निबंध भाषण मराठी

थोर समाजसुधारक बाबा आमटे – मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

थोर समाजसुधारक बाबा आमटे - मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख
YouTube

भारताला अनेक थोर समाज सुधारक रत्ने सापडली आहेत. या समाजसुधारकांनी आपले आयुष्य पणाला लावून समाज परिवर्तन घडवून आणण्यास मदत केली. अशाच थोर समाजसुधारकांपैकी एक म्हणजे समाजसुधारक बाबा आमटे. शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या थोर व्यक्तिमत्वांबद्दल माहिती, निबंध, भाषण लिहून आणण्यास सांगितले जाते.

या लेखामध्ये आम्ही थोर समाजसुधारक बाबा आमटे च्याबद्दल माहिती, निबंध, भाषण दिले आहे. हि माहिती तुम्हाला तुमच्या गृहपाठासाठी तसेच थोर समाजसुधारक बाबा आमटे यांच्या जीवनावर निबंध, भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

थोर समाजसुधारक बाबा आमटे – मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

आपल्या या भारत भूमीवर अनेक थोर नेते आणि समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्यामुळेच आपल्या देशाची प्रगती झाली. या सर्वांनी आपल्याला चांगले विचार, चांगली शिकवण दिली. दलितांसाठी भरपूर प्रयत्न केले, अनेक पीडितांना त्यांनी मदत केली, गरिबांसाठी शाळा उभारल्या, मुलींसाठी स्वतंत्र शाळा उभ्या केल्या तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बहुमोलाचे कार्य या सर्वांनी केले. काहींनी तर देशासाठी प्राणांची आहुती दिली. अशा सर्वांना आपण सर्वांनी सलाम करूयात. खरंच त्यांच्यामुळेच आपण आज सुखी आणि स्वतंत्र भारतात सुखाने जगत आहोत.

असेच एक थोर समाजसुधारक म्हणजे बाबा आमटे. बाबा आमटे यांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे असे होते. बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर, इ.स. १९१४ रोजी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांचे बालपण अगदी सुखात गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. आपण डॉक्टर व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले होते. त्यानंतर काही काळ त्यांनी वकिलीही केली.

बाबा आमटेंचे संपूर्ण जीवनच असामान्य होते. ‘अपयशाला न भीत धैर्याने तोंड देणे’ ही शिकवण, संस्कार बाबांवर बालवयातच झाले. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे वकील झालेले बाबा त्या जीवनात समाधानी नव्हते. त्यांना सामान्य जीवन जगण्यात रस नव्हता.

बाबांच्या जीवनातील एक घटना त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी देऊन गेली. एकदा पावसाच्या दिवसात बाबा रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्यात एक कुष्ठरोगी दिसला.प्रथमदर्शनी बाबांना त्याची किळस वाटली. पावसात तो भिजत होता म्हणून बाबांनी त्याच्या अंगावर पोटे टाकले, परंतु त्याला स्पर्श केला नाही, बाबा तसेच पुढे निघून गेले. पण त्यांच्या विवेकी मानाने त्यांना टोचणी लावली, ‘त्या कुष्ठरोग्यांच्या जागी तू असतास तर? तू केलेस हे बरोबर केलेस का?’ हाच क्षण बाबांच्या जीवनातला साक्षात्काराचा क्षण ठरला.

बाबांनी त्याच क्षणी आपल्या घरादाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला व आपले कार्य सुरु केले. ज्यांना समाजाने दूर फेकले होते त्यांना बाबांनी जवळ केले. त्यांच्यासाठी बाबांनी ओसाड माळरानावर एक नवे जग वसवले. त्या ओसाड माळरानावर एक नवा चमत्कार उभा केला. बाबांनी अपंगांसाठी ‘आनंदवन’ निर्माण केले. ‘आनंदवन’ हे केवळ आश्रम नाही, तर अपंगांचे जीवनस्थान आहे. बाबांनी अपंगांचे व्यक्तिमत्व फुलविले. त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

आनंदवनात अपंग बांधव हे स्वावलंबी बनले. त्यांच्या जीवनातील लाचारी संपली. बाबा हे सर्व अपंगांचे एक चांगले मित्र बनले, परंतु त्यासाठी त्यांना अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. बाबा आमटेंचे हे ‘आनंदवन’ म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे.

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमत्ता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, जे काम ठरवले आहे ते साध्य करण्याची निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य या सर्व गुंणाच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या त्यांच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणार कुष्ठरोगनिदानवरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीतही बाबांचा खारीचा वाटा होता. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. गांधीजींच्या संपर्कात आलयावर सत्य, नीती, व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दिनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरविले. गांधीजींनी बाबांना अभय साधक अशी पदवी दिली होती.

कुष्ठरोगासारख्या महायंकर रोगाने त्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्यांचे आयुष्य हे मंदिरांपेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असते. कुष्ठरोग्यांची शुश्रुषाच करायची नव्हे तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्माचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहे.

कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरु करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखविला. शेती व शेतीविषयक इतर व्यवसाय जसे कि दुग्धव्यवसाय, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी उदयॊग सुरु करून दिले. अशाप्रकारे एक थोर समाजकार्यकर्ता बाबा आमटे यांनी आपले कार्य पार पडले. त्यांना आपल्या सर्वांचा सलाम.


वरील थोर समाजसुधारकांविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या या आर्टिकलला ५ स्टार रेटिंग देऊन आम्हाला प्रोत्साहित करा म्हणजे आम्ही तुम्हाला आणखीन नवनवीन माहिती देऊ.असेच आमचे आणखी भरपूर निबंध, भाषण, लेख आहेत ते तुम्ही आमच्या या साईट वर पाहू शकता जे तुम्हाला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तसेच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातही उपयोगी पडतील.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 4 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange