निबंध भाषण

दहावी, बारावी निरोप समारंभ भाषण, मनोगत मराठी मध्ये

दहावी, बारावी निरोप समारंभ भाषण

आज या लेखामध्ये आपण दहावी आणि बारावीच्या निरोप समारंभातील भाषण किंवा मनोगत पाहुयात.

दहावी निरोप समारंभ भाषण

नमस्कार….. माझं नाव सचिन कामत, मी श्रीवरदायिनी माध्यमिक विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी आहे. मी या शाळेत पाचवीपासून शिकत आहे आणि आता काही दिवसातच माझी दहावीची परीक्षा होणार आहे. बघता बघता पाच वर्षे ओलांडली, वेळ कसा निघून गेला कळलच नाही. अगदी लहान मुलापासून मी आता टीनेजर झालो ते या शाळेमध्ये.

या शाळेच्या, शिक्षकांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मग तो प्राथमिक शाळेतून या शाळेत आलेला पहिला दिवस असो व हा निरोप समारंभाचा दिवस. या दोन्ही दिवसांच्या मध्ये जोडल्या गेलेल्या आठवणी आणि नाती विसरणे अशक्यच आहे.

या शाळेने खूप काही दिलं आहे मला. ही माझी शाळा म्हणजे जणू काही माझे दुसरे घराचं. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये शिक्षकांना मुलांचे दुसरे पालक समजले जाते, आणि ते खरंच आहे. आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्या सर्वांवर खूप संस्कार घडवले, वेळ पडली तेव्हा शिस्तही लावली. आपल्याला कधी कधी त्यांचा राग येत असे पण आता थोडे मोठे झाल्यावर कळते कि शिक्षक/ शिक्षिका जे काही करत होते ते आपल्या चांगल्यासाठीच करत होते.

आता दहावीची परीक्षा पास होऊन पुढे ज्युनिअर कॉलेजमध्ये जाणार, तिथे या शाळेचे वातावरण मिळेल का? मला थोडी शंका वाटते. मान्य आहे की कॉलेजची एक वेगळीच मजा असते, वेगळी सूट असते. कॉलेजची ही सूट आपल्या वयातील मुला-मुलींना खूप भुरळ घालते. मागे आपले मुख्याध्यापक म्हणाले होते की, फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी.. म्हणजेच स्वातंत्र्य हे जबाबदारीने वापरलं पाहिजे.असे अनमोल संस्कार घडवणारे, विविध बोध देणारे शिक्षक आता परत कुठे मिळणार?

खूप काही केलं या शाळेने अन शिक्षकांनी. दहावी नंतर काय करावे? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काय निवडावे? दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा प्रश्न असतो. आपल्या मुख्याध्यापकांना हे माहिती होते, कारण ते दूरगामी विचाराचे आहेत. काही महिन्यांपूर्वी एक करियर एक्सपर्ट ला आपल्या शाळेमध्ये बोलावले होते. त्यांनी आम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मध्ये कात शिकवले जाते, त्यात करिअर कसे घडू शकते, कशाप्रकारचा जॉब मिळू शकतो या सर्वाची माहिती त्यांनी सविस्तर रीत्या दिली. कमालीची गोष्ट म्हणजे आपल्या मुख्याध्यापकांना कोणीच या शिबिराची मागणी केली नव्हती, त्यांनी स्वतःहून हा उपक्रम राबवला. या करिअर कौन्सिलिंग शिबिरामुळे सगळ्यांचाच खूप फायदा झाला आहे. कदाचीत आता प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना काय करायचे आहे. आणि मला वाटते की वयाच्या या टप्प्यावर हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय आहे.

आता आम्ही काही दिवसच शाळेमध्ये असू नंतर आपापल्या दिशेने निघून जाऊ. पण या शाळेने दिलेले संस्कार, आठवणी मी कधीच नाही विसरू शकणार. हे पटांगण, तिथे होणारे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, खेळ; आपले वर्ग, फळे त्यावर रंगीत खडूने रेखाटलेली चित्र, लाकडी बेंच त्याच्यावर कोरलेली नावं ; कशी विसरू मी?

मला माझ्या जीवनात असे अलौकिक अनुभव दिल्याबद्दल मी आपल्या शिक्षकांचे आणि शाळेचे नतमस्तक होऊन आभार मानतो. मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकणार. एवढे बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र..

