निबंध भाषण

क्रिसमस, नाताळ विषयी माहिती, निबंध, भाषण मराठीमध्ये – Christmas in Marathi

नाताळ ख्रिसमस विषयी माहिती, निबंध, भाषण मराठीमध्ये - Essay, Speech on Christmas in Marathi

डिसेंबर च्या गुलाबी थंडीमध्ये लहान मुलांपासून थोरामोठ्यांना चाहूल लागते ती म्हणजे नाताळ ची. नाताळ ज्याला प्रामुख्याने ख्रिसमस / क्रिसमस असेही म्हटले जाते हा ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण आहे. नाताळ जगभरात खूप आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. ह्यादिवशी शाळेतली मुले सुट्टीचा आनंद घेतात. शाळेतील मुलांना क्रिसमस  म्हणजेच नाताळ ह्या सणाबद्दल माहिती, निबंध लिहून आणण्याचा गृहपाठ दिला जातो किंवा भाषण हि तयार करून आणण्यास सांगितले जाते. काळजी करू नका, आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.

आम्ही ह्या लेखामध्ये तुम्हाला नाताळ म्हणजेच क्रिसमस बद्दल सर्व आवश्यक माहिती मराठीमधून दिली आहे. हि माहिती तुम्हाला तुमच्या गृहपाठामध्ये, निबंध लिहण्यासाठी आणि भाषणासाठी मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

नाताळ क्रिसमस विषयी माहिती, निबंध, भाषण (Essay on Christmas in Marathi)

नाताळ हा सण जगभरात खूप उत्साहाने साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. नाताळचा दिवस हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. साधारणतः दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी नाताळ जगभरात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मश्रद्धेनुसार नाताळ १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पवित्र पर्वाची सुरुवात करतो.

नाताळ (क्रिसमस ) कसा साजरा करतात?

नाताळ हा सण म्हणजे क्रिस्टी धर्मीयांसाठी आनंदाची पर्वणीच जणू. ह्या दिवशी लोक आपल्या घरांची रंगीबेरंगी आकर्षक रोषणाईने सजावट करतात. विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवले जातात.नाताळ च्या दिवशी नाताळ वृक्ष म्हणजे ख्रिसमस ट्री उभारली जाते. क्रिसमस ट्री हि सूचिपर्णी वृक्षापासून बनवली जाते. आणि तिला अतिशय सुंदर अशी सजावट केली जाते. नाताळच्या मध्यरात्री सांताक्लाॅज (नाताळबाबा ) येऊन लहान मुलांना भेटवस्तू देऊन जातो असा समाज आहे.

नाताळ बद्दल इंग्रजी मध्ये १० ओळी, वाक्ये | 10 Lines, Sentences on Christmas (Xmas)in English

सांताक्लाॅजचे चित्रण साधारणतः लठ्ठ, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, चष्मा लावलेली, लाल अंगरखा घातलेली व्यक्ती असे केले जाते. असा हा सांताक्लाॅज लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवी हि सोबत घेऊन फिरतो असे समजले जाते. यादिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू, फुले, ग्रीटिंग्स म्हणजेच शुभेच्छापत्रे देऊन आनंद साजरा करतात.

नाताळच्या दिवशी रस्ते, घरे, दुकाने, मोठमोठे मॉल्स, हे सुंदर रोषणाईने आणि आकर्षक सजावटीने सजवले जातात. ह्या दिवशी दुकानांमध्ये विविध वस्तूंच्या किंमतीवर सवलती हि दिल्या जातात. कुटुंबातील लोक नाताळची संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊन साजरी करतात. अशा प्रकारे नाताळचा उत्साहवर्धक सण साजरा केला जातो.

क्रिसमस विषयी माहिती मराठीमध्ये (Information about Christmas)

येशू ख्रिस्ताचा जन्माचा स्मरणार्थ ख्रिसमस साजरा केला जातो. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी जगभरातील कोट्यावधी लोक अगदी उत्साहाने ख्रिसमस साजरा करतात. क्रिसमस डे ला अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. नाताळ आता फक्त ख्रिश्चन बहुसंख्य देशांमध्ये नाहीतर गैर-ख्रिश्चन देशांमध्येही साजरा केला जातो. आता हा सण फक्त ख्रिश्चन सण न राहता यातील धर्मनिरपेक्ष परंपरा जवळपास प्रत्येक देशामध्ये स्वीकारल्या गेल्या आहेत. जसे की क्रिसमस ट्री डेकोरेशन, पार्टी, गेट-टुगेदर, ग्रीटिंग्स इत्यादी.

ख्रिसमसला मराठीमध्ये नाताळ का म्हणतात?

