निबंध भाषण मराठी

बेरोजगारी, बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख

बेरोजगारी, बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध, भाषण, लेख

भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तरहून अधिक वर्षे झाली. भारतीयांनी विविध क्षेत्रात प्रगती केली; पण या काळात आपल्या भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक समस्यांना भारत एकजुटीने सामोरा गेला आणि कठीण परिस्थितीवर त्याने मात केली. पण मानवनिर्मित समस्या मात्र राष्ट्रप्रगतीला विघातक ठरत आहेत. त्यांपैकी एक भीषण समस्या म्हणजे बेरोजगारी. ह्या लेखामध्ये आम्ही बेरोजगारी, बेकारी, एक भीषण समस्या या विषयावर मराठी माहिती, निबंध, भाषण दिले आहे. हि माहिती तुम्हाला गृहपाठामध्ये तसेच निबंध, भाषण स्पर्धांमध्ये बेरोजगारी या विषयावर निबंध, भाषण तयार करण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

बेरोजगारी, बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख

आज भारतात कोट्यवधी माणसे सुशिक्षित-अशिक्षित, कुशल-अकुशल कारागीर, स्त्री, पुरुष बेकार आहेत. उद्योग, नोकरी, कामधंदा करण्याची इच्छा असूनही त्यांच्या पदरी निराशा येते. एके काळी असा समाज होता की, शिक्षण घेतले तर आपल्याला नोकरी मिळेल; पण आज काय दिसते? लक्षावधी सुशिक्षित, पदवीधर बेकार आहेत. असे का?

याचे उत्तर सतत वाढत जाणारी आपली अफाट लोकसंख्या हे आहे. स्वातंत्रोत्तर काळात शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला नोकरी मिळावी अशी सर्वांची अपेक्षा असते. पण सुशिक्षितांच्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या अल्प आहे. त्यामुळे बेकारांची संख्या सतत वाढत आहे.

अशा या भीषण अवस्थेत बेकार तरुण बेभान होतो. ‘रिकामे डोके सैतानाचे घर असते’, या उक्तीनुसार या बेकारांतून गुन्हेगार निर्माण होतात. अलीकडे तर असे लक्षात आले कि, सीमेवरच्या दहशतवाद्यांमध्ये आणि शहरातील टोळीयुद्धात हे बेकार तरुण सामील होतात, यालाही बेरोजगारीच कारणीभूत आहे.

बेरोजगारांच्या वाढत्या संख्येला वाढतं शहरीकरण कारणीभूत आहे आणि म्हणूनच गरिबीही वाढलेली आहे. शहरीकरण म्हणजे काय? तर उदरनिर्वाहासाठी खेड्यातील माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरात स्थलांतर करतात आणि वास्तव्य करतात. खेड्यातील आपले घर, शेती सर्व काही सोडून शहरात स्थायिक होतात.

या बेरोजगारीतून शहराचे होणारे मोठे नुकसान म्हणजे, आपल्या देशातील बुद्धिमान तरुण परदेशात शिक्षणासाठी जातात आणि तेथेच स्थायिक होतात. त्यामुळे आपल्या देशातील बुद्धिमत्ता आपल्या देशाच्या उपयोगी येत नाही.

ही बेरोजगारी नष्ट करायची असेल, तर आपण उदरनिर्वाहासाठी नोकरीवर अवलंबून राहणे थांबवले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, आपल्याला अन्य कोणीही स्वयंरोजगार आपल्या हातात आणून देणार नाही. आपण समाजातील व्यवहारांचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले पाहिजे. लोकांच्या गरजा कोणत्या आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे शोधले पाहिजे. त्यातूनच आपला स्वयंरोजगार उभा करायचा आहे.

दुसरा एक मार्ग म्हणजे ग्रामीण भागाकडे वळले पाहिजे. तेथे शेती-आधारित अनेक व्यवसाय आपली वाट पाहत आहेत. कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन, मधुमक्षिकापालन वगैरे अनेक व्यवसायांची येथे नावे सांगता येतील. फळे, फुले, दूध औषधी वनस्पती आदींच्या निर्मितीमधून मोठमोठे व्यवसाय उभे करता येतील. या व्यवसायांसाठी आपले शासनही भरपूर सहाय्य्य करण्यास तयार आहे. Essay, Speech on Unemployment in English

बेरोजगारीची कारणे –

१. लोकसंख्या वाढीची जास्त गती – स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे श्रमशक्ती वाढत गेली. अपुऱ्या आर्थिक विकासामुळे या अतिरिक्त श्रमशक्तीला द्वितीय व तृतीय क्षेत्रात सामावून घेता आले नाही. त्यामुळेच बेरोजगारी वाढत चालली आहे.
२. शेती मशागतीचे मागास स्वरूप – अज्ञान व निरक्षरतेमुळे भारतातील शेतकरी शेतीमध्ये परंपरागत पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही. याचाच परिणाम म्हणजे बेरोजगारी वाढते.

