निबंध भाषण मराठी

बिटकॉइन काय आहे, गुंतवणूक कशी करावी, याचा आजचा दर भविष्य, इतिहास- सर्व माहिती मराठी मध्ये

Bitcoin kaise kaam karata hai, kaise kharide, karate (earn) karen, Kaise use, purchase karen

Here in this article we are giving you information about latest craze in India “Bitcoin” in simple marathi language so that everyone understands it. It is easy to explain topic in technical english, we tried our best to write it in marathi. Hope you like it. Let us know in commnet if you like us to cover more topics on Bitcoin.

बिटकॉईन आजकल चर्चेचा एक मोठा विषय ठरला आहे. कोणी यास पैसे कमविण्याची खूप मोठी संधी म्हणते तर कोणी याला पिरॅमिड किंवा पॉन्झी स्किम बोलत आहे. या लेखामध्ये आम्ही प्रयत्न केले आहे की बिटकॉइन बद्दल जास्तीत जास्त माहिती आपणास सध्या सोप्या मराठी मध्ये देऊ| येथे आपल्याला बिटकॉइन नक्की काय आहे (व्हाट इस बिटकॉईन?), यात गुंतवणूक कशी करता येते? यात काय धोका आहे? याचे काय फायदे आहेत आणि नुकसान कसे होऊ शकते? याचे किती प्रकार आहेत? त्यांचे दैनिक दर कसे तपासायचे? याचा इतिहास आणि भविष्य – सर्व काही सोप्या मराठी मध्ये

काय आहे बिटकॉइन? What is Bitcoin?

व्हॉट इस बिटकॉइन? ही एक मौद्रिक प्रणाली किंवा डिजिटल मुद्रा आहे ज्यात पीयर-टू-पीयर तंत्रज्ञानाचा वापर केला करतो. ही विकेंद्रीकृत मुद्रा आहे, याचा अर्थ, ही कोणत्याही सरकार, केंद्रीय किंवा इतर बँकां कडून संचालित केली जात नाही. बिटकॉइन बनवण्यामागे हे एक मुख्य कारण आहे, की ते कोणत्याही सरकार किंवा बँकेचता नियंत्रणाखाली नसावे. बिटकॉइन सध्याच्या मुद्रांना आव्हान देते ज्या पूर्णपणे सरकार आणि केंद्रीय बँकांच्या नियंत्रणाखाली असतात. याचे निर्माण सतोशी नाकामोतो नावाचे एक व्यक्ती किंवा ग्रुप ने केले आहे, हे त्याचे वास्तविक नाव नाही, सतोशी नाकामोतोचे वास्तविक ओळख अद्याप झाले नाही.

बिटकॉईन ही एक वर्च्युअल करन्सी आहे, याचा अर्थ आपण ती पाहू शकत नाही, तिचे कोणतेही भौतिक रूप नाही. ही एक अतिशय जटिल संगणक अल्गोरिदम वर चालते. कारण ही मुद्रा सरकारद्वारा संचालित नाही, आपणास कोणत्याही प्रकारचे फ्रॉड प्रोटेक्शन, इनवेस्टमेंट टॅक्स एक्सपेम्पशन इत्यादी सुविधा मिळत नाहीत. (आजकाल काही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस अशा काही सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत ,परंतु अद्याप त्या एक स्टॅंडर्ड नुसार दिल्या जात नाहीत). प्रत्येक देशामध्ये हे नियम आणि गाईडलाईन्स वेगळे आहेत. भारतामध्ये बिटकॉइन लीगल आहे पण रेग्युलेटेड नाही. याचा अर्थ असा आहे की ही भारतीय शासन मान्यताप्राप्त मुद्रा नाही.

इतिहास – Bitcoin History

बिटकॉइन: ए पीर-टू-पीयर इलेक्ट्रॉनिक कैश सिस्टम नावाचा एक व्हाईट पेपर नोव्हेंबर २००८ साली सातोशी नाकामोतो ने इंटरनेट वर पब्लिश केला. असं म्हटलं जात की सातोशी हा एक जपानी कॉम्पुटर सायन्स किंवा क्रिप्टोकरन्सी एक्स्पर्ट आहे, पण अजूनही कुणाला त्यांची खरी ओळख माहीत नाही. कदाचित ही एक व्यक्ती नसून एक ग्रुप असावा.

