निबंध भाषण मराठी

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना मराठी निबंध | Essay on Beti Bachao, Beti Padhao Yojana in Marathi

Essay on Beti Bachao, Beti Padhao Yojana in Marathi

Beti Bachao, Beti Padhao Yojana is one the most important campaign in India right now. For so long girlsempowerment has been second priority or sometimes negelcted too. It is good to see that goverment is trying to boost the girls confidence, educate them, provide them at least basic facilities so that they prosper. Here in this article we are giving you a sample Essay on Beti Bachao, Beti Padhao Yojana in Marathi. You can use this content for speech, article writing. You can also use it to practice paragraph writing.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरीही आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्री पुरुष भेदभाव सारख्या लज्जास्पद गोष्टी अजूनही समाजात दिसून येतात. आपण २१व्या शतकांत पोहचुनही आजही महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. महिला ह्या समाजाच्या एक महत्वाच्या घटक आहेत परंतु आजकाल महिलांविषयक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे एकूण लोकसंख्येमध्ये महिलांची आकडेवारी खालावली आहे. खालावत जाणारे लिंग गुणोत्तर आणि समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे हे काळाची गरज बनले आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे एक सामान घटक आहेत.स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि लहान मुलीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने आणि सामाजिक संस्थांनी खूप अभियाने सुरु केली आहेत. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे अशाच एका अभियानांपैकी एक.

ह्या लेखामध्ये आम्ही “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ह्या भारत सरकारने सुरु केलेल्या अभियानाबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाबद्दल निबंध, भाषण स्पर्धांमध्ये आणि लेख लिहण्यास उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही माहिती पुनर्रचित करू शकता. चला तर मग सुरु करूया.

बेटी बचाओ, बेटी पढाओ / लेक वाचवा लेक शिकवा अभियान मराठी निबंध

भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनीती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. खूप अशा भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री, आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. राणी लक्ष्मीभाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, मदर तेरेसा,कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, साक्षी मलिक, पी व्ही सिंधू अशा काही इतिहासातील आणि अलीकडच्या काळातील कर्तबगार महिलांची नावे आहेत.

जीवन जगणे हा माणसाचा मूलभूत हक्क आहे आणि स्त्रीभ्रूण हत्या करून लोक तो हक्क क्रूरपणे हिसकावून घेत आहेत. ११ ऑक्टोबर ला पूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय बालिका शिशु दिवस (International Girl Child Day) साजरा केला जातो. ह्या दिवशी मुली आणि महिलांबद्दलच्या समस्या जसे कि लैंगिक भेदभाव, स्त्रीभ्रूण हत्या आणि शिक्षण, आरोग्य सेवा यांमध्येही सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांमद्धल जनजागृती केली जाते व ह्या समस्यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले जातात. ह्या दिवशी बालविवाह, महिलांवर होणारे अत्याचार ह्यांबद्दल ही जनजागृती केली जाते. अशा सर्व समस्यांशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हा अभियानाची सुरुवात केली आहे. मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा हा संदेश ह्या अभियानामार्फत दिला जात आहे. ह्या अभियानाला मराठी मध्ये लेक वाचवा लेक शिकवा अभियान असेही म्हटले जाते.

Essay on Beti Bachao Beti Padhao in English

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेलं अभियान आहे. या अभियानाची ओळख ४ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यातर्फे २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणा मधील पानिपत मध्ये अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. संपूर्ण देशामधून ह्या अभियान चांगला प्रतिसाद मिळाला. ऑगस्ट २०१६ मध्ये २०१६ साल च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कांस्य पदक मिळवणारी साक्षी मलिक हिला “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाची ब्रँड अम्बॅसॅडर बनवण्यात आले. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियान घराघरात पोहचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #सेल्फीविथडॉटर(#SelfieWithdaughter) ह्या सोशिअल मीडिया हॅशटॅग ची ओळख करून दिली आणि जनतेला आपल्या मुलीसोबत फोट काढून ते #सेल्फीविथडॉटर(#SelfieWithdaughter) ह्या हॅशटॅग चा वापर करून अपलोड करण्याचे आवाहन दिले. ह्यामुळे “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानावर जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळाली.

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना यशस्वी करण्यासाठी भारत सरकारने आखलेली काही धोरणे

भारत सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ/लेक वाचवा लेक शिकवा अभियानाला यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारची धोरणे आखली आणि ती खालीलप्रमाणे,

१. एका अशा निरंतर सामाजिक अभियानाची निर्मिती करणे ज्यातून बालिका आणि मुलींसाठी सामान संधी उपलब्ध होतील आणि शिक्षणाचा प्रचार होईल.
२. मुलींचा जन्म दर कमी असणाऱ्या जिल्ह्यांवर आणि शहरावर जास्त लक्ष दिले जाईल जेणेकरून तेथील कन्या जन्म दर वाढेल.
३. ठरवण्यात आलेली धोरणे आणि योजना यांची योग्य अंमलबजावणी होते कि नाही यांकडे लक्ष देणे.
४. घटत जाणाऱ्या कन्या जन्म दराची समस्या लोकांसमोर मांडून जनजागृति करणे.

निष्कर्ष

समाजाचा समतोल राखण्यासाठी घटत चाललेला कन्या जन्म दर रोखणे ही काळाची गरज बनली आहे, त्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, लैंगिक भेदभाव, हुंडाबळी ह्यांसारख्या समस्यांचा विनाश केला पाहिजे. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियान हे या दिशेने उचलले गेलेले एक योग्य पाऊल आहे. हे अभियान यशस्वी झाल्यास भारताच्या विकासास नक्कीच मदत होईल.

बेटी बचाओ, बेटी पढाओ/लेक वाचवा लेक शिकवा वर निबंध साठी काही टिपा

१. कोणताही निबंध हा ह्या स्वरूपात लिहिला जातो. निबंधाची सुरुवात विषयाची ओळख करून होते, नंतर विषयाबद्दल अजून माहिती दिली जाते आणि निबंधाचा शेवट हा निष्कर्ष लिहून केला जातो.
२. निबंध लिहताना गडद शाईच्या पेन चा उपयोग करा.
३. निबंधामध्ये खाडाखोड करू नका.
४. निबंध लिहिण्यास सुरुवात करण्याआधी आपण निबंधामध्ये काय काय लिहणार आहोत ह्याचा विचार करून घ्या.
५. निबंध स्पर्धा असेल तर वेळेवर लक्ष ठेवा.
६. निबंधाचा निष्कर्ष २ ते ४ वाक्यांचा असावा पण त्यातून पूर्ण निबंधाचा सारांश कळून यायला हवा.

बेटी बचाओ, बेटी पढाओ/लेक वाचवा लेक शिकवा वर भाषण साठी काही टिपा

१. भाषणाची योग्य तयारी करा. जर तुम्हाला स्टेज वर जाण्याची भीती वाटत असेल तर तुमच्या मित्रांसमोर किंवा आरशासमोर सराव करा.
२. बोलताना तुमचा आवाज मोठा आणि स्पष्ट असुद्या.
३. योग्य तिथे हातवारे वापरा.
४. पुटपुटू नका.
५. आत्मविश्वासाने भाषण द्या. ते तुम्हाला जिंकण्यास नक्कीच मदत करेल.

हा लेख इयत्ता ५,६,७,८,९,१०,११,१२ च्या विद्यार्थ्यांना निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये उपयुक्त ठरेल.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया ह्या आर्टिकल रेट करा आणि खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 140 Average: 3.5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

33 Comments

Secured By miniOrange