निबंध भाषण मराठी लघु निबंध

10, 15 Lines, Sentences on Gudi Padwa Festival in Marathi | गुढीपाडवा १०, १५ ओळी, वाक्ये, माहिती

10 15 Lines, Sentences on Gudi Padwa Festival in Marathi Language
Zee News India

Gudi Padwa is one of the most popular Hindu festivals in India. Students in schools are asked to write information about Gudhipadwa festival in the Marathi language. In this article, we have given you 10, 15 lines about Gudi Padwa festival in the Marathi language. I hope it helps you. Let’s start.


आपले सण हे आपल्या समृद्ध भारतीय परंपरेचे प्रतीक आहेत. सण साजरे केल्याने लोक एकत्र येतात आणि त्यामुळे समाजामध्ये एकोपा वाढण्यास मदत होते. अशाच सणांपैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुडीपाडवा पूर्ण भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना गुढीपाडवा विषयावर निबंध अथवा माहिती लिहून आणण्याचा गृहपाठ मिळतो. म्हणूनच ह्या लेखामध्ये आम्ही गुढीपाडवा विषयाबद्दल काही माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला गुढीपाडवा विषयावर निबंध अथवा १० ओळी, वाक्ये लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

गुढीपाडवा विषयावर मराठीमध्ये १०, १५ ओळी, वाक्ये, माहिती

१. गुढीपाडवा हा भारतीय सणांपैकी एक महत्वाचा हिंदू सण आहे.
२. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षांची सुरुवात होते.
३. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारतात.
४. गुढी हि पावित्र्य, मांगल्य, आणि समृद्धीचे प्रतीक असते.
५. गुढीपाडव्याचा दिवस भारतातील इतर राज्यांमध्ये बिहू, उगाडी, चेटी चांद यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो.
६. असे मानले जाते कि गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान राम आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते.
७. गुढीपाडव्याचे आध्यात्मिक, नैसर्गिक, आणि सामाजिक महत्व खूप आहे.
८. गुढीपाडवा वेळी हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते.
९. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचा उपयोग प्रसाद बनवण्यासाठी तसेच अंघोळीच्या पाण्यात केला जातो.
१०. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोड पदार्थ केले जातात.
११. गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते.
१२. सण साजरे केल्याने सामाजिक बांधिलकी निर्माण होते.
१३. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कामांची सुरुवात केल्यास ती यशस्वी होतात असे मानले जाते.
१४. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक पारंपरिक पोशाख घालून पहाटे एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देतात.
१५. गुढीपाडवा हा माझा आवडता सण आहे.

अशाप्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये गुढीपाडवा बद्दल १० ते १५ ओळी, वाक्ये दिली आहेत. ह्यापैकी तुम्ही कोणतीही वाक्ये, ओळी निवडू शकता. You can also read 10 Lines on Holi.

जर तुम्हाला ह्या लेखामधील गुढीपाडवा बद्दलची हि माहिती आवडली असेल तर कृपया ह्या आर्टिकल ला रेट करा आणि खालील कंमेंट बॉक्स मध्ये तुमची मते कळवा.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 16 Average: 3.1]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Comment

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)