मराठी तसेच गुजराती लोक ख्रिसमसला नाताळ असे संबोधतात. पोर्तुगीज एक्स्प्लोरर वास्को-द-गामा ख्रिसमसच्या दिवशी साऊथ आफ्रिकेतील एका भागात पोहोचला आणि त्या भागाचे नाव नाताळ असे होते. या भागात काही गुजराती व्यापारीही राहत असत आणि त्यांनी क्रिसमस च्या जागी नाताळ हा शब्द वापरायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या काळी किंवा त्या अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र हा भाग एकच प्रांतात येत असे, त्यामुळे क्रिसमस ऐवजी नाताळ हा शब्द मराठीमध्ये सुद्धा रूढ झाला असावा.

येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख

येशूच्या जन्माची तारीख किंवा महिना हा कोणालाच नक्की माहित नाही परंतु चौथ्या शतकाच्या सुरुवातीस चर्चने 25 डिसेंबर तारीख ठरवली. त्यापुढे ही तारीख वापरण्यात आली. पण ही तारीख जुन्या जुलियन दिनदर्शिकेनुसार ठरवण्यात आली होती आणि आता आपण ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 25 डिसेंबरला क्रिसमस साजरा करतो. जुन्या जुलियन दिनदर्शिकेनुसार येशू ख्रिस्ताची जन्मतारीख आताच्या ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार जानेवारीमध्ये येथे. युरोपमधील काही जुन्या चर्च अजूनही ख्रिसमस जानेवारीमध्ये साजरा करतात.

पण सर्वांचे एकत्रीतपणे असे म्हणणे आहे की मानवाच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी देवाने येशू ला पृथ्वीवर पाठवले, ही जाण असणे महत्त्वाचे आहे. येशूचा जन्म तारखेवर वाद विवाद करण्यापेक्षा त्यांच्या शिकवणीवर लक्ष द्यावे असे त्यांचे मत आहे.

क्रिसमस आणि शॉपिंग

मुख्यता पश्चिमी देशांमध्ये क्रिसमस आठवड्यांमध्ये भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. या आठवड्या दरम्यान पश्चिमी देशांमध्ये आपल्या दिवाळीसारखे सुट्टी असते, आणि लोक नवीन वस्तू यावेळीच खरेदी करतात. त्यामुळे छोट्या किंवा मोठ्या विक्रेत्यांसाठी हा सण खूप फायद्याचा ठरतो. ग्राहकांना सुद्धा या सीझनमध्ये विविध डील्स मिळतात.

क्रिसमस च्या पद्धती व परंपरा

जसे आपण वर पाहिले कि ख्रिसमस हा आता फक्त ख्रिश्चन बहुसंख्य देशांमध्ये नाहीतर पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. यामागचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिश वसाहतवाद होय. जिथे जिथे ब्रिटिशांची वसाहत होती तिथे क्रिसमस हा सण स्वीकारला गेला आहे, जसे की भारत, दक्षिण पूर्व आशिया इत्यादी. जपान सारख्या काही देशांमध्ये जरी ख्रिश्चन अल्पसंख्याक असले तरी सांस्कृतिक प्रभावामुळे ख्रिसमस हा आता तिथे खूप मोठा सण झाला आहे.

चर्च उपस्थिती

क्रिसमस सणाच्या दरम्यान चर्चमध्ये लोकांची उपस्थिती वाढते. आजच्या धावत्या युगात पश्चिमी लोकांना चर्चमध्ये सेवा करण्यासाठी जाणे तेवढे जमत नाही, पण या आठवड्या दरम्यान ते आवर्जून चर्चमध्ये जातात आणि तिथे आपली सेवा सुद्धा प्रदान करतात.

सजावट

ख्रिसमसच्या दिवशी लोक आपले घर, चर्च लाइट्स ने सजवतात, त्यासोबत ते क्रिसमस ट्री ही सजवतात. नाताळ दरम्यान ही सजावटीची पद्धत खूप जुनी आहे. पंधराव्या शतकात लंडनमध्ये लोक आपले घर आणि चर्च मध्ये हिरव्या रंगाची सजावटीने सजवत असत. या सजावटीमध्ये मुख्यता लाल, हिरवा आणि सोनेरी रंग वापरला जातो. अगोदर एवर ग्रीन ट्री घरामध्ये सजवली जात असे पण आता त्या ऐवजी प्लास्टिकची क्रिसमस ट्री वापरली जाते.


नाताळच्या पद्धतीबद्दल आणि परंपरेविषयी जास्त जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या साईटवरचे आर्टिकल वाचा. तिथे दिलेल्या माहितीचा उपयोग तुम्हाला नाताळ वर निबंध किंवा भाषण लिहिण्यासाठी होऊ शकतो.

 

जर तुम्हाला हि नाताळ बद्दलची मराठी माहिती (Essay on Christmas in Marathi) आवडली असेल तर कृपया खाली कंमेंट्स मध्ये आम्हला जरूर कालवा आणि ५ स्टार रेटिंग द्यायला विसरू नका. धन्यवाद. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 81 Average: 3.4]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

5 Comments

Secured By miniOrange