निबंध भाषण मराठी

भ्रष्टाचार संपला तर – मराठी निबंध, भाषण, लेख

भ्रष्टाचार संपला तर - मराठी निबंध, भाषण, लेख

१९४७ साली आपला हा भारत देश स्वतंत्र झाला. गुलामगिरी आणि पारतंत्र्याच्या शृंखला गळून पडल्या. खऱ्या अर्थाने आपण भारतीय म्हणून गणले जाऊ लागलो पण खरेच आपण स्वतंत्र झालो का? आपल्याच देशात आपल्याच लोकांकडून आपण लुटले जात आहोत, नागवले जात आहोत आणि याच कारणामुळे देशाची प्रगती खुंटली जात आहे. आणि त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची कीड भारताला पोकळ करत चालली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे देशाची प्रगती खालावली आहे.पण जर अचानक देशातील भ्रष्टाचार संपला तर? तर काय होईल?

भ्रष्टाचार संपला तर काय होईल हेच आम्ही ह्या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा भ्रष्टाचार संपला तर या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते.ह्या लेखामध्ये आम्ही भ्रष्टाचार संपला तर या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला भ्रष्टाचार संपला तर ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

भ्रष्टाचार संपला तर – मराठी निबंध, भाषण, लेख

आजचे युग विज्ञानाचे युग आहे. शास्त्रज्ञ निरनिराळे शोध लावत आहेत. उद्योजक निरनिराळ्या उद्योगधंद्यात प्रगती करत आहेत. प्रगत देश म्हणून आपल्या देशाचे भविष्य निश्चित आहे. परंतु हाच सुशिक्षित समाज आपल्या बांधवाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुरफटून टाकत आहे.

शिक्षणापासून ते रोजच्या व्यवहारापर्यंत सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि काळा बाजार यांनी आपला विस्तार केला आहे. सर्व क्षेत्रात आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की भ्रष्टाचाराशिवाय कोणतेच काम पुढे सरकत नाही. ‘लाच देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा आहे’ या ओळी फक्त कायद्याच्या पुस्तकातच वाचायला मिळतात. कारण प्रत्येकाला माहित असते की लाच दिल्याशिवाय आपले काम होणारच नाही.

सगळ्या भ्रष्टाचारी वृत्तीचे मूळ म्हणजे आपले शासनचं आहे. आपल्या देशात कायदे बनवणारेही तेच आणि कायदे मोडणारेही तेच. हे शासनकर्ते भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. या शासनातील लोकं मत मिळवण्यापासून ते निवडून आल्यावर देखील सुधारणांच्या नावाखाली मंजुरी मिळवण्यापर्यंत लाच देत, घेत असतात. त्यामुळे स्वतःच्या सात पिढ्या बसून खातील एवढी तुंबडी भरून ठेऊ शकतात. पण सामान्य माणूस मात्र यामध्ये दबून पिचून जातो.

Essay on Corruption in India, Short Speech, Paragraph & Article

जिथे दोन वेळेचे पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही तिथे लाच देण्यासाठी पैसे कुठून आणणार आणि लाच देत नाही तोपर्यंत कितीही हेलपाटे घातले तरी काम न होता हात हलवत परत यावे लागणार. त्यामुळे नाईलाजाने कर्ज काढून, उपासमार सोसून हा सामान्य माणूस लाच देऊन आपले काम करून घेत असतो आणि ‘माझे तर काम झाले दुसऱ्याचे मला काय करायचे’ अशा वृत्तीमुळे हर एकजण  प्रत्येक क्षेत्रात असेच वागत असतो.

मूल जन्मल्यानंतर शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी देखील शाळा संचालकांचे हात ओले करावे लागतात. नावे वेगळी दिली तरी इथून-तिथून अर्थ एकच आणि अर्थाशीच निगडित. शाळेत प्रवेश घेण्यापासून ते नोकरी लागण्यापर्यंत पैसे द्या, कॉलेजला पैसे द्या, कॉलेज संपले की नोकरीसाठी लाच द्या. नोकरी लागण्यापासून घर घेणे, ओळखपत्र काढणे, प्रमोशन मिळवणे या सर्वांसाठी इतकेच काय तर खालच्या शिपायापासून वरच्या मॅनेजर पर्यंत सर्वांचे हात ओले करावे लागतात. या भ्रष्टाचारामुळे शेतकरी बांधवाना देखील अन्याय सहन करावा लागतोय. कमी दरामध्ये आपला माल हा व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. व्यापारी, दलाल मात्र भरपूर नफा मिळवतात आणि कष्ट करूनही शेतकऱ्याच्या वाट्याला कमी मोल मिळते.

असे वाटते भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटण्यासाठी एकजुटीची गरज आहे. एकजुटीने हा प्रश्न सोडवला तरच पैशाशिवाय देखील कामे होऊ शकतात ही भावना लोकांत रुजवली जाईल. आणि तेव्हाच ‘आपला’ भारत न राहता ‘माझा’ भारत होईल. दुसऱ्याचे दोष दाखविण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःला आधी सुधारायला हवे. तरच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम होईल, स्वतंत्र आणि भ्रष्टाचारमुक्त होईल.


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये भ्रष्टाचार संपला तर ह्या विषयावर निबंध भाषण दिले आहे. मी अशा अशा करतो कि हा निबंध भाषण तुम्हला उपयोक्ता ठरेल. जर तुम्हाला हा निबंध भाषण आवडले असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 8 Average: 4]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

5 Comments

Secured By miniOrange