निबंध भाषण मराठी

एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत – मराठी निबंध, भाषण, लेख

एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत - मराठी निबंध, भाषण, लेख

परीक्षेत निरनिराळ्या प्रकारचे निबंध विचारले जातात त्यापैकीच एक म्हणजे आत्मवृत्तपर निबंध. खालील निबंधामध्ये आपण एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त पाहणार आहोत. यामध्ये या फाटक्या पुस्तकाने आपले विचार मांडले आहेत, आपल्या मनामधील भावना व्यक्त केल्या आहेत. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते.

ह्या लेखामध्ये आम्ही फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत – मराठी निबंध, भाषण, लेख

नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी सुरु होऊन ७-८ दिवस झाले होते. सकाळी सगळे आवरून झाल्यावर खेळायला पळणार होतो  तितक्यात आईने काम सांगितले. आईचे काम ऐकल्याशिवाय खेळायला जायची परवानगी नव्हती. आईने रद्दीवाल्याकडे रद्दी द्यायला सांगितले. वजन करून घेताना दुकानाच्या एका कोपऱ्यातून थोडासा असा विव्हळण्याचा, ओरडण्याचा आवाज कानावर पडला. भास झाला असेल असे समजून जात असता हळू आवाजात बोलणे ऐकायला आले. वळून पाहिले तर कोपऱ्यात एक फटाके पुस्तक पडलेले दिसले. तेच माझ्याशी बोलत असल्याचे लक्षात आले.

”अरे मित्रा, थांब जरा, मी काय सांगतो ते ऐकून घे” असे म्हणत त्या पुस्तकाने आपली फाटकी व दर्दभरी कहाणी ऐकवण्यास सुरुवात केली. गेल्याच वर्षी मी एका ग्रंथालयातील नव्या काचेच्या कपाटात सुंदर आवरणात बांधलेलो होतो व विक्रीची वाट पाहत होतो. जेणेकरून माझ्या प्रत्येक पानातील ज्ञानामृत अनेकजण प्यावेत. खरेदीसाठी नाही परंतु वाचण्यासाठी मला एका माणसाने घरी नेले. मी खूप आनंदी झालो होतो कि मी एका नव्या जागेत आलो आहे. आता या माणसाच्या घरातील सर्वजण माझे वाचन करून, त्यांच्या दुसऱ्या मित्रांनाही माझा सहवास घडवतील.

पण घरातील चेतन आणि नेहा या दोघा बहीण भावंडांच्यात मला आधी कुणी वाचायचे म्हणून मला खेचण्यास सुरुवात झाली. कधी चेतन तर कधी नेहाकडे खेचला जाऊन मी खिळखिळा झालो. माझ्या अंगाची लक्तरे निघाली. पाने ढिली होऊन एक-एक करून हातात आली. तरीही त्यांच्या बाबानी मला व्यवस्थित डिंकाने चिटकवले.

वाचाल तर वाचाल – मराठी निबंध 

परंतु त्यानंतर काही दिवसांनी  नेहाची मैत्रीण प्रिया घरी आली माझ्या अंगावर पेपरवेट असतानाही मला खसकन ओढले त्यात माझ्या मुखपृष्ठाच्या चिंध्या झाल्या. त्यानंतर मी वाचनाच्या लायकीचा राहिलो नाही, म्हणून त्यांच्या बाबांनी माझी रवानगी सरळ रद्दीवाल्याकडे केली. त्यामुळे मला खूप दुःख झाले. आता माझे वैभवाचे दिवस संपले आहेत. पण अजूनही नशिबात किती वणवण आहे कोण जाणे?

आता सुखाचे क्षण पुन्हा लाभणार नाहीत हे माहित असूनही अजून वेडी आशा आहे की माझ्यातील शिल्लक असलेल्या पानावरच्या गोष्टी सर्वांनी वाचाव्यात, ज्ञान मिळवावे. छोट्या मुलांनी माझ्यातील चित्रे बघावीत. तेवढेच दुसऱ्यांना आनंद दिल्याचे समाधान मला पुन्हा एकदा मिळेल.


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त ह्या विषयावर निबंध भाषण दिले आहे. मी अशा अशा करतो कि हा निबंध भाषण तुम्हला उपयोक्ता ठरेल. जर तुम्हाला हा निबंध भाषण आवडले असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 71 Average: 4.3]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

8 Comments

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)