निबंध भाषण मराठी

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी – मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी - मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन समाजव्यवस्थेच्या गैरसमजुतींना छेद देत आपले कर्तृत्व सिद्ध करणारे नाव म्हणजेच आनंदीबाई जोशी. भारताच्या या पहिल्या महिला डॉक्टर यांची यावर्षी म्हणजेच ३१ मार्च २०१९ रोजी १५४ वी जयंती आहे. त्यानिमित्त आपण सर्वजण मिळून त्यांना अभिवादन करूयात.

आनंदीबाई गोपाळराव जोशी, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर- मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

आनंदीबाई यांचे पूर्ण नाव आनंदीबाई गोपाळराव जोशी असे होते. आनंदीबाई या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आनंदीबाई यांचा जन्म ३१ मार्च इ.स. १८६५ साली पुण्यामध्ये त्यांच्या आजोळी झाला.

आनंदीबाईंचे लग्नाआधीचे नाव यमुनाबाई असे होते. कल्याण परिसरात पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतरच गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. आनंदीबाई यांना शिक्षणाची खूप आवड होती. कष्टाच्या आणि जिद्द्दीच्या जोरावर त्यांनी एम. डी. ही पदवी मिळवली.

गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. ते स्वतः लोकहितवादी शतपत्रे वाचत असत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते. लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीला इंग्रजी शिकवण्याचा निश्चय त्यांनी केला.

लग्नानंतर आनंदीबाईंना वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० च दिवस जगू शकला. हीच त्यांची खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यानंतर त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

स्त्री शिक्षणाबाबत आग्रही असलेल्या सुधारणावादी विचारांच्या गोपाळरावांनी आनंदीला शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अथक प्रयत्नानंतर आनंदीबाई अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या. अमेरिकेत एमडीच्या प्रबंधाचा त्यांचा विषयही ‘भारतीय आर्य स्त्रीचे प्रसूतीशास्त्र’ हाच होता. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची डिग्री मिळवली. त्यानंतर ड्रेकझल विद्यापीठ महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.

परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या भारतीय महिलांची सेवा करण्यासाठी त्या मायदेशी परतल्या. परंतु बदलते हवामान, बोटीचा प्रवास या सगळ्याचा परिणाम होऊन त्यांना क्षयरोगाने ग्रासले. पुढे काही दिवसातच म्हणजेच २६ फेब्रुवारी, १८८७ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

केवळ २१ वर्षांच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला.

अलीकडेच १५ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी याच्या जीवनावरील मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटाचे नाव “आनंदी गोपाळ” असे आहे. हा चित्रपट जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय ठरत आहे. ह्या चित्रपटात भघ्याशी मिलिंद हि मराठी अभिनेत्री आनंदीबाईंनी भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली आहे. तसेच ललित प्रभाकर हा मराठी अभिनेता गोपाळराव जोशी यांच्या भूमिकेत दिसून देणार आहे.

वरील आर्टिकल जर तुम्हाला आवडले असेल तर चांगली रेटिंग देऊन आम्हाला प्रोत्साहित करा म्हणजे आणखी नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू. आमच्या या साईटवर अशा अनेक थोर व्यक्तींबद्दल, नेत्यांबद्दल, समाजसुधारकांबद्दल माहिती आपण पाहू शकता. 🙂


In this article you’ll find all the information about Dr. Anandibai Gopalrao Joshi, India’s first woman doctor in Marathi. This Marathi information about Dr. Anandibai Gopalrao Joshi, will help you to write an essay, speech, article in Marathi. Thank you. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 22 Average: 4.1]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

13 Comments

 • Dr. Ganguly studied medicine at the Calcutta Medical College and se did not travel to USA. In 1886, she was given a Graduate of Bengal Medical College degree. Dr. Anandi Gopal was the first woman from the erstwhile Bombay presidency of India to study and graduate with a two-year degree in western medicine in the United States. Please be vigilant while posting comments.

 • Bakwaas hai ye news….. India’s first woman doctor is Dr. Kadambini Ganguly from Kolkata, West Bengal…… The land of culture, education, literary skill.

  • Dr. Ganguly studied medicine at the Calcutta Medical College and se did not travel to USA. In 1886, she was given a Graduate of Bengal Medical College degree. Dr. Anandi Gopal was the first woman from the erstwhile Bombay presidency of India to study and graduate with a two-year degree in western medicine in the United States. Please be vigilant while posting comments.

   • You too Rahul….. Dr. Ganguly is the first female degree holder physical practitioner of India…. May be she hadn’t got education in abroad, that doesn’t mean she was less than Dr. Joshi…… Dr. Ganguly was the Pathfinder for women in medical sciences….. Please don’t do partiality while commenting…try to appreciate each n every Indian woman for their irresistible courage n achievements…..Be an Indian dear…. Doesn’t matter Marathi of Bangali… I hope u understand…. Good luck dear

    • Hi Aritra, I did not compare Dr Joshi with Dr. Ganguly as I respect Both ladies deep from my heart and I do aware suffering faced by both ladies while becoming physician. You might be knowing Dr.Ganguly life. For Dr. Joshi do watch Anandi Gopal movie. Please re read your first post and check who is doing partiality. I cleared just facts about them in my post. Also, for me my nation comes first and then state. Hope you understand.Good luck dear

Secured By miniOrange