निबंध भाषण मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती, निबंध, भाषण| Dr. Babasaheb Ambedkar Essay in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Short Speech Essay Paragraph & Article
Wikipedia.com

भारत स्वतंत्र होण्याआधी, भारतावर इंग्रज राज्य करीत होते. भारतीय असहाय्य होते आणि अशा परिस्थितीत हि काही शूरवीर उभे राहिले आणि आपल्या देशासाठी लढले ज्यांना आज स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक सुधारक मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अशाच काही महान समाज सुधारकांपैकी एक. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. म्हणूनच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हि मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख दिला आहे.

त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राजकीय विज्ञान यांवर संशोधन करून एक विद्वान म्हणून प्रतिष्ठा मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि सामाजिक सुधारक होते. ह्या लेखामधील माहिती तुम्हाला शाळा, कॉलेज मधील बाबा साहेब आंबेडकर यांवर निबंध, भाषण स्पर्धांमध्ये येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती, निबंध, भाषण | Dr. Babasaheb Ambedkar Essay, Speech in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण, कुटुंब

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला महू (जे आता मध्य प्रदेश मध्ये स्थापित आहे) मधील मिलिटरी कॅन्टोन्मेंट मध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. ते एका गरीब दलित कुटुंबात जन्मले होते ज्या मुळे त्याना त्यावेळी अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. अस्पृश्य लोकांना इतरांसारखी समान वागणूक दिली जात नव्हती.

मुलांना शाळेत जाण्याची परवानगी होती पण शिक्षकांकडून कोणतिही मदत दिली जात नव्हती आणि लक्ष हि दिले जात नव्हते. शाळेत बसण्या साठी त्यांना घरातून पोते आणायला लागायचे. त्यांना पिण्याचे पाणी अथवा पाण्याच्या भांड्याला देखील हात लावायची परवानगी नव्हती. शिक्षक व उच्च जातीचे विद्यार्थी त्यांच्या तोंडामध्ये उंचीवरून पाणी ओतायचे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण

[emaillocker id=10751]

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकच अस्पृश्य होते ज्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये १८९७ मध्ये नोंदणी केली. त्यांनी १९०७ मध्ये मॅट्रीकलेशन पास केले व बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १९१२ मधे अर्थशास्त्र आणि राजकीय विज्ञान आणि १९१५ मधे एम.ए ची पदवी प्राप्त केली. शेवटी १९२७ साली त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पी.एच.डी प्राप्त केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात देशामध्ये अशी एकच व्यक्ती होती ज्यांचाकडे उच्च डिग्री होती. त्यांनी एक शिक्षक, अकाउंटंटचे काम केले आणि नंतर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी चा व्यवसाय सुरु केला. पण जेव्हा त्यांच्या ग्राहकांना कळाले कि ते अस्पृश्य आहेत त्यांचा व्यवसाय हळू हळू बंद पडला. Essay, Speech on Dr. Babasaheb Ambedkar in English

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य आणि सामाजिक योगदान

अस्पृश्य लोकांना एवढी तुच्छ वागणूक मिळूनही त्यांना मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. बाबासाहेब आंबेडकर असे एकच व्यक्ती होते जे त्यावेळी अस्पर्श लोकांच्या न्यायासाठी पुढे आले. त्यांनी दलित लोकांना प्रोत्साहन देण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दलित लोकांसाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्यासाठी चळवळी व मोर्च्यां पासून सुरुवात केली. शहराच्या मुख्य पाण्याच्या टाकीतील पाणी वापरण्याचा एक मार्ग उघडण्यासाठी त्यांनी महाड मध्ये सत्याग्रह केले. हिंदू मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांना अधिकार देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.

[/emaillocker]

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय नागरिकांसाठी अर्थशास्त्र आणि राजकीय क्षेत्रातही अनेक उपक्रम केले. महिला श्रमिकांच्या हक्कांसाठीहि ते लढले. ते भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. ते २ वर्ष मुंबई मधील गव्हर्नमेंट कायदा महाविद्यालयाचे चे प्राचार्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक अस्पृश्यता आणि जातीय वर्गीकरणाच्या विरूद्ध होते. त्यांनी प्रत्येक माणसाला सामान न्याय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव व्यक्ती होते ज्यांचाकडे त्या काळात भारता मध्ये उच्च पदवी होती. अस्पृश्यांसाठी त्यांच्या कार्यात ते यशस्वी झाले. त्यांनी महिला व मजुरांच्या अधिकारांसाठी चळवळी केल्या. माणसांमध्ये जातीवरून भेदभाव नसावा अशी शिकवण त्यांनी आपणास दिली.आपण सर्व वेगळ्या जातीचे असू पण एक समान मानव आहोत आणि जातीच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा असे बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. Essay, Speech on Untouchability in India(अस्पृश्यता इंग्रजी निबंध)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांवर मराठी भाषण साठी टिप्स

१. भाषण हे तुमच्या मनातून येणारे विचार आहेत, तर ते रट्टा मारू नका.
२. विषयाबद्दल वाचल्यानंतर आपल्या मनात काय येते ते बोला.
३. आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपल्या घरच्यांसमोर, मित्र किंवा आरशासमोर भाषण बोलण्याचा प्रयत्न करा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांवर मराठी निबंध साठी टिप्स

१. तुम्ही हा निबंध जीवनचरित्र चा माध्यमात लिहू शकता.
२. विषयाबद्दल खूप गोष्टी वाचा आणि त्यांना निबंध तुमच्या शब्दांमध्ये लिहण्याचा प्रयत्न करा.
३.निबंध लिहताना त्यांनी सुरुवात विषयाची परिचय, विषयाबद्दल ची अधिक माहिती आणि शेवटी निष्कर्ष अशा स्वरूपात लिहा जेणेकरून वाचणाऱ्याला वाचायला सोपं होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हि मराठी माहिती प्रसारित करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जर याची माहिती तुम्हाला कोणत्याही प्रकरि उपयुक्त ठरली असेल तर कृपया तुमचे विचार खाली कंमेंट करा. आम्हाला तुमचा प्रतिसाद खुप आवडतो.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 603 Average: 3.2]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

42 Comments

Secured By miniOrange