जानेवारी २००९ मध्ये, नाकोमोतो ने पहिले बिटकॉइन सॉफ्टवेअर रिलीझ केले, त्यांनी त्याचे नेटवर्क आणि युनिट स्थापित केलं. असं बोलल जात की याची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. सुरवातीला सातोशी नाकामोतो आणि मार्त्ति मलमी या डेव्हलपर्स नी bitcoin.org वेबसाइट सुरु केली या वरून ते बिटकॉइन सोफ्टवेअर रिलीझ करत असत. २०१० च्या मध्यात सातोशीने प्रोजेक्ट मधून माघार घेतली, त्याने याची सोर्स कोड रेपोसिटोरी आणि अलर्ट की एक कंप्यूटर विज्ञान विशेषज्ञ आणि प्रिंसटन विश्वविद्यालय चे ग्रेजुएट, गैविन एंड्रेसेन ला दिली.

सुरवातीला बिटकॉइन ने वेस्टर्न देशांमध्ये जोर पकडला, मुख्यता अमेरिकेमध्ये. आता हे पूर्ण जगात पसरले आहे, चीन मध्ये याचे सगळ्यात जास्त यूजर आहेत आणि भारतीयांमध्ये ही याची रुची खूप वाढली आहे. आज मोठ्या इन्व्हेस्टर पासून पानटपरी वाला ही या बद्दल ची चर्चा करत आहेत. इथे एक गोष्ट जाणणे महत्वाचे आहे, बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करणे आणि ती रोजच्या व्यवहारात वापरणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या एकाच अँप (app) मधून करता येतात. या बद्दल पुढे आपण बोलूच..

बिटकॉइन वापरणे तसे काही अवघड नाही, हे एक डिजिटल वॉलेट सारखे काम करते. भारत लोकांना आता डिजिटल वॉलेट वापराची सवय झाली आहेच. पण या मागची टेकनॉलॉजि, लॉजिक खूप अवघड आहे. एक सामान्य मनुष्य किंवा एक टिपिकल शिकलेल्या व्यक्तीलाही हि ते समजणे थोडे हार्ड वाटू शकते, पण अशक्य जरूर नाही. बिटकॉइन, ब्लॉकचेन, मायनिंग हे तांत्रिक भाषेत समजावणे तसे सोपे जाते, पण आम्ही हे सर्व सोप्यात सोप्या मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न करोत आहोत.

बिटकॉइन चे भविष्य – What is Bitcoin Future

बिटकॉइन समजणे तसे थोडे कठीण आहे, फक्त कॉम्पुटर किंवा क्रिप्टोग्राफी एक्स्पर्ट हे नीट समझू शकतात. बिटकॉइन इन्व्हेस्टमेंट मध्ये हा एक मोठा अढथळा होऊ शकतो. कारण जी गोष्ट आपण समझू शकत नाही त्यात डोळे बंद करून इन्व्हेस्ट करण, तस चुकीचे आहे. आपल्याला कळलं पाहिजे आपण कश्यात इन्व्हेस्ट करतोय, ते कसे चालते, काय रिस्क आहेत, लॉस कंट्रोल कसा करता येईल आदी. शेवटी आपण आपला मेहनतीचा पैसे यात गुंतवतो, नाही का?