बारावी निरोप समारंभ भाषण मनोगत

नमस्कार मित्रहो, माझे नाव सारिका मोरे. मी बारावी सायन्समध्ये शिकत आहे. आता परीक्षा अगदी तोंडावर आली आहे, फक्त पंधरा दिवस बाकी आहेत. परीक्षेनंतर हे कॉलेज सोडून कुठेतरी बाहेर पुढच्या शिक्षणासाठी जाईल. कॅम्पसमध्ये आता माझे काहीच दिवस राहिलेले आहेत, आणि या विचाराने माझे मन अगदी भरुन येते.

आजकालच्या पिढीला असे समजले जाते की त्यांचे शाळा, कॉलेज किंवा शिक्षकांसोबत पाहिल्यासारखे नाते जुडत नाही. पण असं नाही, माझ्यासाठी माझे कॉलेज आणि शिक्षक खूप महत्वाचे आहेत. वेळ पडली तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले.

माझ्या गावाचे नाव मोरगिरी असे आहे, इथून ते तब्बल ३५ किलोमीटर आहे. खूप छोटसं गाव, माझ्या गावात डायरेक्ट बस हि जात नाही. मला बस पकडण्यासाठी काही किलोमीटर चालत यायला लागते. अशा अवस्थेत रोज पस्तीस किलोमीटर प्रवास करून सकाळी आठ वाजता कॉलेजला पोहोचणे अशक्य होते. मला सायन्सच करायचं होतं.. म्हणून मी पहिले तीन महिने पहाटे सहा वाजता निघून कॉलेजला पोहोचायचे. आई वडील बोलत होते कि ५ किलोमीटर जवळचे आर्ट्स कॉलेज जॉईन कर. पण मला फिजिक्स मध्ये खूप रुची आहे म्हणून मला सायन्सच करायचे होते.

जेव्हा आपल्या फिजिक्सच्या राणे सरांना ही गोष्ट कळली, तेव्हा ते अगदी देवासारखे मदतीला धावून आले. त्यांनी मला कॉलेजच्या जवळच असणाऱ्या एका वर्किंग वुमेन हॉस्टेलची माहिती दिली. तसं त्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्याना घेत नाहीत, ते फक्त नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी आहे. पण त्यांच्याशी बोलून आणि विनंती करून सरांनी माझी राहण्याची सोय करून दिली. त्यांनी असं करायचं काहीच कारण नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी मला मदत केली, अगदी निस्वार्थपणे. यामुळे रोज माझे कमीत कमी ५ तास वाचू लागले. या वाचलेल्या वेळाचा उपयोग मी जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी केला. माझा जो काही निकाल असेल त्यामध्ये राणी सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी जर मला ही सोय करून दिली नसती मला अभ्यासाला वेळच मिळाला नसता आणि मी माझ्या स्वप्नाकडे वाटचाल चालू नाही ठेवू शकले असते.

जसे मी अगोदर सांगितले की एक साध्या, छोट्या गावातून शिकलेली मुलगी आहे. मला इंग्लिश एवढं नीट येत नव्हतं कारण माझं शिक्षण हे पूर्णपणे मराठीत झालेलं होतं. आपल्या कॉलेजमधील शिक्षकांनाही याची जाण आहे, म्हणून त्यांनी सुरुवातीला आपल्याला सांभाळून घेतलं. आपली कमकुवत इंग्रजी सांभाळून घेतली, इंग्रजी सुधारायला वेळ दिला. मला माझ्या मराठी भाषेचा सन्मान आहेच पण उच्च शिक्षणासाठी इंग्रजीची गरज भासतेच. मी आपल्या कॉलेजला आणि शिक्षकांना सलाम करू इच्छिते. तुम्ही माझ्या आयुष्यातले गार्डियन एंजल आहात. मी तुमचे धन्यवाद शब्दांमध्ये कसे करू हे मला खरंच कळत नाहीये.

आता पजर तुम्ही राणे सर आणि डिसूजा सरांकडे पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल कि त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे. कुठे मिळतं असं गुरु आणि शिष्य च नातं. सर परत एकदा खूप धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 2 Average: 3]

Didn't find what you were looking for?

टायफून हागीबिस जीजी हदीद


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

About the author

Sueniel

He is a techie, geek or you can call him a nerd too. He likes to read, observe stuff and write about it. As Simple as that...

He is also CEO and Co-Founder of TeenAtHeart.