लघु निबंध

नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये, निबंध, भाषण मराठी मध्ये | 10 lines, Sentences, Essay Speech on Christmas in Marathi

नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये, निबंध, भाषण मराठी मध्ये 10 lines, Sentences, Essay Speech on Christmas in Marathi

क्रिसमस नाताळ म्हणजे रोषणाई, मिठाई, आणि सजावटीचा सण. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख असून देखील सर्व धर्माचे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी साजरा केला जातो.
नाताळच्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येते आणि या सुट्टीसोबत येतो तो म्हणजे गृहपाठ. नाताळच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना नाताळ, ख्रिसमस या विषयावर १० ओळी, १५ ओळी, छोटा निबंध, भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. सध्या इंटरनेटवर नाताळबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे पण लहान मुलांना कळेल अश्या सोप्या मराठी भाषेत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.

ह्या लेखामध्ये आम्ही अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये नाताळ बद्दल माहित पुरवली आहे. हा लेख आम्ही २ भागांमध्ये विभागला आहे. पहिल्या भागामध्ये मध्ये आम्ही नाताळ विषयाशी १० ओळी, वाक्ये अतिशय सोप्या भाषेत दिली आहेत, जेणेकरून इयत्ता १,२,३,४,५, मधल्या मुलांना हि माहिती सहजपणे कळेल आंही समजेल हि.

दुसऱ्या भागामध्ये आम्ही एक छोटासा असा सुंदर, सोप्या मराठी भाषेत नाताळ वर निबंध १५ ते २० ओळींमध्ये लिहला आहे. हा छोटा निबंध इयत्ता ६, ७, ८, ९, १० च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये मराठीमध्ये

१. नाताळ हा सण येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
२. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर ला साजरा केला जातो.
३. नाताळ च्या दिवशी लोक ख्रिस्तमस ट्री, आपली घरी, दुकाने रोषणाई ने सजवतात.
४. घरी कूकीस, मिठाई बनवली जाते आणि शेजाऱ्यांना दिली जाते.
५. संध्याकाळी घरातील सर्वजण एकत्र जमतात आणि एकमेकांना मेरी ख्रिसमस बोलून शुभेछया देतात.
६. नाताळ हा सुट्टीच्या दिवस असून हा दिवस कुटुंबातील सर्वजण एकत्र घालवतात.
७. मी माझ्या दादाला/ताईला घर सजवण्यात मदत करतो/करते.
८. मी, माझा भाऊ, ताई, आम्ही सगळे एकत्र मिळून नाताळची गाणी ( ख्रिसमस कॅरोल्स )म्हणतो.
९. मला नाताळ खूप आवडतो. सर्वजण खूप खुश असतात.
१०. मला नाताळच्या च्या दिवशी आई बाबांकडून गिफ्ट्स मिळतात.

नाताळ बद्दल १०, १५ ओळी इंग्रजी आणि हिंदीमध्ये | 10, 15 Lines on Christmas in English and Hindi

नाताळ बद्दल १० ओळींचा निबंध, भाषण लहान मुलांसाठी

नाताळ सण दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि मला तो खूप आवडतो. येशू ख्रिस्तांचा जन्म या दिवशी झाला होता. नाताळच्या दिवशी मी आणि माझ्या घरातील सर्व जण घराची सजावट करतात. माझे पप्पा दरवर्षी एक सुंदर क्रिसमस ट्री घरी आणतात आणि आम्ही सर्वां तो ख्रिसमस ट्री सजवतो. माझी आई सर्वांसाठी खमंग कुकीस आणि गोडधोड पदार्थ बनवते. मला ह्यावर्षी चिस्तमस गिफ्ट म्हणून रेसिंग कार/ बार्बी डॉल मिळाली. थँक यु सांता! सांता चा ड्रेस लाल रंगाचा असतो आणि त्याची खूप मोठी सफेद दाढी असते. नाताळ च्या दिवशी मी मित्रांना चॉकलेट्स देतो. संध्याकाळी आम्ही सर्व येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतो आणि सर्वाना मेरी ख्रिसमस च्या शुभेछया देतो.

नाताळ मराठी माहिती निबंध, भाषण | Essay, Speech on Christmas in Marathi

तर अशा प्रकारे आम्ही नाताळबद्दल १०, १५ ओळी, वाक्ये दिली आहेत. मी अशी अशा करतो कि हा लेख तुम्हाला तुमच्या गृहपाठामध्ये मदत करेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया खाली कंमेंट मध्ये आम्हाला कालवा आणि ५ स्टार रेटिंग द्यायला विसरू नका. धन्यवाद! 🙂

जर तुम्हाला ख्रिस्तमस पार्टी ची तयारी कशी करावी ह्याबद्दल माहिती हवे असेल तर हा लेख बघा.
How to Organize a Great Christmas Party.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 10 Average: 2.9]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

2 Comments

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)