निबंध भाषण मराठी

स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो ? मराठी निबंध – २५० शब्द

essay-on-what-can-i-do-for-clean-india

सप्टेंबर ८, २०१७ पर्यंत विद्यार्थी, सामान्य जनता आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडून “स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो” या विषयावर १ कोटी निबंध प्राप्त करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘संकल्प से सिद्धी’ उपक्रमाचा एक भाग आहे जो “२०२२ पर्यंत नवीन भारत” या प्रकल्पाचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. या निबंध स्पर्धेचा उद्देश समाजात, मुख्यतः तुमच्या आमच्या सारख्या विद्यार्थी आणि युवा पिढीच्या मनात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. प्रधान मंत्री मोदी यांची ही मोहीम कौतुकास्पद आहे, स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

शिक्षक कनिष्ठ आणि वरिष्ठ शालेय विद्यार्थ्यांना “मी स्वच्छ भारतासाठी काय करू शकते/शकतो? ” या विषयावर २५० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगत आहेत. आपण विद्यार्थी आणि देशाचे युवा या महान मोहिमेत सहभाग घेऊ इच्छित आहात आणि त्यासाठी इंटरनेटवर या विषयावरच्या सॅम्पल निबंधाचा शोध घेत आहात. तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

इथे दिलेला निबंध मी याच कारणासाठी लिहिला आहे की जेणेकरून आपण शब्दांना एकत्र कसे जोडायचे ते शिकू शकाल. मी तुम्हाला असे सुचवितो की या निबंधाचे कॉपी पेस्ट करू नका. उलट या नमुना निबंधाची संकल्पना समजून घ्या आणि आपल्या स्वत:च्या भाषेत, आपल्या स्वत:च्या भावना आणि पद्धती टाकून एक सुंदर निबंध लिहा. निबंधाचा विषय आहे की स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते किंवा करू शकतो. स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध

स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो? मराठी निबंध- २५० शब्द

जेव्हा मी चित्रपटांमध्ये किंवा युट्यूब वर स्वच्छ विदेशी शहरे आणि खेडी पाहतो, मला आश्चर्य वाटते की ही ठिकाणे किती सुंदर, व्यवस्थित आणि स्वच्छ आहेत? हिमाच्छादित स्वित्झर्लंडच्या पर्वतरांगा, इटली मधल्या फुलांनी भरलेल्या बाल्कनी आणि ऑस्ट्रेलियाच्या आणि इतरही देशातील स्वच्छ सुंदर अशा किनारपट्ट्या पाहून खूपच छान वाटते.

[emaillocker id=10751]

आपल्याला त्यांची सुंदरता आणि स्वच्छता पाहून मनाला खूपच प्रसन्न वाटते . आपल्या भारतात ही अशी आश्चर्यकारक प्रवास स्थळे, ऐतिहासिक स्मारके, भव्य किल्ले यांची कमी नाही परंतु ते त्यांच्या परराष्ट्रीय समकक्षांसारखे का दिसत नाहीत?

देशाला स्वच्छ करणे हे केवळ सरकारचे काम नाही. होय, ते पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी बाध्य आहेत परंतु स्वछतेची आवड मुळतः जनतेमध्ये असावी लागते. आपण भारतीयांची हीच प्राथमिक समस्या आहे. आपण दुसऱ्यांना दोष देत राहतो मात्र स्वतः काहीही करत नाही. सरकार आणि अन्य लोकांना दोष देण्याऐवजी मी आपल्या राष्ट्र पित्याकडून एक गोष्ट शिकलो …

तुमच्यामध्ये तो बदल व्हावा लागेल जो तुम्हाला जगात पाहायचा आहे – महात्मा गांधी

जर मला माझा देश स्वच्छ पाहायचा असेल तर मला बदलण्याची गरज आहे. मी माझ्यामध्ये बदल न करता तो इतरांकडून होण्याची अपेक्षा करू शकत नाही. मी माझ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन त्या अश्या आहेत…

मी घरी ओला व कोरडा कचरा वेगळा करीन आणि तो योग्य कचराकुंडीतच टाकेल. मी तो कचरा रस्त्यावर किंवा खिडकीतून बाहेर टाकणार नाही आणि मी माझ्या कुटुंबियांना ही असे करण्यास प्रवृत्त करेल. मी आमच्या कॉलनीच्या अध्यक्षांना विनंती करेन की हा नियम सगळ्यांसाठी अनिवार्य करावा.

[/emaillocker]

 

मी माझे घर आणि माझ्या परिसरामध्ये कचरा करणार नाही. आणि इतरांनाही करू देणार नाही. आम्ही सर्वच मित्रमैत्रिणी मिळून आमचा परिसर स्वच्छ ठेऊ.

मी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही, चॉकलेट किंवा कँडी चे आवरण रस्त्यावर न टाकता खिश्यात ठेवीन आणि मग ते कचरा पेटीतच टाकेन.

माझ्या फोनमध्ये खूप सारे सोशल मीडिया ऍप्स आहेत, अजून पर्यंत मी त्यांचा उपयोग फक्त डीपी बदलणे किंवा फोटो पोस्ट करण्यासाठी करत होतो, पण यापुढे मी या माध्यमांचा वापर स्वच्छतेचा संदेश पसरवण्यासाठीही करेन.

मी एकटा संपूर्ण भारताला स्वच्छ करू शकत नाही, परंतु माझ्यासारख्या राष्ट्राच्या कोट्यावधी युवकांनी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केल्यास, कोणीही आपणास जगामध्ये सर्वात स्वच्छ आणि सुंदर देश होण्यापासून थांबवू शकत नाही. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या हातात आहे. जेव्हा मी माझे डोळे बंद करतो तेव्हा स्वच्छ आणि सुंदर भारत कसा असेल याची कल्पना करतो तेव्हा आपला हा भारत मला स्वर्गाप्रमाणे भासतो. चला… एकत्र येऊ आणि आपल्यामध्ये हा छोटासा बदल घडवू ज्यामध्ये देश बदलण्याची ताकद आहे.

स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो ? मराठी निबंध स्पर्धेसाठी टिप्स

सूचना: इथे दिलेला निबंध ३५० शब्दांचा आहे. या निबंध फक्त रेफेरेंस साठी वापरावा.

  1. या निबंध स्पर्धेमध्ये, निबंध २५० शब्दांपेक्षा जास्त नसावा. सबमिट करण्यापूर्वी आपले शब्द मोजा.
    सबमिट करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१७ आहे.
  2. आपण यापैकी कोणत्याही भाषेमध्ये निबंध लिहू शकता: आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी,गुजराती, हिंदी, कन्नड, कश्मीरी, कोंकणी, मैथिली, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सांथाली, सिंधी, तमिळ, तेलगु आणि उर्दू
  3. निबंध सादर करताना योग्य भाषा, राज्य आणि इतर हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. याबद्दल अधिक वाचा . सूचीच्या शेवटी, आपल्याला नियम आणि अटी, तांत्रिक मापदंड आणि मूल्यमापन मानदंड विषयी एक PDF सापडेल. कृपया ती वाचा
  4. अटी आणि नियम स्पष्टपणे सांगतात की तुमचा निबंध ओरिजिनल असावा.
  5. अधिकृत सरकारी वेबसाईट वरून योग्य माहिती मिळवावी.

स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो? Video Essay

We have created a special video essay on the same topic for you guys… check it out..

 

येथे “स्वच्छ भारत अभियान” वर निबंध आहे, कदाचित त्याचा उपयोग तुम्हाला होईल.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 80 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

6 Comments

Secured By miniOrange