्रमाणावर वृक्षतोड केलेली आहे. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साइड वाढून आपल्याला प्रदूषणाचा त्रास होत आहे. भारतातदाट वनेही फक्त १० टक्केच शिल्लक राहिलेली आहेत.

जंगलांची संख्या वाढली असल्याचे दावे सरकारकडून केले जात असले तरी वस्तुस्थिती ती नाही. जंगलांची व्याख्या ही फार विचित्र केली जाते. जो हिरवा भाग दिसतो त्याला जंगल म्हटले जाते. पण दाट वने हा भाग खूप वेगळा असतो आणि ही वने एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के भागात असणे गरजेचे असते, तरच नैसर्गिक संतुलन राहाते आणि आता भारतात केवळ १० टक्के दाट वने शिल्लक आहेत. मात्र सरकारी आकडेवारी २२ टक्के दाट वने असल्याचे सांगते.

ती जरी खरी मानली तरी ३३ टक्क्यांपेक्षा ती कमीच आहे. हीच परिस्थिती संपूर्ण जगाच्या पातळीवर सर्व विकसनशील आणि विकसित देशांमध्ये पाहायला मिळते. वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे वाढत चाललेल्या गरजा, वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या या सर्व गोष्टी जंगलाचा नाश होण्यासाठी जबाबदार आहेत.

तापमानवाढीमुळे समुद्रकिनायावरची बेटे, गावे किंवा देश पाण्याखाली बुडायला सुरुवात झाली आहे. अनेक तज्ज्ञांनी याबाबत इशाराही दिलेला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढच्या ५०६० वर्षात जगाच्या पाठीवरील २७ देश पाण्याखाली जातील. श्रीलंका, बांगलादेश या देशांचा समावेश आहे. हे देश जर पाण्याखाली गेले तर तेथील लोक कुठे स्थलांतरीत होणार? तर भारतात. त्यावेळी भारताची काय परिस्थिती असेल? इतकेच नाही तर भारतातील समुद्रकिनायावर असणारी गावेशहरेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारख्या दहाबारा शहरांचा समावेश आहे.

जगात सर्वात जास्त कार्बनडाय ऑक्साइड अमेरिका सोडते. नंतर चीन, तिसरा क्रमांक युरोपीयन विकसित देश आणि चौथा क्रमांक भारताचा लागतो. कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचा गेल्या ६० वर्षातील वाढता वेग बघता, पृथ्वीवरचे संकट टाळण्यासाठी आपल्याकडे वेळ थोडा आहे. त्यासाठी सरकारने वाहनांवर, कारखान्यांवर, पेट्रोलडिझेलच्या वापरावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत तसेच सर्वानी मिळून जंगलवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला मोठी झाडे भरपूर प्रमाणात लावणे आपल्याला शक्य आहे. लोकांनी आणि सरकारने त्याकामी पुढाकार घेतला पाहिजे.

तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये जागतिक तापमानवाढ ह्या विषयावर मराठी निबंध, भाषण दिले आहे. मी अशी अशा करतो कि हा निबंध, भाषण तुम्हाला उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 3 Average: 2.3]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Comment

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)