निबंध भाषण मराठी

गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, दहीहंडी, मराठी माहिती, निबंध, भाषण

गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, दहीहंडी, मराठी माहिती, निबंध, भाषण
Lokmatnews.in

गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, दहीहंडी, माहिती, मराठी निबंध भाषण

गोकुळाष्टमी हा श्रावण महिन्यात येणारा सर्व बालगोपाळांचा आणि गोविंदांचा आवडीचा सण आहे. कृष्ण जन्माच्या या दिवसाला श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी, श्रीकृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात.  या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपूर्ण भारतात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. म्हणूनच या दिवशी गौळणींचा लाडका कान्हा श्रीकृष्ण याचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत असे पुराणात वर्णन आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव आणि देवकीचे आठवे पुत्र होते.  यादिवशी बरेचजण गोकुळाष्टमीचा उपवास करतात. सगळीकडेच यादिवशी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वचजण ‘आला रे आला गोविंदा आला’ असा जयघोष करत असतात. दहीहांड़ी म्हटलं की, आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर दिसतात त्या उंचच उंच दहीहंड्या आणि ती फोडण्यासाठी उभे असणारे गोविंदा.

भगवान श्रीकृष्णांना दही, दूध, लोणी हे पदार्थ खूप आवडत असे. श्रीकृष्ण हे चोरून दही खात असे त्यामुळेच कृष्णाला माखन चोर असेही म्हणतात. दही,दूध, लोणी आणि लाह्या हे सगळे एकत्र करून बनवलेला पदार्थ म्हणजे काला. श्रीकृष्ण गायी चरताना स्वतःची व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून ते सर्व खाद्यपदार्थ एकत्र करून त्याचा काला करत असे आणि आपल्या सवंगड्यांसह खात असे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात. गोपाळकाल्याच्या दिवशी दही, दूध, लोणी आणि लाह्या यांचा काला करून प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात.

याच दिवशी दही दुधाने भरलेली हंडी उंच बांधून ही दहीहंडी सर्व गोविंदा एकत्र येऊन फोडतात. आजकालच्या या आधुनिक जगात ही हंडी फोडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच काही संस्थांतर्फे स्पर्धा आयोजित करण्यात येतात. दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथके त्या ठिकाणी गर्दी करतात आणि सर्वच गोविंदा चुरशीचे प्रयत्न करून ह्या दहीहंड्या फोडतात.

दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी येणारी ही दहीहंडी, गोकुळाष्टमी २ सप्टेंबर २०१८ रोजी आणि गोपाळकाला ३ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गोकुळाष्टमीला एक अनन्यसाधारण महत्व आहे. वृंदावन, मथुरा, गोकुळ, द्वारका या ठिकाणी तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान असल्यामुळे तिथे मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी साजरी होते.

यादिवशी भारतात बहुतांश बऱ्याच ठिकाणी दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असतात. त्यापैकी मुंबई आणि पुणे या ठिकाणी या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. उंचच उंच दहीहंडी बांधून ती फोडण्यासाठी बक्षिसे ठेवण्यात येतात. मुंबईमध्ये संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव तर पुण्यामध्ये बाबू गेनू दहीहंडी उत्सव मंडळ, मंडई या नामांकित दहीहंड्या आहेत.

सगळीकडेच या दहीहंड्या फुलांनी सजवण्यात येतात. या हंडीमध्ये दूध, दही टाकतात. त्या हंडीवर एक नारळ ठेवतात. मग प्रमुख गोविंदा तो नारळ घेऊन ही दहीहंडी फोडतो. सर्वच ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची चढाओढ चालू असते. त्याचबरोबर ही दहीहंडी फोडताना पाहण्यासाठी बघ्यांची भरपूर प्रमाणात गर्दी तेथे जमलेली असते. सर्वचजण गोविंदांना प्रोत्साहन देत असतात आणि ‘आला रे आला गोविंदा आला’ असे म्हणत गोविंदांचा उत्साह आणखीनच वाढवत असतात.

गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती सण साजरा करण्याची पद्धत

हिंदू लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करतात. यादिवशी श्रीकृष्णाची पूजा करतात, रात्री उशिरापर्यंत जागतात आणि श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला रात्री १२ वाजता प्रार्थना, पूजा करतात. कृष्णाच्या लहानपणीचा फोटो किंवा मूर्ती पाळण्यात ठेऊन झोका देतात आणि श्रीकृष्णाची गाणी म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी भगवतगीतेचे पारायण करून जन्माष्टमी साजरी केली जाते. अशाप्रकारे सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात हा आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

आत्ताच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रिय जगात गोकुळाष्टमी कशी साजरी करावी?

  • दहीहंडी जास्त उंच न बांधता, खाली बांधून तिचा आनंद घ्यावा.
  • जर उंच बांधली असेल तर संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि मगच या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. कारण दरवर्षी बऱ्याच गोविंदांना यामध्ये आपला जीव गमवावा लागतो.
  • दहिहंडीजवळ खूप मोठ्या आवाजात स्पिकर्स लावण्यात येतात. ह्या स्पिकर्सचा आवाज थोडा कमी प्रमाणात असावा त्यामुळे वयस्कर लोकांना आणि लहान मुलांना आवाजाचा त्रास होणार नाही.
  • दहीहंडी फोडण्यासाठी लहान मुलांना उभे न करता १५ वर्षांच्या वरील गोविंदानी दहीहंडी फोडावी. या सर्वांमुळे आपण हा दहीहंडी उत्सव आनंदात, उत्साहात साजरा करू शकू.
Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 5]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

About the author

Gayatri Pokale