आपण जाणलंय कि बिटकॉइन कुठल्याही फिसिकल ऍसेट वर आधारीत नाही, याची दुर्लभता कृत्रिम आहे, या मुळे हि एक रिस्की गुंतवणूक होऊ शकते. हि एक कॉम्पुटर अलोगॉरिथम बेस्ड टेकनॉलॉजि आहे, या अगोदर काही लोकांनी यातल्या बग्स आणि लूपहोल्स चा गैर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते बग्स लगेच फिक्स हि करण्यात आले. पण असे परत हि होऊ शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, हे एक पिअर-टू-पिअर टेकनॉलॉजि आहे म्हणजे यात बॅंक्स, सरकार मध्यस्ती नसते, हि याची मुख्य खासियत सुद्धा आहे. पण यामुळे ग्राहकाला फ्रॉड प्रोटेक्शन, टॅक्स एक्सजेम्पशन आदी मिळत नाही. जर तुमची पासवर्ड कि हरवली तर तुम्ही तुमचे बिटकॉइन वापरू शकणार नाही. जर तुम्ही एखादे चुकीचे ट्रान्सक्शन केले तर ते रिव्हर्स करता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या गुप्त स्वभावामुळे याचा वापर मनी लॉण्डरिंग, भ्रष्टाचार, टॅक्स एवेजन, टेररिस्ट फंडिंग साठी सुद्धा होऊ शकतो. जगभरातले सगळे देश बिटकॉइन ला सपोर्ट करत नाहीत. भारतामध्ये बिटकॉइन बेकायदेशीर नाही पण सरकार मान्यता प्राप्त मुद्रा देखील नाही. भारतामध्ये याचा आपण पैसे म्हणून वापर करू शकत नाही. काही देशांमध्ये हे चालते, जसे अमेरिका, काही युरोपिअन देश आदी.

बिटकॉइन ची किंमत खूप अस्थिर आहे. २०१७ च्या सुरवातीला याची प्राईस होती १००० डॉलर, सप्टेंबर मध्ये ती झाली ३७०० डॉलर. डिसेंबर २०१७ मध्ये आतापर्यनची हायेस्ट १७,५४९ डॉलर झाली, आणि पुढच्या दोन महिन्यात ती घसरून ८००० डॉलर वर आली आहे. याचा हा अस्थिर स्वभाव यातील गुंतवणूक जास्त धोकादायक बनवते.

या बिटकॉइन बबल मध्ये खूप लोक इन्व्हेस्ट करत आहेत, मोठे इन्व्हेस्टर, बिजनेसमन, सेलेब्रिटी, आणि छोट्या शहरातील लोक सुद्धा. आजकाल तर पानटपरी वर ही bitcoin ची चर्चा होत आहे. लोग इन्व्हेस्ट करत आहेत म्हणजे ते सर्वकाही समजतात असं नाही, कोणी दुसऱ्याच्या सांगण्यावरून करत आहेत तर कोणी जणू जुगार खेळत आहेत. एक चांगला इन्व्हेस्टर सगळ्या गोष्टी समजून गुंतवणूक करतो.

बिटकॉइन भविष्यात एक ऑपशनल करन्सी होऊ शकते, तिचे तसे खूप फायदे आहेत. बिटकॉइन चे भविष्य खूप गोष्टींवर आधारित आहे, याचा कायदेशीरपणा, सप्लाय-डिमांड, अवेअरनेस आदी. आता बिटकॉइन च्या भविष्याचा कोणीही पूर्ण अंदाज बांधू शकत नाही.

या विषयावर खूप काही बोलण्या सारखे आहे, जसे; बिटकॉइन कसे चालते? याचे फायदे, नुकसान काय? आजचा रेट , किंमत कशी बघायची? याची किंमत कशी ठरते? हे कोण बनवत? हे कसे वापरायचे, कमवायचे, खर्च कसे करायचे? ब्लॉकचेन, बिटकॉइन मायनिंग काय असते ? आणि खूप काही.

जर वर दिलेली माहिती तुम्हाला आवडली आर आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा, आम्ही वर दिलेल्या प्रश्नाची उत्तरे ही देण्याचा प्रयत्न करू, जर तुम्हाला कुतुहूल असेल तर. तो पर्यंत तुम्ही हा हिंदी लेख वाचू शकता- बिटकॉइन क्या है

सूचना: या लेखाचा उद्देश माहिती देण्याचा आहे, कृपया याला इन्व्हेस्टमेंट टिप्स किंवा गाईडलाईन्स मानू नये. आमचा बिटकॉइन शी काहीही संबंध नाही.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 4 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange