निबंध भाषण मराठी

भारतीय संविधान दिवस २०१९ माहिती, लेख, निबंध, भाषण, महत्व मराठी मध्ये

भारतीय संविधान दिवस दिन माहिती, लेख, निबंध, भाषण, महत्व मराठी मध्ये

राष्ट्रीय कायदा दिवसाला संविधान दिवस म्हणूनही ओळखले जाते. २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान समितेने संविधान स्वीकार केले आणि ते २६ जानेवारी १९५० ला लागू करण्यात आले. या दिवसाच्या सन्मानार्थ दरवर्षी आपण २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि २६ जानेवारी ला आपण प्रजासत्ताक किंवा गणतंत्र दिवस म्हणून खूप उत्साहात साजरा करतो.

या लेखामध्ये आम्ही भारतीय संविधान दिवस बद्दल काही उपयुक्त माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला भारतीय संविधान दिनाबद्दल निबंध, भाषण, लेख लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

भारतीय संविधान दिन २०१९ माहिती, लेख, निबंध, भाषण, महत्व मराठी मध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणले जाते, त्यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट १९४७ ला संविधान मसुदा समितीची स्थापना झाली. जवळपास २ वर्षांच्या अथक प्रयत्नानं नंतर २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानाचा मसुदा विधानसभेत सादर करण्यात आला. दोन महिन्यांनी भारतीय घटना पारित करण्यात आली आणि आपण एक प्रजासत्ताक देश बनलो.

भारताचे संविधान हे जगातील सवात मोठे संविधान आहे. भारताचे संविधान हस्तलिखित आहे, याची १ हिंदी आणि १ इंग्रजी आवृत्ती आहे ज्यात ४८ आर्टिकल्स आहेत. संविधान तैयार करायला २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस लागले होते.

पूर्वी २६ नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा करायचो. १९ नोव्हेंबर २०१५ च्या सरकारच्या घोषणे नुसार आपण हाच दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करू लागलो. २०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्य जयंती च्या सन्मानार्थ संविधान दिवस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवण्यात आले. डॉ. अंबेडकरांच्या मुंबई मधील मुसीयूम चे उद्घाटन करताना पंत प्रधान नरेंद मोदींनी ही घोषणा केली.

संविधान दिवसाच्या निमित्ताने भारत भरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. निबंध, वक्तृत्व / भाषण, पेटिंग स्पर्धा शाळा, कॉलेजेस मध्ये आयोजित केल्या जातात. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी नसते, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये संविधान संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. लेक्चर्स, प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

सरकारच्या निर्देशानुसार कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये मॉक पार्लामेन्ट डिबेट घेतल्या जातात. २६ नोव्हेंबर २०१५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या स्मरणार्थ संसदेमध्ये एक विशेष सत्र ही घेण्यात आलं.

आज आपली युवा पिढी, ज्या मध्ये तुम्ही आणि मी सुद्धा येतो;आपण संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. आपले हक्क, जबाबदाऱ्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या नुसार वागण्याचा प्रयत्न ही केला पाहिजे. आज मी हा लेख लिहू शकतो, तुम्ही तुमचे मत, विचार व्यक्त करू शकता हा हक्क आपल्याया संविधानाने दिला आहे, आपण त्याचा आदर आणि अभ्यास केला पाहिजे.

Other Related Topics

लोकशाही , तिरंगा – भारतीय राष्ट्रीय ध्वज

जर तुम्हालाभारतीय संविधान दिवस / दिन २०१९ माहिती, लेख, निबंध आवडला असेल तर कृपया रेटिंग द्या, आणि तुम्ही तुमचे मत कंमेंट्स द्वारे नोंदवू शकता…

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 554 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

41 Comments

Secured By miniOrange