निबंध भाषण मराठी

10 Lines on Pollution in Marathi Language Essay, Speech | प्रदूषण एक समस्या विषयावर १० ओळी निबंध मराठीमध्ये

10 Lines on Pollution in Marathi Language Essay, Speech
Pexels.com

मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे गृहपाठ दिले जातात जसे कि ५ ते १० ओळीत निबंध,भाषण आणि परिच्छेद लेखन आणि यासाठी त्यांना वेगवेगळे विषय दिले जातात. आम्ही आधीच सामान्य गृहपाठांचा विषयांवर लेख लिहिले आहेत. हे निबंध/ओळी इयत्ता १,२,३,४,५, चा विद्यार्थ्यांसाठी सरळ आणि समजण्यास सोपे आहेत. या लेखामध्ये प्रदूषण एक समस्या या विषयवर आम्ही एक छोटा निबंध लिहिला आहे. इयत्ता ५,६,७,८,९,१०, इत्यादी वर्गाचा विद्यार्थ्यांना हा विषय निबंध लेखनासाठी येऊ शकतो. आमच्या मते तुम्ही विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुम्हाला हि माहिती उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते.

प्रदूषण एक समस्या या विषयावर १,२,३,४,५ च्या विध्यार्थ्यांसाठी १० ओळी/वाक्यांमध्ये निबंध

१. आपल्या शहरात खूप धूम्र प्रदूषण आहे.
२. आम्ही शाळेमद्ध्ये जात असताना आम्हाला रस्त्या पलीकडचे काही दिसत नाही.
३. आमच्या विज्ञानच्या शिक्षकांनी सांगितले की याला धुके असे म्हणतात.
४.आमच्या शहरात दोन नद्या आहेत आणि दोन्ही हि खूप प्रदूषित आहेत.
५. नदीतल्या पाण्याचा वास सांडपाण्यासारखा येतो व पाणी काळ्या रंगाचे दिसते.
६. रस्त्यावर आणि नदीमद्ये खूप कचरा आणि प्लास्टिक आहे.
७. मला शिमला शहर खूप आवडते, तिथली हवा आणि पाणी खूप स्वछ आहे,
८.आपल्याला आपल्या खराब सवयी बदलाव्या लागतील नाहीतर आपले शहर कचरा पेटी सारखे दिसेल.
९. आपण आपल्या शाळेत, रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर कचरा नाही केला पाहिजे.
१०. आपण आपल्या घरातला ओला कचरा व सुका कचरा वेगळे ठेवायला पाहिजे.
११. मला माझ्या शहराला आणि देशाला स्वछ करण्यास मदत करायला खूप आवडेल.
१२. मला माझ्या शहराला भारतातले सगळ्यात स्वछ शहर म्हणून बघायला खूप आवडेल.

प्रदूषण एक समस्या या विषय वर मराठी मध्ये १० ओळीत लहान निबंध,भाषण, परिच्छेद

आपल्या शहरातील प्रदूषण वाढत चालले आहे. पुढे जाऊन आपले शहर कचरा पेटीत बदलू शकते. लोक रस्त्यावर थुंकतात, प्लास्टिक पिशव्या फेकतात, खाल्लेले पॅकेट रस्त्यावर फेकतात. आपल्याला शिस्त नाही. आपण आपल्या स्वतःचा हातांनी पर्यावरणाला आणि शहराला हानी पोचावतोय. कारखाने घातक धूर आकाशात सोडतात,गाड्या हि प्राण घातक धूर सोडतात.
कारखाने त्यांचा रासायनिक कचरा आणि पाणी नदी आणि समुद्रात सोडतात. शहर आणि गावातले गटारे व नाले नदीला जुळतात. हे सगळे भारतात सरासपणे आहेत. सरकारने या विषयावर ठोस नियम, धोरणे, पाऊल उचलायला हवे. त्या बरोबर आपण आपल्या खराब सवयीहि बदलायला हव्यात. सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन हि समस्या सोडवायला हवी.

आपल्याला स्वछ भारत अभियानात सहभागी झाले पाहिजे. शालेय विध्यार्थी म्हणून आपल्यालाहि हि मोहीम विजयी करण्यासाठी एकत्रित काम करायला हवे. आपण स्वच्छतेच्या महत्वा साठी सोशिअल मीडियाचा वापर करून जगाला सांगू शकतो. आपण वेगवेगळ्या अँप्स चा उपयोग करून प्रदूषण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करू शकतो. आपण क्लीन इंडिया वीकएंड शिबीर मध्येहि भाग घेऊ शकतो. आपण विद्यार्थ्यांनी अशी शपथ घेऊया कि आपण मोठ्यांसारखे गैरजबाबदार वागणार नाही. त्यांनी पर्यावरण स्वछ ठेवण्याकरीता काही नाही केले आणि आपल्याला हि या बद्दल काही शिकवले नाही. आपण नवी पिढीने ह्या मोहिमे मध्ये पुढाकार घ्याला हवा. आपण आपली शाळा, शहर, देश स्वच्छ बनवण्यास आपला संपूर्ण योगदान द्यायला पाहिजे. चला सगळ्यांनी शपत घेऊया कि आपण सगळे आपल्या देशाचे शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक बनू.

टीप: हा निबंध इयत्ता ५,६,७,८,९,१० इत्यादी चा विद्यार्थ्यांसाठी लिहिला आहे.

जर ह्या प्रदूषण एक समस्या विषयावरील ह्या १० ओळी व निबंध तुम्हाला कशाही प्रकारे उपयोगी आल्या असतील तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करायला विसरू नका. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 185 Average: 3.5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

24 Comments

About the author

Sueniel

He is a techie, geek or you can call him a nerd too. He likes to read, observe stuff and write about it. As Simple as that...

He is also CEO and Co-Founder of TeenAtHeart.