बेरोजगारीचे प्रकार

ग्रामीण बेरोजगारी

ही बेरोजगारी ग्रामीण भागात दिसून येते. ही एक गंभीर स्वरूपाची बेरोजगारी आहे. यामध्ये खालील प्रकार येतात.

हंगामी बेरोजगारी

भारतात बहुतेक शेतकरी लागवडीसाठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते. यामुळे ग्रामीण शेतमजुरांना केवळ ४ ते ५ महिनेच काम प्राप्त होते व उर्वरित काळ ते बेकार राहतात म्हणून या प्रकाराला हंगामी बेरोजगारी म्हणतात. ही बेरोजगारी शहरी भागात सुद्धा आढळते. उदा. पर्यटन क्षेत्रातील मार्गदर्शक, लग्नसमारंभातील वादक इत्यादी.

छुपी बेरोजगारी

अति लोकसंख्येच्या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये छुपी बेरोजगारी ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या आहे. या प्रकारच्या बेकरीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची सीमान्त उत्पादकता शून्य राहते म्हणजेच अतिरिक्त लोक उत्पादनात कोणतीही भर टाकत नाहीत व छुपी बेरोजगारी निर्माण होते.

उदा. एखाद्या कारखान्यात उत्पादन प्रक्रियेसाठी केवळ १५ कामगारांची गरज असताना तेथे २० कामगारांनी काम करणे. येथे अतिरिक्त ५ कामगार छुपे बेकार ठरतील व ते उत्पादनात कोणतीही भर टाकत नाहीत. अशा अतिरिक्त कामगारांनी उत्पन्नाचे मूल्य विनाकारण वाढते.

शहरीबेरोजगारी

जी बेरोजगारी शहरी भागामध्ये आढळून येते त्याला शहरी बेरोजगारी म्हणतात. याचे खालील प्रकार आहेत.

सुशिक्षित बेरोजगारी

ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल तर, अशा स्थितीला सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. ही बेकारी दहावी, बारावी पस झालेले, पदवीपूर्व, पदवीधर, पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते.

नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. म्हणूनच बेरोजगारीवाढते.

तांत्रिक बेरोजगारी

उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेरोजगारी निर्माण होते त्या बेरोजगारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते.

 चक्रीयबेरोजगारी

तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. हा बेरोजगारीचा प्रकार व्यापार चक्रामुळे निर्माण होतो. मंदीच्या काळात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक क्रिया मंदावतात त्यामुळे उद्योगांचे मालक उत्पादन कमी करतात. परिणामी कामगारांना कामावरून कमी केले जाते.

 संरचनात्मक बेरोजगारी

जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते. जेव्हा मागासलेल्या व परंपरागत अर्थव्यवस्थेत सरंचनात्मक बदल होऊन ती आधुनिक व विकसित होत जाते तेव्हा मागणीमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल होतात. त्यातूनच संरचनात्मक बेकारी निर्माण होते. ही बेकारी एक दिर्घकालीन टिकणारी बेरोजगारी आहे.

सरकारी उपाययोजना

बेरोजगारी मिटवण्यासाठी शासनाची रोजगार हमी योजना, धान्य वितरण योजना किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांचा लाभ सध्या तरी सर्वच गरीब कुटुंबियांना पूर्णतः मिळतो असं दिसत नाही. अशा या शासकीय सुविधांचा लाभ जर गरीब कुटुंबियांना मिळाला तर नक्कीच परिस्थिती सुधारू शकेल. पण प्रत्यक्ष मात्र लाभार्थींऐवजी इतर लोकच या योजनांचा लाभ घेतात. तसेच काही वेळा या योजना गरिबांपर्यंत पोहचू न शकल्यामुळे त्यांना या सर्व सुविधांचा लाभ घेता येत नाही.

त्यामुळे याचाच फायदा कंत्राटदार, बिल्डर असे हे लोक घेतात. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे तसेच या वाढत्या शहरीकरणामुळे गरीब आणि बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी सरकारनेही नक्कीच काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत आणि या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहचवली पाहिजे. तरच या वाढत्या बेरोजगारांच्या संख्येला आळा बसेल. तसेच या बेरोजगारांच्या आत्महत्येची संख्या कमी होईल.

वरील बेरोजगारी, बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध, भाषण, लेख जर तुम्हाला आवडले असेल तर चांगली रेटिंग देऊन आम्हाला प्रोत्साहित करा म्हणजे आणखी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 5 Average: 4]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange